आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचा उत्तर कोरियाचा दावा
अमेरिकेवरही अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतल्याचे उत्तर कोरियाने १० एप्रिल रोजी जाहीर केले.
उत्तर कोरियाने गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या घेत अमेरिका आणि दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
कोरियाने आपली मारक क्षमता वाढविली असली, तरी अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी या देशाला आणखीही बरीच तयारी करावी लागणार आहे.
या देशाकडे अचूक मारा करू शकतील, असे आंतरखंडीय क्षेपणास्त्र नाही. तिथेच अमेरिकेकडे मात्र उत्तर कोरियाच्या कोणत्याही भागात अचूक मारा करून, प्रचंड मनुष्यहानी करू शकतील, अशी असंख्य क्षेपणास्त्रे आहेत.
उत्तर कोरियाने अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक रॉकेट इंजिनच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली असली तरी दक्षिण कोरियाच्या सूत्रांच्या मतानुसार उत्तर कोरियाकडे असे कोणतेही विश्वसनीय इंजिन नाही.
प्रियदर्शनी चॅटर्जी ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’
फॅशन जगताचे लक्ष लागलेल्या सौंदर्य स्पर्धेत दिल्लीच्या प्रियदर्शनी चॅटर्जी हिने बाजी मारत ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’चा किताब पटकाविला.
बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने प्रियदर्शनीच्या नावाची घोषणा केली. आता प्रियदर्शनी आता ‘मिस वर्ल्ड २०१६’ सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बंगळूरची सुश्रुती कृष्णा हिला प्रियदर्शनीच्या पाठोपाठ प्रथम उपविजेतीचा मान मिळाला, तर लखनौची पंखुरी गिडवानी ही द्वितीय उपविजेती ठरली.
यामुळे सुश्रुता कृष्णा ही ‘मिस इंटरनॅशनल २०१६’ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तसेच, पंखुरा गिडवानी ही ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१६’ स्पर्धेत सहभागी होईल.
‘ब्रिक्स’ची मुंबईत तीनदिवसीय परिषद
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ची तीन दिवसांची परिषद १४ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईत पार पडली.
ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर भारतात होत असलेली ही पहिलीच परिषद असेल. शहर विकास ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे.
नागरी वाहतूक, पायाभूत सुविधांसाठीचे वित्तीय व्यवस्थापन, शाश्वत शहरे, परिणामकारक जनसुविधा पुरविणे, परवडणारी घरे, जमिनींचा परिणामकारक वापर या विषयांवर परिषदेत व्यापक चर्चा झाली.
१४ तारखेला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मेक इन इंडियाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणूनही या परिषदेला महत्त्व आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा