सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये विजयी
- भारताच्या सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सानिया-मार्टिना या दोघींचे हे सलग सहावे आणि एकूण दहावे विजेतेपद ठरले.
- महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित सानिया-मार्टिना यांनी अँजेलिक किर्बर-अँड्रीया पेटकोविच या जर्मन जोडीवर ७-५, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. सानिया-मार्टिना यांचा हा सलग २६ वा विजय ठरला.
- जगातील नंबर वन सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस सत्रातील पहिल्याच टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरल्या आहेत. या जोडीने सत्राला दमदार सुरुवात करताना ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.
व्हिक्टोरिया अझारेंकाला एकेरीचे जेतेपद
- बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने महिला एकेरीच्या फायनलमध्ये इटलीच्या एंजेलिक केर्बरवर ६-३, ६-१ ने मात केली.
गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
- गुजरातमध्ये ११ जानेवारीपासून २७व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला अहमदाबादेतील साबरमती रिव्हर फ्रंट मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते या महोत्सवाचे झाले.
- या महोत्सवामध्ये शंभरपेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय पतंगतज्ज्ञ सहभागी झाले असून विविध रंगांच्या पतंगामुळे आकाश कलरफूल झाले आहे.
- पारंपरिक पतंगांप्रमाणेच परदेशी बनावटीच्या पतंगांनाही गुजरातमध्ये मोठी मागणी आहे. विविध प्राणी, व्हेल, शार्क मासे आणि कोब्रा आकाराच्या पतंगांची आकाशात गर्दी झालेली दिसून येते.
- हा महोत्सव १४ जानेवारीपर्यंत राजकोट, सुरत, बडोदा, भावनगर, मांडवी, पारेबंदर, कॅम्बे गीर, सोमनाथ आदी शहरांमध्ये सुरू राहील.
पाकिस्तान शेअर बाजाराला सुरुवात
- पाकिस्तान शेअर बाजाराला ११ जानेवारी २०१६पासून सुरुवात झाली आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज (पीएसएक्स) हे कराची स्टॉक एक्स्चेंजचे नवे रूप आहे. त्यासाठी लाहोर व इस्लामाबाद स्टॉक एक्स्चेंजचे विलिनीकरण कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये करण्यात आले आहे.
- लाहोर व इस्लामाबाद शेअर बाजारातील ब्रोकर्सना नव्या शेअर बाजारात व्यवहार करता यावेत यासाठी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
- पीएसएक्सचे अध्यक्ष : जफर हिजाझी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा