- केंद्र सरकारने नव्या पीक विमा योजनेला मंजुरी असून पंतप्रधान पीक विमा योजना असे नव्या योजनेचे नाव आहे. 'एक देश एक योजना' या तत्वानुसार नवी कृषी विमा योजना देशभरात येत्या जून महिन्यापासून म्हणजेच खरीप हंगामापासून लागू करण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी कमी दराचा प्रीमियम, दाव्यांचा जलद निपटारा आणि सरकारने उचललेला प्रीमियमचा भार ही नव्या पीक योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
- या योजनेसाठी केंद्राने ८८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळणार आहे.
- गेल्या तीन दशकात राबविण्यात आलेल्या विमा योजनांचा लाभ केवळ २३ टक्के शेतकऱ्यांनाच झाला. नव्या योजनेत देशातील किमान ५० टक्के शेतकरी सहभागी होतील, असे केंद्र सरकारने लक्ष्य ठेवले आहे.
 
| क्र. | वैशिष्टये | राष्ट्रीय पीक विमा योजना(१९९९) | सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजना(२०१०) | पंतप्रधान पीक विमा योजना(२०१६) | 
|---|---|---|---|---|
| १ | हफ्त्याची रक्कम | कमी | जास्त | राष्ट्रीय पीक विमा योजनेपेक्षा कमी | 
| २ | एक हंगाम एक हफ्ता | होय | नाही | होय | 
| ३ | सुरक्षित विमा रक्कम | संपूर्ण | मर्यादित | संपूर्ण | 
| ४ | खात्यात भरणा | नाही | होय | होय | 
| ५ | स्थानिकृत जोखीम संरक्षण | नाही | गारपीट, दरड कोसळणे | गारपीट, दरड कोसळणे, पूर | 
| ६ | सुगीपश्चात नुकसान संरक्षण | नाही | किनारी भाग चक्रीवादळ पाऊस | वादळ +अवकाळी पाऊस | 
| ७ | प्रतिबंधात्मक लागवड संरक्षण | नाही | होय | होय | 
| ८ | तंत्रज्ञानाचा वापर | नाही | संकल्पित | बंधनकारक | 
| ९ | जागृती | नाही | नाही | होय (संरक्षण ५० टक्के इतके दुप्पट करण्याचे लक्ष्य) | 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा