२७व्या ‘बेसिक’ बैठकीचे नवी दिल्लीमध्ये आयोजन
- हवामान बदलावर २७व्या ‘बेसिक’ (BASIC) मंत्रिस्तरीय बैठकीचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले.
- या बैठकीत विकसित देशांना पॅरिस कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विकसनशील देशांना मदत करण्यास सांगण्यात आले.
- बेसिक ग्रुपमध्ये ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन हे देश आहेत.
- डिसेंबर २०१८मध्ये पोलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP) परिषदेपूर्वी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
- या बैठकीत भाग घेतलेल्या ‘बेसिक’ देशांनी हवामानातील बदल नियंत्रित करण्यासाठी पॅरिस करार आवश्यक असल्याचे मान्य केले. तसेच विकसनशील देशांच्या विशेष गरजांवरही चर्चा करण्यात आली.
- सदस्य देशांनी क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस कराराच्या अंमलबजावणीची वचनबद्धता या बैठकीत व्यक्त केली.
- याशिवाय सदस्य देशांनी हरितगृह वायूंच्या कमीत कमी उत्सर्जन करण्यावरही सहमती दर्शवली आहे.
- विकसित देशांनी २०२०पर्यंत हवामान बदलांसाठी १०० अब्ज डॉलर्सचे योगदानासाठी प्रतिबद्धता जाहीर केली होती. विकसित देशांचे ही प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी बेसिक समूह प्रयत्न करणार आहे.
बेसिक
- बेसिकमध्ये ४ नवीन औद्योगिक देश आहेत: ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन.
- हा गटाची स्थापना नोव्हेंबर २००९मध्ये करण्यात आली. या देशांनी कोपेनहेगेन हवामान शिखर संमेलन २००९वर कार्य करण्याची प्रतिबद्धता व्यक्त केली होती.
- हा गट उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि इतर देशांना कोपेनहेगेन करारावर सहमत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
केद्र सरकारचा नवकल्पना परिषद कार्यक्रम सुरु
- केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘संस्थांचा नवकल्पना परिषद कार्यक्रम’ (Institution’s Innovation Council Program) सुरू केला आहे.
- हा कार्यक्रम केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली येथे सुरू केला.
- देशात शैक्षणिक संस्थांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहित करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
- युवा विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
- आतापर्यंत १०००हून अधिक उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये संस्था नवकल्पना परिषदेची स्थापना केली आहे.
- यामुळे पुढील २-३ वर्षात ग्लोबल इनोवेशन रँकिंगमध्ये भारताच्या प्रदर्शनात सुधारणा होईल.
- देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने एआयसीटीईमध्ये (अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद) इनोवेशन सेलची स्थापनाही करण्यात आली आहे.
दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग इंटरपोलचे नवे अध्यक्ष
- दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी रशियन प्रतिस्पर्धी ॲलेक्झांडर प्रॉकोपचुक यांना पराभूत केले.
- पाश्चिमात्य देशांना इंटरपोलच्या अध्यक्षपदी प्रॉकोपचुक यांची निवड होणे धोक्याचे वाटत होते.ते सध्या इंटरपोलचे उपाध्यक्ष असून त्याआधी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी होते.
- किम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. ते आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून २०२०पर्यंत पदावर राहतील.
- दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांच्या झालेल्या बैठकीत, आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली.
आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना (इंटरपोल)
- INTERPOL: International Criminal Police Organization
- स्थापना: १९२३
- सदस्य: १९२ देश
- मुख्यालय: लिऑन, फ्रांस
- इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस सहयोग संस्था आहे.
- इंटरपोलची स्थापना १९२३ साली International Criminal Police Commission या नावाने झाली.
- यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद, संघटीत गुन्हे आणि सायबर क्राइम यासंबधी गुन्ह्यांची प्रामुख्याने दखल घेतली जाते.
- गुन्हेगारीविरुद्ध लढण्याकरता सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संघटना, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन संघासोबत मिळून इंटरपोलची यंत्रणा काम करते.
- संघटीत गुन्हे, गुन्ह्यांचे नेटवर्क, अनधिकृत व्यवहार यांना संपुष्टात आणण्यासाठी तसेच कमकुवत समुदायाच्या रक्षणासाठी ही संस्था कार्यरत असते.
- देशाची सीमारेषा ओलांडून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी तसेच मानवी तस्करी थांबवण्याकरता इंटरपोलची मदत घेतली जाते.
- त्याशिवाय जागतिक स्तरावरील दहशतवादाविरोधात लढण्याचे कार्यही इंटरपोल करते.
श्यामाप्रसाद गांगुली यांना ऑर्डर ऑफ दी अॅज्टेक ईगल सन्मान
- मेक्सिकन सरकारने भारतीय प्राध्यापक श्यामाप्रसाद गांगुली यांना ‘ओर्डेन मेक्सिकाना डेल अगिला अज्टेका’ने (मेक्सिकन ऑर्डर ऑफ दी अॅज्टेक ईगल) सन्मानित केले.
- प्राध्यापक गांगुली यांना हा पुरस्कार स्पॅनिश भाषा आणि मेक्सिकन संस्कृतीमध्ये योगदान देण्यासाठी देण्यात आला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय शिक्षणतज्ञ आहेत.
- श्यामाप्रसाद गांगुली जवाहरलाल विद्यापीठाच्जे माजी स्पॅनिश व लॅटिन अमेरिकन अभ्यासांचे प्राध्यापक आहेत.
- स्पॅनिश भाषेसाठी लोकांमध्ये आवड निर्माण करण्याचे कार्य करणारे ते भारतातील काही मोजक्या प्राध्यापकांपैकी एक आहेत.
- त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत २५ पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन, संपादन आणि अनुवाद केला आहे.
ऑर्डर ऑफ दी अॅज्टेक ईगल
- हा मेक्सिकन सन्मान प्रथेचा भाग आहे. मेक्सिकन सरकारद्वारे एखाद्या परदेशी व्यक्तीला देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
- या सन्मानाची स्थापना मेक्सिकोचे तत्कालीन राष्ट्रपती अबेलार्दो रॉड्रीगेज यांनी डिसेंबर १९३३मध्ये केली होती.
- या सन्मानाचा दर्जा मेक्सिकोच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोंदेकोरासियोन मिगुएल हिदाल्गो आणि बेलिसारियो डोमिंगेज मेडल ऑफ ऑनर यांच्याप्रमाणे आहे.
- यापूर्वी हा सन्मान बिल गेट्स, अमर्त्य सेन, नेडिन गॉर्डिमेर या व्यक्तींना देण्यात आला आहे.
निधन: आशियातील पहिल्या न्यूरोसर्जन डॉ. टी. एस. कनक
- १९५४मध्ये वैद्यकीय पदवी मिळवलेल्या आशियातील पहिल्या आणि जगातील तिसऱ्या मेंदूविकार तज्ञ (न्यूरोसर्जन) डॉ. टी. एस. कनक यांचे १४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८६व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले.
- आपल्या पालकांच्या नावावर त्यांनी श्री संथानाकृष्ण पद्मावती हेल्थ केअर अँड रिसर्च फाउंडेशन या हॉस्पिटलची स्थापना केली होती. येथे गरजूंना मोफत मदत उपलब्ध करून दिली जाते.
- डॉ. टी. एस. कनक यांचा जन्म ३१ मार्च १९३२ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव तंजावूर संथानाकृष्ण कनक आहे.
- डिसेंबर १९५४मध्ये त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मार्च १९६३मध्ये एमएस (जनरल सर्जरी) व मार्च १९६८मध्ये एमसीएच (न्युरोसर्जरी) ही पदवी प्राप्त केली. १९७२मध्ये त्यांनी पीएचडी केली.
- १९६२मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमल्या गेल्या होत्या.
- त्या आशियातील पहिल्या आणि जगातील तिसऱ्या मेंदूविकार तज्ञ (न्यूरोसर्जन) होत्या. मेंदूमध्ये क्रॉनिक इलेक्ट्रोड प्रत्यारोपण करणाऱ्या त्या पहिल्या डॉक्टर होत्या.
- डॉ. कनक १९९०मध्ये यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून न्यूरोसर्जरीच्या प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.
- १९९६मध्ये त्या आशियाई महिला न्युरोसर्जिकल असोसिएशनच्या मानद अध्यक्षा बनली.
उत्तरप्रदेशने सुरु केले नारी सशक्तीकरण अभियान
- उत्तरप्रदेश राज्य सरकारने २० नोव्हेंबर २०१८ रोजी ‘नारी सशक्तीकरण अभियान’ (Women Empowerment campaign) सुरू केले
- या अभियानाचा उद्देश राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे महिलांचे कल्याण आणि त्यांचे सशक्तीकरण सुनिश्चित करणे आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी लखनऊ येथे ही मोहीम सुरू केली.
- या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारच्या महिला कर्मचारी त्यांच्या ब्लॉकमधील प्रत्येक घरात जाऊन महिलांसाठीच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबद्दल माहिती देतील.
- या अभियानाअंतर्गत शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य, स्वच्छता, पोषण यासारखे मुद्दे समाविष्ट केले जातील.
केरळचा ‘कुल’ नामक ऑनलाइन शिक्षण मंच सुरु
- केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनने (KITE) ‘कुल’ (KOOL) नामक ऑनलाइन मुक्त शिक्षण मंच (ओपन लर्निंग प्लॅटफॉर्म) सुरू केला आहे.
- याचा उपयोग शिक्षक, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो.
- याअंतर्गत पहिल्या बॅचची सुरूवात पुढील महिन्यात होईल. यासाठी नोंदणी सुरु झाली असून, आतापर्यंत ५०००हून अधिक शिक्षकांनी त्यासाठी अर्ज केला आहे.
- कुल हा केरळचा सर्वात मोठा ऑनलाइन शिक्षण मंच आहे. याला एमओयूसी (मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्स) मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात आले आहे.
- यासाठी २०० व्यवस्थापक नियुक्त केले आहेत. हा अभ्यासक्रम ६ आठवड्यांचा असेल. त्यामध्ये मल्याळम टाइपिंग, व्हिडिओ ट्यूटोरियल, वर्ड डॉक्युमेंटचा वापर, स्प्रेडशीट्स, सादरीकरण, इंटरनेट इत्यादींचा समावेश आहे.
- शिक्षकांसाठी हा कोर्स करणे अनिवार्य आहे. या कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्रही दिले जाईल.
मणिपूरमध्ये वार्षिक संगाई उत्सव सुरू
- मणिपूरमध्ये २१ नोव्हेंबरपासून वार्षिक संगाई महोत्सव सुरू झाला. मणिपूरमधील हा एक प्रसिद्ध महोत्सव आहे. त्याचे नाव संगाई नावाच्या हरणाच्या प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे.
- मणिपूरला विश्वस्तरीय पर्यटन स्थळ म्हणून सादर करणे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. याचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
- या महोत्सवात मणिपूरची कला आणि संस्कृती, हस्तकला, स्थानिक खेळ, अन्नपदार्थ, संगीत आणि साहसी खेळ यांचे प्रदर्शन करण्यात आले.
- मणिपूरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि येथील विविध जमातींची कलेप्रती आवड हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते.
- या उत्सवात रास लीलासह राज्याचे इतर शास्त्रीय नृत्य जसे मैबी नृत्य, काबुई नागा नृत्य, लाई हराओबा नृत्य, खांबां थोईबी नृत्य इत्यादींचे प्रदर्शन करण्यात आले.
- तसेच थांग ता (मार्शल आर्ट्स), मुकना कांगजेई, यूबी-लक्पी, सगोई कांगजेई इत्यादी स्थानिक खेळांचेही प्रदर्शन केले गेले.
- या पर्यटन महोत्सवाची सुरुवात २०१०मध्ये झाली होती. हा महोत्सव मणिपुरची संस्कृती आणि परंपरा जगासमोर प्रदर्शित करतो.
संगाई हरीण
- संगाई हरीण (रुसेर्वस एलडी) मणिपूरचा राज्यप्राणी आहे. संगाई हरीण ही एक लुप्तप्राय प्रजाती असून, हे हरीण केवळ मणिपूरमध्ये आढळते.
- आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटनेने गंभीररित्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत संगाई हरणाचा समावेश केला आहे.
- पूर्वी हे हरीण संपूर्ण मणिपूरमध्ये आढळत होते. परंतु आता ते फक्त केइबुल लम्जाओ राष्ट्रीय उद्यानात आढळते.
- केइबुल लम्जाओ राष्ट्रीय उद्यान जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. ते लोकटक तलावाचा एक भाग आहे.
सिल्वासा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने दादरा नगर हवेलीमधील सिल्वासा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली.
- यामुळे डॉक्टरांची उपलब्धता वाढेल आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधीही वाढतील.
- या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केले जाईल.
- या महाविद्यालयाचे बांधकाम २०१९-२०पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यासाठी सुमारे १८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे.
- या वैद्यकीय महाविद्यालयाचा खर्च केंद्रशासित प्रदेशाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून केला जाईल.
- हे महाविद्यालयामुळे आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होईल. तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रोत्साहन मिळेल.
मोरोक्कोने मोहम्मद ६-बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- मोरोक्कोने २१ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे त्याचे नाव मोहम्मद ६-बी आहे.
- या उपग्रहाचे प्रक्षेपण फ्रेंच गुयाना येथील अंतराळ केंद्रातून एरियनस्पेसच्या वेगा रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केले गेले.
- हा उपग्रह मोहम्मद ६-ए उपग्रहाच्या कक्षेमध्ये स्थिर केला जाईल. नोव्हेंबर २०१७मध्ये मोरोक्कोने मोहम्मद ६-ए उपग्रह प्रक्षेपित केला होता. हा मोरोक्कोचा पहिला उपग्रह होता.
- मोहम्मद ६-बी या उपग्रहचे वजन ११०० किलो आहे. थेल्स अलेनिया स्पेस आणि एयरबस डिफेन्स अँड स्पेसद्वारे हा उपग्रह विकसित करण्यात आला आहे.
- या उपग्रहाचा वापर नकाशे तयार करणे, जमिनीचे सर्वेक्षण, शेतीविषयक देखरेखीचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण, सीमा आणि किमारी भागांतील देखरेख या साठी केला जाईल.
एरियनस्पेस
- एरियनस्पेस १९८०मध्ये स्थापन झालेली एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही जगातील पहिली व्यावसायिक प्रक्षेपण सेवा प्रदाता कंपनी आहे.
- या कंपनीचे मुख्यालय कॉरकोरोनस (फ्रान्स) येथे आहे. एरियन ५, सोयुझ २ आणि वेगा हे या कंपनीचे प्रमुख प्रक्षेपक (रॉकेट) आहेत.
- मे २०१७च्या आकडेवारीनुसार, एरियनस्पेसने २५४ मोहिमांमध्ये ५५०हून अधिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. वजनदार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठीही एरियनस्पेस सेवा प्रदान करते.
- एरियनस्पेसचे वेगा रॉकेट चार टप्प्यांचे रॉकेट आहे, जे छोटे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी विकसित केले आहे. या रॉकेटची उंची ३० मीटर असून ते २५०० किलोपर्यंत भर वाहून नेयास सक्षम आहे.
२० नोव्हेंबर: आफ्रिका औद्योगिकीकरण दिन
- दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस आफ्रिका औद्योगिकीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. याद्वारे आफ्रिकेतील औद्योगिकीकरणाच्या समस्यांवर प्रकाश टाकला जातो.
- या दिनाची स्थापना १९९०मध्ये करण्यात आली होती. या दिवशी आफ्रिकेतील विविध देशांची सरकारे व इतर संस्था आफ्रिकेतील औद्योगिकरणाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतात.
- लोकसंख्येच्या बाबतीत आफ्रिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे. आफ्रिकेची लोकसंख्या १.२ अब्ज आहे.
- परंतु एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उत्पादन क्षेत्रात आफ्रिकेचा वाटा केवळ २ टक्के आहे.
- मार्च २०१८मध्ये आफ्रिकेतील ५५ पैकी ४९ देशांनी आफ्रिका खंडातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यामुळे या क्षेत्रात मुक्त व्यापारास चालना मिळेल. तसेच आफ्रिकेच्या औद्योगिकीकरण दरात वाढ होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- यावर्षी आफ्रिका औद्योगिकीकरण दिनाची मुख्य संकल्पना (थीम) ‘Promoting Regional Value Chains in Africa: A pathway for accelerating Africa’s structural transformation, industrialization and pharmaceutical production’ ही आहे.
वासिम जाफरचा रणजीमध्ये ११ हजार धावांचा विक्रम
- मुळचा मुंबईचा मात्र सध्या विदर्भाकडून रणजी क्रिकेट खेळणारा वासिम जाफर रणजी क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे.
- रणजी चषक स्पर्धेत जाफर पाठोपाठ सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अमोल मुझुमदार याच्या नावावर आहे.
- मुझुमदार याने ९,२०२ आणि मध्य प्रदेशचा फलंदाज देवेंद्र बुंदेला याने ९२०१ धावा केल्या आहेत.
- जाफरच्या नावावर रणजी चषक स्पर्धेत सर्वाधिक ३७ शतके आणि ८१ अर्धशतक झळकावण्याच्या पराक्रमाचीही नोंद आहे.
- वासिम जाफरने ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- ३१ कसोटी सामन्यांमध्ये २१२ या सर्वोच्च धावसंख्येसह त्याने १९४४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. २ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १० धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी स्पर्धा
- रणजी ट्रॉफी स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील एक प्रतिष्ठेची अंतर्देशीय स्पर्धा आहे.
- भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रणजीतसिंहजी यांच्या नावावरून या स्पर्धेला रणजी असे नाव देण्यात आले आहे. कारण रणजीतसिंहजी यांना रणजी म्हणून देखील ओळखले जात असे.
- इंग्लंडच्या बाजूने खेळून आपली क्रिकेट कारकीर्द सुरु करणारे रणजीतसिंह हे पहिले भारतीय खेळाडू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा