चालू घडामोडी : ४ जानेवारी


आयकर विभागाची नवीन नियमावली

  • येत्या एप्रिल महिन्यापासून आयकर विभाग नवीन नियम लागू करणार आहे. 
  • त्याआधारे रोख ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी, जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री, मुदत ठेवी आणि परकीय चलन देवाणघेवाणी सारखे मोठे व्यवहार तुम्हाला किंवा तुमच्या वकिलांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवतील.
या नवीन नियमानुसार खात्यात १० लाखांपेक्षा अधिक
रक्कम जमा केली तर काय होईल...
  • पेमेंट: निश्चित रक्कमेपेक्षा जर तुम्ही अधिक पैसे बँक, कंपनी किंवा वकील-सीएसारख्या कोणत्‍याही प्रोफेशनलला देत असाल तर त्याची माहिती आयटी डिपार्टमेंटला देणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन फॉर्मेटचा फॉर्म ६१ए लागू करण्यात आला आहे.
  • इम्मूवेबल प्रॉपर्टी: ३० लाखांपेक्षा अधिक खरेदी-विक्रीची माहिती रजिस्ट्रार ऑफिसला द्यावी लागणार आहे.
  • प्रोफेशनल : कोणत्याही सेवेबद्दल (जसे वकील, सीए) यांना दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम देणार असाल तर त्याची सूचना आयटी डिपार्टमेंटला देणे बंधनकारक राहणार आहे.
  • बँक : पोस्ट ऑफिसची एफडी : खात्यात वर्षभरामध्ये १० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल तर बँक त्याची माहिती आयटी डिपार्टमेंटला देईल. एफडीसाठीसुद्धा १० लाखांचीच मर्यादा ठेवण्यात येणार आहे. एफडीच्या रिन्युअलवर हा नियम लागू असणार नाही.
  • क्रेडिट कार्ड : कार्डच्या माध्यमातून १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक बिल पेमेंट किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून 10 लाखांपेक्षा अधिक पेमेंट जमा केले तर त्याची माहिती आयटी डिपार्टमेंटकडे पोहोचेल.
  • बँक ड्राफ्ट : वर्षभरात १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमीचे ड्राफ्ट बनववले तर बँक त्याची माहिती सरकारला देईल.
  • करंट अकाउंट : एका वर्षात कुणाही व्यक्तीच्या  व्यक्तीच्या खात्यात ५० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची ठेवी किंवा विड्रॉअलची माहिती बँक आयटी डिपार्टमेंटला देईल.
  • शेयर, फंड, बाँण्ड : कुणीही व्यक्ती कोणत्याही कंपनीचे शेअर, म्यूचुअल फंड, बॉण्ड किंवा डिबेंचरमध्ये एका वर्षात १० लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करत असेल तर त्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागेल.

लोढा समितीचा अहवाल प्रसिध्द

  • बीसीसीआयमध्ये प्रशासकीय सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त सरन्यायाधीश आरएम लोढा यांच्या समितीने ४ जानेवारी रोजी आपला अहवाल सार्वजनिक केला. या अहवालामध्ये समितीने अनेक सुधारणा सुचवल्या आहेत.
 लोढा समितीच्या शिफारसी 
  • आयपीएल आणि बीसीसीआयसाठी स्वतंत्र नियामक स्थापन करण्याची लोढा समितीची 
  • आयपीएल प्रशासकीय समितीला पूर्ण स्वायत्तता देण्यात येऊ नये. आयपीएल प्रशासकीय समिती 'गव्हर्निंग कौन्सिल' या नावाने ओळखली जावी. त्यात ९ सदस्य असतील. 
  • मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यांना बीसीसीआयमध्ये पदाधिकारी बनवू नका. 
  • क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची लोढा समितीची शिफारस. 
  • बीसीसीआयमध्ये प्रत्येक राज्यातून एकाच क्रिकेट संघटनेला प्रतिनिधीत्व आणि मताधिकार मिळावा.
  • बीसीसीआयमध्ये सलग दोन टर्म पदे भूषवल्यानंतर पुन्हा नियुक्ती करु नये.
  • बीसीसीआयच्या लेखापरीक्षकांमध्ये कॅगच्या अधिकाऱ्याचा समावेश करावा.
  • बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच वय ७० पेक्षा जास्त नसावे.
  • लोकपाल, नीतिमत्ता अधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
  • खेळाडूंना समस्या मांडता याव्यात यासाठी मोहिंदर अमरनाथ, अनिल कुंबळे, डायना एडलजी यांच्या सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली खेळाडूंची संघटना.
  • रेल्वे, सैन्यदल आणि विश्वविद्यालयाच्या संघांना केवळ सहसदस्यत्व दिलं जावं. मतदानाचा अधिकार त्यांना नसावा.
  • आयपीएलचे माजी सीओओ सुंदररमण यांच्याविरोधात ठोस पुरावे नाहीत.
 ए.पी. शहा बीसीसीआयचे लोकपाल 
  • अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए.पी. शहा यांची नोव्हेंबर महिन्यात लाेकपाल म्हणून नियुक्ती केली.
  • बीसीसीआयमध्ये लोकपाल यांच्या कक्षेत अंतर्गत वाद सोडवणे, मंडळ आणि त्यांचे सदस्य, असोसिएट सदस्य यांच्यातील वाद सोडवणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियम मोडले आहेत काय, खेळाडू, टीम अधिकाऱ्यांच्या तक्रारी पाहणे आदी प्रमुख बाबी असतील.

अरुणिमाने अर्जेंटिनात फडकवला तिरंगा

  • कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाने अरुणिमाने अकोनकागुआ (अर्जेंटिना) हे आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर फत्ते करण्याची कामगिरी केली आहे.
  • अरुणिमाने ७ समिट मोहिमेत जगातील पाच सर्वात उंच पर्वतशिखरे सर केली आहेत. कृत्रिम पायांच्या साहाय्याने अशी कामगिरी करणारी ती एकमेव महिला आहे.
  • २०११ मध्ये धावत्या पद्मावती एक्स्प्रेसमध्ये बॅग व सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांना अरुणिमाने प्रतिकार केला. यामुळे चोरट्यांनी तिला रेल्वेबाहेर फेकले. या घटनेत तिला एक पाय गमवावा लागला होता.

महाशहरांच्या यादीत दिल्ली व मुंबईचा समावेश

  • जगातील शक्तिशाली, उत्पादक व संपर्क जोडणी उत्तम असलेल्या तीस महाशहरांच्या यादीत दिल्ली व मुंबई यांचा समावेश झाला आहे. जेएलएल या इंटरनॅशनल रिअल इस्टेट कन्सलटन्सीने केलेल्या अभ्यासानुसार या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई २२व्या तर दिल्ली २४व्या क्रमांकावर आहे.
  • यात टोकियो सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर न्यूयॉर्क, लंडन व पॅरिस यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये जगातील महाशहरात असलेल्या गुंतवणुकीच्या पन्नास टक्के परदेशी भांडवलाची गुंतवणूक झालेली आहे.
  • या तीस महाशहरांमध्ये एकूण ६४ टक्के आंतरराष्ट्रीय गुंतवणूक झालेली असून त्यात या शहरांचा व्यावसायिक, आर्थिक, स्थावर मालमत्ता यातील प्रमुख केंद्रे व दर्जा या निकषांवर यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारताला ‘सॅफ कप’ स्पर्धेचे विजेतेपद

  • चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अंतिम फेरीत गतविजेत्या अफगाणिस्तान संघावर २-१ने मात करून दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (सॅफ) कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • भारताचे हे या स्पर्धेतील सातवे विजेतेपद आहे. मागील स्पर्धेत अफगाणिस्तानने भारतावर मात करून विजेतेपद मिळवले होते. या पराभवाची परतफेड भारताने केली.
  • या स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान आतापर्यंत अपराजित होते. दोन्ही संघांनी स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर हुकूमत गाजवली होती. जागतिक क्रमवारीत अफगाणिस्तान १५०व्या, तर भारत १६६व्या क्रमांकावर आहे.

दुसऱ्या एसबीआयइनटच शाखेचे उद्घाटन

  • भारतीय स्टेट बँकेने दुसऱ्या एसबीआयइनटच शाखेची सुरुवात मुंबईत कुलाबा येथे केली. याचे उद्घाटन बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केले. स्टेट बँकेने यावेळी व्हिडिओ संवादाची सुविधा असलेले स्मार्ट एटीएमदेखील सुरू केले.
  • इनटच शाखेची कल्पना देशातील तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून २०१५पासून बँकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा देणारे दालन असे या शाखेचे स्वरूप आहे.

अंडर-१९ वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियाची माघार

  • ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्ड कप-२०१६ मधून माघार घेतली आहे. या माघारीमागे बांगलादेशातील सुरक्षिततेच्या मुद्यावर सरकार दुविधेत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ३ सदस्यीय कमिटीला बांगलादेशमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बांगलादेशात पाठवले होते. यानंतर त्या कमिटीने बांगलादेश टूरच्या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी बांगलादेशमधील स्थिती ऑस्ट्रेलियासाठी चांगली नाही असे सांगितले होते.
  • ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कप-२०१६ साठी ग्रुप-डीमध्ये आहे. या शिवाय ग्रुपमध्ये भारत, नेपाळ आणि न्यूझीलंड हे संघ आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा