चालू घडामोडी : १ जानेवारी


पॅन कार्डच्या वापरासाठी नवी नियमावली

    Pan Card
  • ब्लॅक मनी रोखण्यासाठी तसेच कॅशलेस व्यवहाराला (ट्रान्सझेक्शन) प्रोत्साहन देण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्डच्या वापरासाठी नवी नियमावली बनवली आहे. १ जानेवारी २०१६ पासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • कोणकोणत्या व्यवहारावर आपल्याला पॅनकार्ड आवश्यक असेल याची यादी खालीलप्रमाणे...
दैनंदिन जीवन
  • हॉटेल किंवा रेस्तरॉचे ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे बिल कॅशमध्ये भरताना
  • तुम्ही परदेशात असाल आणि तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सी, करन्सी कन्व्हर्जन अथवा कोणतेही बिल कॅशमध्ये भरताना
  • २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे दागिने कॅशमध्ये खरेदी करताना
बचत अथवा गुंतवणूक
  • बॅंकेच्या योजना, पोस्ट ऑफिस स्कीम्स, एनबीएफसी अथवा डिपॉजिट स्कीममध्ये वर्षाला ५ लाख रुपयांचा व्यवहार करताना
  • एका वर्षात म्युचुअल फंडमध्ये ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करताना
  • डीमॅट अकाउंट उघडताना, शेयर खरेदी करताना अथवा एखाद्या अनलिस्टेड कंपनीत वर्षाला १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपये गुंतवताना
  • ५० हजार ते त्यापेक्षा जास्त रुपयांचे रोखे (बॉन्ड्स) खरेदी करताना
  • एका वर्षात ५० हजार ते त्यापेक्षा जास्त रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे एलआयसी किंवा विमा योजनेचे प्रीमियम भरताना
बॅंकिंग
  • ५० हजार ते त्यापेक्षा जास्त रुपयांचा ड्राफ्ट बनवताना
  • ५० हजार ते त्यापेक्षा जास्त रुपयांचा रोख, चेकने व्यवहार करताना
  • ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांची कॅश बॅंकेत डिपॉझिट करताना
  • कॅश कार्ड योजना अथवा प्रीपेड इंस्ट्रूमेंट्समध्ये ट्रान्सझेक्शन करताना
रियल इस्टेट
  • १० लाख ते त्यापेक्षा जास्त रुपयांची प्रॉपर्टी खरेदी किंवा विकताना
  • खरेदीच्या व्यवहारासाठी १० लाख ते त्यापेक्षा जास्त किमतीचे स्टॅम्प घेताना
विशेषतः बँकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करावा.

गोलंदाजांच्या यादीत अश्विन प्रथम

    R Ashwin
  • भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गोलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे. मागच्या सहा वर्षांपासून अव्वल असलेल्या द. आफ्रिकेच्या डेल स्टेनला अश्विनने मागे टाकले.
  • अश्विनच्या करिअरची ही सर्वश्रेष्ठ रँकिंग आहे. वर्षभरात त्याने ९ कसोटी सामने खेळताना ६२ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावे ८७१ रेटिंग गुण आहेत. द. आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन त्याच्यापेक्षा ४ गुणांनी मागे ८६७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
  • आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविणारा अश्विन हा माजी लेफ्टआर्म फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांच्यानंतर दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बेदीने १९७३ मध्ये नंबर वन बनून भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता.
  • याशिवाय भागवत चंद्रशेखर, कपिल देव आणि अनिल कुंबळे असे भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले होते. परंतु या दिग्गजांना प्रथम स्थानावर विराजमान होण्याची संधी मिळाली नाही.
  • नंबर वन ऑलराउंडर : अष्टपैलूंच्या क्रमवारीतही अश्विन नंबर वन आहे. मागच्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा अश्विन अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे. बांगलादेशचा सकिबने या वर्षी नंबर वन अष्टपैलू म्हणून सुरुवात केली होती. तो आता दुसऱ्या स्थानी आहे.
 फलंदाजांच्या क्रमवारीत स्टिव स्मिथ अव्वल 
  • फलंदाजांच्या क्रमवारीत स्टिव स्मिथ याने पहिले स्थान मिळविले आहे. आयसीसीने नुकतेच त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून घोषित केले होते.
  • क्रमवारीत पहिले स्थान मिळविणारा स्मिथ हा तिसरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आहे. यापूर्वी रिकी पाँटिंग (२००५, २००६) आणि मायकेल क्लार्क (२०१२) हे पहिल्या स्थानावर होते.

चेक बाउन्सची तक्रार स्थानिक पातळीवर

  • याविषयीच्या ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट (सुधारणा) कायदा, २०१५’ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे नव्या वर्षात चेक बाउन्सच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होणार आहे.
  • एखाद्याने दिलेला धनादेश (चेक) परत गेल्यास किंवा बाउन्स झाल्यास त्याविषयीची तक्रार हायकोर्टात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर करता येणार आहे.
  • देशात चेक बाउन्स होण्याच्या १८ लाख घटना घडल्या असून त्यापैकी ३८ हजार घटनांची परिणती हायकोर्टातील दाव्यांमध्ये झाली आहे. यातील काही प्रकरणांत चेक देणारी बँक व तो वटवणारी बँक वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने कोर्टासाठी गुंतागुंत वाढली आहे. यामुळे चेक न वटल्याप्रकरणी न्यायालयात गेलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी विलंब होत आहे.
  • हा विलंब टाळण्यासाठी चेक मिळालेल्या पण तो बाउन्स झाल्याने पैसे न मिळालेल्या व्यक्तीची बँक कार्यरत असलेल्या परिक्षेत्रातील स्थानिक कोर्टातच त्याविरोधात तक्रार करावी लागणार आहे. याविषयी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यात नुकतीच सुधारणा सुचवण्यात आली होती. याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिली आहे.
  • बाउन्स झालेला चेक देणाऱ्या व्यक्तीविरोधात वरील तक्रार असणार आहे. ही तक्रार ज्या कोर्टात दाखल केली जाईल, त्याच कोर्टात त्या व्यक्तीविषयीच्या सर्व तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत. यासाठी ती व्यक्ती रहात असलेले कायद्याचे परिक्षेत्र वेगळे असले तरी ते विचारात घेतले जाणार नाही. यालाही राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.

द. आफ्रिकेत राजा दलिंदयेबोंना १२ वर्षांची कैद

  • दक्षिण आफ्रिकेतील १० अधिकृत राजांपैकी असलेल्या बुएलेखाया दलिंदयेबो यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रजेवर अन्याय केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत त्यांना २० वर्षांची कैद ठोठावली आहे. तुरुंगात जाणारे ते दक्षिण आफ्रिकेतील पहिलेच राजे आहेत.
  • बुएलेखाना थेंबू प्रदेशाचे राजे आहेत. प्रदेशाची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे ते भाचे आणि दक्षिण आफ्रिकेतील अधिकृत १० राजांमध्ये त्यांचा समावेश होतो.
  • दलिंदयेबो यांच्यावर एका महिला आणि चार मुलांचे अपहरण, त्यांच्या घराला आग लावणे, मारहाण करण्याचा आरोप होता. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता.
  • पारंपरिक न्यायालयात त्यांनी हजेरी लावली नव्हती. ऑक्टोबरमध्ये दलिंदयेबो यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यामुळे आता त्यांचा मुलगा प्रिन्स अजेनेथी यांच्याकडे राजेपद गेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा