चेन्नईला नमवून मुंबई अजिंक्य
- इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या आवृत्तीतील कोलकात्ता येथील इडेन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सचा ४१ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
- मुंबई इंडियन्सच्या २०३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ फक्त १६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
- मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकवताना २६ चेंडूत ६ चौकार, २ षटकारांच्या मदतीने ५० धावा फटकावल्या. तो अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.
फक्त चारच शतकांची नोंद
- यंदाच्या या स्पर्धेत फक्त चारच शतकांची नोंद झाली. त्यात एबी डिव्हिलियर्स (बंगलोर), ख्रिस गेल (बंगलोर), शेन वॉटसन (राजस्थान) आणि ब्रेंडन मॅकल्लम (चेन्नई) यांचा समावेश आहे.
- विशेष म्हणजे यात एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. वास्तविक पाहता यंदा पहिला शतकवीर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ठरला असता. सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रोहित ९८ धावांवर नाबाद राहिला.
विविध पुरस्कार
- वेगवान अर्धशतक : आंद्रे रसेल (केकेआर)
- सर्वाधिक षटकार : ख्रिस गेल (आरसीबी)
- ऑरेंज कॅप : डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद)
- पर्पल कॅप : ड्वेन ब्रॅव्हो (चेन्नई, दुसऱयांदा)
- स्पर्धेतील मोल्यवान खेळाडू : आंद्रे रसेल (केकेआर)
तमिळनाडूमध्ये तूर आणि उडीदडाळ स्वस्त दरात
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच दोन कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून सरकारी दुकानांमधून सवलतीच्या दरामध्ये तूर आणि उडीदडाळीची विक्री केली जाणार आहे.
- खुल्या बाजारातील तूर आणि उडदाच्या डाळीची किंमत वाढल्याने सामान्य माणसाला महागाईचे चटके सोसावे लागत आहे. या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने ही उपाययोजना केली आहे.
- सवलतीच्या दरामध्ये अर्धा किलोग्रॅम तूरडाळ घेण्यासाठी आता ५३.५० रुपये मोजावे लागणार असून, तर तितक्याच वजनाच्या ‘ए’ ग्रेडच्या उडीददाळीसाठी ५६ रुपये मोजावे लागणार आहेत.
सिम्बेक्स-१५
- भारत आणि सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव सिम्बेक्स-१५ २३ मे २०१५ रोजी सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आली होता. हा तीन दिवसीय नौदल सराव २६ मे रोजी समाप्त झाला.
- नौदल सरावाची ही आवृत्तीमध्ये पाणबुडी विरोधी युद्ध आणि अधिक जटिल समुद्राचा सराव यावर मुख्य भर दिला गेला. याबरोबरच हवाई संरक्षण, सागरी संरक्षण आणि शोध व बचाव कार्यक्षेत्रासाहित विविध क्षेत्रांचा सराव करण्यात येईल.
- या सरावात सामील झालेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका
- आयएनएस सातपुडा – ही भारतीय बनावटीची अत्यंत आधुनिक अशा स्टेल्थ प्रकारातील (रडारवर न दिसणारी) हेलिकॉप्टर्स बाळगण्याची क्षमता असलेली युद्धनौका आहे.
- आयएनएस कौमात्रा - ही एक पाणबुडी विरोधी स्वदेशी युद्धनौका आहे.
- पी ८ आय विमाने – हे एक दूरच्या श्रेणीतील पाणबुडीवरील विमान आहे.
- सिंगापुरतर्फे रिपब्लिक ऑफ़ सिंगापुरच्या नौदलाचे सुप्रीम जहाज तसेच इतर लढाऊ विमानांनी भाग घेतला.
- सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर यामधील नौदल सराव १९९९ पासुन दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
समलैंगिक विवाहाला आयर्लंडमध्ये मंजुरी
- समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे.
- तब्बल साडेतीन लाख नागरिकांनी यासाठी केलेल्या मतदानात तब्बल ६२ टक्के नागरिकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मत नोंदविले. त्यामुळे आयरिश सरकारला समलैंगिक विवाहाला परवानगी द्यावी लागली. आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे.
- समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का? या मुद्द्यावर ४३ पैकी ४० क्षेत्रांतून लोकांनी मते मांडली. डबलिन कॅस्टल मैदानात हजारो समलैंगिक विवाह समर्थक एकत्र आले होते आणि निकालानंतर आपला आनंद व्यक्त करत त्यांनी सप्तरंगी झेंडे फडकावले.
नोबेल विजेते जॉन नॅश यांचे निधन
- निर्णय क्षमतेच्या अभ्यासासाठी (गेम थिअरी) १९९४ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचे अपघाती निधन झाले.
- ते आपल्या पत्नीसह एके ठिकाणी टॅक्सीने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला एका इमारतीवर धडकली. यामध्ये नॅश आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
- नॅश यांच्या आयुष्यावर आधारित ‘अ ब्युटिफुल माइंड’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
भारतीय बॉक्सिंगपटूंची सुवर्ण कामगिरी
- भारतीय बॉक्सिंगपटूंनी चार सुवर्णपदके जिंकून दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. या सुवर्णपदकांखेरीज भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो) व मनोजकुमार (६४ किलो) यांनी सोनेरी कामगिरी केली. गौरव बिधुरी याने ५२ किलो गटात रौप्यपदक जिंकले. मनदीप जांगरा (६९ किलो) व विकास कृष्णन (७५ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.
महिलांचा सुवर्ण ठोसा
- भारतीय महिलांनी तैवानची राजधानी असलेल्या ताइपेइ येथे पार पडलेल्या एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली. सविता (५० किलो), मनदीप संधू (५२ किलो) आणि साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या गटांत जेतेपदांसह सुवर्ण जिंकले, तर सोनिया (४८ किलो) आणि निहारिका गोनेल्ला (७० किलो) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- भारतीय बॉक्सिंगपटूंनी शनिवारचा (२३ मे) दिवस गाजवताना दोन विविध स्पर्धामध्ये एकूण सात सुवर्णपदकांची कमाई केली. दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पुरुषांनी चार, तर एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली.
तुर्की येथे चित्रकार सावंत बंधूंनी रचला इतिहास
- इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, तुर्की या जागतिक मान्यवर संस्थेच्या जगभरातील ५५ विविध देशांत शाखा असून, तुर्की येथील आद्यसंस्था आहे.
- तुर्की सरकार व इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, तुर्की यांच्यातर्फे तुर्की देशातील इझमीर राज्यातील बार्नोवा शहरात ‘होमर लव ऍण्ड पिस वॉटर कलर फेस्टिव्हल’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय ऑन दी स्पॉट निसर्गचित्रण स्पर्धा, चित्रप्रदर्शन, वॉटर कलर फेस्टिव्हल व आर्ट टूरचे जागतिक पातळीवर भव्य आयोजन करण्यात आले होते.
- त्यात नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना जागतिक सर्वोत्कृष्ट चित्रकारांचे ‘बोर्नोव्हा ग्रॅण्ड बझार’ या निसर्गचित्रासाठी जागतिक सर्वप्रथम क्रमांकाचे २ लाख ६० हजार रुपयांचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक तर चित्रकार राजेश सावंत यांना त्यांच्या ‘ग्रीन मेनशन’ या जलरंगातील निसर्गचित्रासाठी जागतिक सहाव्या क्रमांकाचे ६५ हजार रुपयांचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
- तुर्की येथील सदर जागतिक पारितोषिक घेणारे सावंत बंधू सर्वांत कमी वयाचे चित्रकार आहेत. तसेच भारतीय कलेच्या इतिहासात सदर आंतरराष्ट्रीय पारितोषिकप्राप्त करणारे सावंत बंधू पहिले भारतीय आहेत.
- या आंतरराष्ट्रीय पारितोषिकामुळे चित्रकार सावंत बंधूंनी ४० विविध देशांतील आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचा मोठा टप्पा केला पार आहे.
ब्रिटिश सरकारमधील मंत्र्यांचे वेतन आणखी पाच वर्षांसाठी गोठविणार
- ब्रिटिश सरकारमधील मंत्र्यांचे वेतन आणखी पाच वर्षांसाठी गोठविणार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जाहीर केले. अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- केंद्रीय मंत्र्यांना वर्षाला सुमारे दोन लाख आठ हजार डॉलर एवढे वेतन दिले जाते. यामध्ये संसदीय वेतनाचाही समावेश असतो; परंतु हे वेतन २०१० पासून गोठविण्यात आले होते.
- त्यावेळी असलेल्या श्रीमंतीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरवातीला या वेतनात पाच टक्के कपात करण्यात आली होती, नंतर मात्र वेतन पूर्णपणे गोठविण्यात आले होते.
- अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आम्हाला काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. याचाच विचार करता वेतन पुढील पाच वर्षांसाठीही गोठविण्यात येणार आहोत, असे कॅमेरॉन म्हणाले.
ऐतिहासिक पालमिरामध्ये इसिसकडून शेकडो ठार
- सीरियामधील ऐतिहासिक शहर असलेल्या पालमिरा येथे इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने शेकडो जणांची हत्या केली आहे.
- इसिसने ठार केलेल्या नागरिकांच्या ओळखीसंदर्भात मतभेद आहेत. सीरियन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने किमान ४०० नागरिकांना ठार करण्यात आल्याचे म्हटले आहे.
- पालमिरा येथे पकडलेल्या २० सीरियन सैनिकांची छायाचित्रे इसिसने त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहेत.
- पालमिरामधील नागरिकांच्या शहराबाहेर पडण्यावर वा इतरांना शहरामध्ये येण्यावर इसिसने निर्बंध घातले असून; येथील पाणी, वीजपुरवठा वा दूरध्वनी यांसारख्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
- पालमिरा शहर इसिसच्या कचाट्यामधून सोडविण्यासाठी सीरियन सैन्य शहरापासून जवळच काही अंतरावर मोठी तयारी करत असल्याचे वृत्त देण्यात आले आहे.
ऍड. एकनाथ आवाड यांचे निधन
- दलित चळवळ, गायरान हक्क चळवळीचे लढवय्ये नेते, मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. एकनाथ दगडू आवाड ऊर्फ जिजा (वय ६४) यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.
- ऍड. आवाड यांनी पोतराज प्रथा बंद करण्यासाठी कायम पुढाकार घेतला. यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही झाले.
- रेशनकार्डसाठी आंदोलनाने त्यांच्या सामाजिक कार्याला सुरवात झाली. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही सक्रिय सहभाग नोंदविला.
- स्वत:च्या वकिली पदवीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव यावे म्हणून त्यांनी एक वर्ष उशिराने परीक्षा दिली.
- मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ हा लढा उभारला. त्यातून अनेक दलित आणि मातंग समाजातील लोकांना गायरान जमिनी मिळाल्या.
भारतीय वंशाचे परविंदर सिंग बट ब्रिटनमध्ये महापौर
- भारतीय वंशाचे परविंदर सिंग बट यांनी २२ मे २०१५ रोजी युनायटेड किंग्डममधील वोकिंघम शहराचे महापौर पद ग्रहण केले. या पदावर विराजमान होणारे ते पहिले शीख व्यक्ती आहेत.
- आधी परविंदर यांनी या शहराचे उपमहापौर म्हणून देखील काम पाहिले आहे. कंझरव्हेटीव पक्षाचे परविंदर मुळचे पंजाबचे आहेत.
- क्लार्क यांची जागा घेणारे परविंदर २०१७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. आजपर्यंत ब्रिटनमध्ये कोणतीही शीख व्यक्ती महापौर होऊ शकली नव्हती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा