चालू घडामोडी : ९ जानेवारी


‘स्टँड अप’ योजनेला केंद्राची मंजुरी

    Mary Barra
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा केलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या घोषणेतील एका अंगाच्या म्हणजेच ‘स्टँड अप’ योजनेच्या कार्यान्वयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • या योजनेतून ‘भारतीय लघुउद्योग विकास बँक’ अर्थात सिडबीच्या माध्यमातून SC/ST व महिलांमधील उद्यमशीलतेला वित्तीय पाठबळ दिले जाणार आहे. त्यासाठी सिडबीकडे प्रारंभिक १०,००० कोटी रुपयांच्या भांडवलाची सज्जता केली गेली आहे. 
  • आगामी ३६ महिन्यांत या योजनेचा लाभ किमान अडीच लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य सरकारने  समोर ठेवले आहे.
  • ही एक प्रकारची वंचित समाजघटकांतील उद्योजकांसाठी पत हमी यंत्रणा असून, ती राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनी (एनसीजीटीसी)च्या अखत्यारीत कार्यान्वित होईल.
 स्टँड-अप योजनेवर दृष्टिक्षेप 
  • लाभार्थी : अनुसूचित जाती-जमातीतून प्रवर्तित उद्योग आणि महिला उद्योजिका
  • लाभ : बिगरकृषी क्षेत्रातील नव्या दमाच्या उपक्रमांना रु. १० लाख ते रु. १ कोटीपर्यंत बँकांकडून कर्ज उपलब्धता
  • बँकांच्या प्रत्येक शाखांमधून किमान दोन उद्योजकांना या योजनेत सहभागासाठी प्रोत्साहित केले जावे.
  • कर्जाची परतफेड ही कमाल सात वर्षे कालावधीत केली जाईल.
  • उद्योजकाचे अंशदान : प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के हे उद्योजकाचे अंशदान (मार्जिन मनी) व उर्वरित कर्जरूपाने उपलब्ध केले जाईल.
  • कर्जाच्या उपलब्धतेसाठी प्रोत्साहनासह, प्रत्यक्ष उद्योग परिचालनाच्या टप्प्यातही विविधांगी साहाय्य दिले जाईल.
  • केंद्रीय अर्थमंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग योजनेचा समन्वयक, तर राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनी (एनसीजीटीसी) कडून योजनेचे संचालन आणि वितरित कर्जाची हमीही घेतली जाईल.
  • राज्यातील तत्सम योजनांसह ही योजना सम्मीलित करून लाभार्थ्यांना अधिकचे फायदेही देता येतील.

जनरल मोटर्सच्या अध्यक्षपदी मेरी बॅरा

    Mary Barra
  • अमेरिकेतील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्स (जीएम)च्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांची कंपनीच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे. कंपनीच्या इतिहासात एखाद्या महिलेच्या रूपात प्रथमच हा दुहेरी पदमानाचा मुकुट विराजमान झाला आहे.
  • कर्मचारी ते संचालक या पदावर पोहोचलेल्या ५४ वर्षीय मेरी या कंपनीतील एकमेव व्यक्ती आहेत. कंपनीच्या संचालक मंडळातील १२ सदस्यांपैकी सध्याचे अध्यक्ष थेओडोर सोल्सो यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. तर सोल्सो आता कंपनीचे स्वतंत्र संचालक राहतील.
  • मेरी बॅरा या जानेवारी २०१४ मध्ये जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनल्या होत्या. एखाद्या वाहन कंपनीच्या सीईओ असणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या वेळी ठरल्या होत्या.

प्रियंकाला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड

  • बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने अमेरिकेतील टी.व्ही. मालिका श्रेणीतील २०१६चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे.
  • अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला. या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली होती.
  • पीपल्स चॉईस श्रेणीत प्रियंकासमोर एमा रॉबर्टस्, जेमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्शिया गे हार्डन यासारख्या प्रसिद्ध हॉलीवूड-टीव्ही अभिनेत्रीचे आव्हान होते.
  • या पुरस्काराची निवड चाहत्यांच्या मतदानाद्वारे करण्यात येते. हा अवॉर्ड पटकावणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

मराठी उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण

  • मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्या ३५व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा उद्योजकांना ‘मराठी उद्योगभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
  • एम-इंडिकेटर या लोकप्रिय मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करणारे सचिन टेके, मौज प्रकाशनगृहाचे माधवराव भागवत, वास्तुविशारद शशिकांत देशमुख, विनकोट प्रा.लि.चे प्रदीप ताम्हाणे, अभिनेते व निर्माते प्रशांत दामले आणि हॉटेल आस्वादचे श्रीकृष्ण सरजोशी यां सहा उद्योजकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

३ टिप्पण्या: