चालू घडामोडी : ६ एप्रिल

स्टँडअप इंडिया योजनेला सुरुवात

    Stand up India
  • देशातील अनुसूचित जाती-जमातींतील तसेच महिला उद्योजक यांना पतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्टँडअप इंडिया योजनेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी नोएडा येथे केले.
  • स्टँडअप योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज अनुसूचित जाती-जमाती व महिला या गटांतील उद्योजकांना दिले जाणार आहे. हे कर्ज नवा उद्योग स्थापण्यासाठी दिले जाईल.
  • हे कर्ज मिळालेल्या अनुसूचित जाती-जमाती व महिला उद्योजकांना कर्जाची रक्कम काढण्यासाठी रुपे डेबिट कार्ड दिले जाणार आहे.
  • याशिवाय उद्योजकता योग्य प्रकारे अंगी बाणवता यावी यासाठी उद्योगपूर्व प्रशिक्षण, कर्ज घेण्यासाठी मार्गदर्शन, विपणनाची मदत इत्यादी सहकार्य दिले जाणार आहे.
  • स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय लघुउद्योग विकास बँकेने (सिडबी) १० हजार कोटी रुपये, राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीने पाच हजार कोटी रुपये वित्तपुरवठा केला आहे.
  • अनावरणप्रसंगी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत भारतीय मायक्रो क्रेडिटतर्फे १०० ई-रिक्षांचे वाटपही करण्यात आले.

अमेरिका पाकिस्तानला हेलिकॉप्टर्स विकणार

  • अमेरिका पाकिस्तानला एएच-१ झेड व्हायपर प्रकारची नऊ हेलिकॉप्टर्स विकणार आहे, त्यांची किंमत १७ कोटी डॉलर्स आहे.
  • बेल एच १ झेड व्हायपर हेलिकॉप्टर्स दोन इंजिनांची असून ती एएच १ डब्ल्यू सुपरकोब्रा या हेलिकॉप्टर्सची आवृत्ती आहे.
  • ओबामा प्रशासनाने अलीकडे पाकिस्तानला आठ एफ १६ विमाने विकण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता हेलिकॉप्टर्सही दिली जाणार आहेत.
  • ६ एप्रिल २०१५ला परराष्ट्र खात्याने काढलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते, की अमेरिका पाकिस्तानला ९५ कोटी डॉलर्सची लष्करी सामग्री देणार आहे.
  • पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या लष्करी सामुग्रीच्या मदतीअंतर्गत सप्टेंबर २०१८ अखेरीस ही हेलिकॉप्टर्स दिली जाणार आहेत.
  • पाकिस्तानने एएत-१ झेड व्हायपर प्रकारची १५ हेलिकॉप्टर्स व  एडीएम ११४ आर हेलफायर २ प्रकारची १००० क्षेपणास्त्रे, तर टी ७०० जीई ४०१ सी प्रकारची ३२ इंजिने मागितली होती.
  • भारताने तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी त्या वेळी पाकिस्तानला एफ १६ जेट विमाने देण्यास विरोध केला होता. आता व्हायपर हेलिकॉप्टर्स देण्याच्या निर्णयाने प्रादेशिक सुरक्षा समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

आयसीसी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे

  • ट्वेंटी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्तम संघाची घोषणा केली असून, या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे.
  • या संघात भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराचाही समावेश असून, कोहली आणि नेहरा यांच्याव्यतिरिक्त एकही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. 
  • भारतात झालेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत वेस्टइंडीज संघाने इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या स्पर्धेनंतर आयसीसीने सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली.
  • या संघात दोन भारतीयांसह इंलंडच्या चार, वेस्टइंडीजच्या दोन, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेशमधील एका खेळाडूचा समावेश आहे. या संघात पाकिस्तानच्या एकही खेळाडूचा समावेश नाही.

वकार युनूस यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

  • पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून योग्य चालना मिळत नसल्यामुळे संघ सकारात्मक पद्धतीने वाटचाल करू शकत नाही, अशी कारणमीमांसा करीत वकार युनूस यांनी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • नुकत्याच भारतात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते.
  • ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला फक्त बांगलादेशविरुद्ध विजय मिळवता आला. मात्र भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून त्यांनी हार पत्करली.
  • युनूस यांनी २०१४मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्याआधी २०१०-११मध्ये त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळले होते. पण खासगी कारणास्तव सप्टेंबर २०११मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.
  • ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सुमार कामगिरी प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा