चालू घडामोडी - ११ मे २०१५


  • १० मे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांचा १४वा स्मृतिदिन 

    K. V. Kamat
  • के व्ही कामत यांची ब्रिक्स विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
  • श्री कामत सध्या आयसीआयसीआय बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत. ते इन्फोसिस लिमिटेडचे देखील अध्यक्ष आहेत. 
  • त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकी पदवी घेतली असून अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. 
  • गेल्या वर्षी (२०१४) ब्राझील येथे झालेल्या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांतील पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्याकरता आणि इतर सामाजिक-आर्थिक प्रकल्पांकरिता कर्जसहाय्य उपलब्ध करण्यासाठी ‘ब्रिक्स‘ बॅंकेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • तसेच ब्रिक्स देशांच्या विकास बँकेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान भारतीयाला दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 
  • १०० अब्ज अमेरिकी डॉलर भागभांडवल असणाऱ्या बँकेचे अध्यक्षपद प्रारंभीच्या सहा वर्षांसाठी भारताकडे देण्याचे ठरले आहे. तसेच बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असेल असा निर्णय फोर्टलेझा येथे झालेल्या ब्रिक्सच्या सहाव्या शिखर परिषदेत घेण्यात आला होता.
  • बॅंकेसाठी सर्वात जास्त योगदान चीनकडून मिळणे अपेक्षित आहे, चीन यासाठी ४१ अब्ज डॉलर, तर त्यापाठोपाठ भारत, ब्राझील आणि रशिया प्रत्येकी १८ अब्ज डॉलर देणार आहे. तर दक्षिण आफ्रिका ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
  • ब्रिक्सचे सदस्य : ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका 

  • येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांनी येथील शियापंथीय हौथी संघटनेबरोबर हातमिळवणी केल्याची औपचारिक घोषणा केली आहे. 
  • येमेनची राजधानी असलेल्या सना येथील सालेह यांच्या निवासस्थानावर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील अरब देशांच्या आघाडीने हवाई हल्ले केल्यानंतर सालेह यांनी ही घोषणा केली आहे. घरी नसल्यामुळे अरब आघाडीच्या हल्ल्यामधून सालेह बचावले. 
  • सुमारे तीन दशके येमेनची सत्तासूत्रे हाती असलेल्या सालेह यांना देशात २०१२ मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर पायउतार व्हावे लागले होते. 
  • येमेनमध्ये हौथींनी संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेल्या अब्द रब्बु मन्सूर हादी यांची सत्ता उलथवून लावली आहे.
  • तसेच येमेनमध्ये पाच दिवसांच्या शस्त्रसंधीचा सौदी अरेबियाने ठेवलेला प्रस्ताव येमेनच्या लष्कराने मान्य केला आहे. तसेच पाच दिवसांची युद्धबंदी स्वीकारण्यासंदर्भात हौथींनी सकारात्मक संकेत दिले आहेत.. ही शस्त्रसंधी १२ मेपासून लागू होणार आहे. 
  • येमेनमध्ये हौथी बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी सौदी अरेबियाने गेल्या महिन्यापासून येथे जोरदार हवाई हल्ले सुरू केले. तसेच, येथे गेले वर्षभर सातत्याने अशांततेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून शस्त्रसंधीचा प्रस्ताव सौदीने मांडला आहे.

  • चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
  • सुवर्णकमळ, १० लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला.
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    Jaylalitha
  • बेहिशेबी संपत्ती जमविल्याबद्दल तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना आरोपांमधून दोषमुक्त केले आहे.
  • न्यायाधीश सी.आर. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषांनुसार जयललिता यांच्या जामिनामध्ये १२ मेपर्यंत वाढ केली होती. 
  • जयललिता यांच्यासह एन. शशिकला, जे. एलावारसी, व्ही.एन. सुधागरन यांच्यावरील आरोप रद्द ठरविण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा