भारताच्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सुधारणा नाही
- ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांकाच्या अहवालानुसार भारतातील भ्रष्टाचारात २०१४सालापासून काहीही फरक पडला नसल्याचे आढळून आले आहे.
- २०१४मध्ये भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक (करप्शन परसेप्शन इंडेक्स (सीपीआय)) ३८ इतका होता व भारत ८५व्या क्रमांकावर होता. २०१५मध्ये भारताच्या क्रमांकामध्ये सुधारणा होऊन तो ७६व्या स्थानावर पोचला आहे. परंतु सीपीआय मात्र ३८च राहिला आहे.
- देशातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारला आणखी बरेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
- पाकिस्तान हा सार्क राष्ट्रांमधील असा एकमेव देश आहे ज्याच्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सुधारणा झाली आहे.
भारताशेजारील देशांची स्थिती | ||
---|---|---|
देश | क्रमांक | सीपीआय |
भूतान | २७ | ६५ |
चीन | ८३ | ३७ |
पाकिस्तान | ११७ | ३० |
नेपाळ | १३० | २७ |
बांगलादेश | १३९ | २५ |
म्यानमार | १४७ | २२ |
अफगाणिस्तान | १६६ | ११ |
डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे निधन
- साहित्यकृतींचा नव्याने वेध घेत, अभिजात रसिकतेची साक्ष पटविणारे ज्येष्ठ समीक्षक दत्तात्रेय भिकाजी ऊर्फ डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे २७ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
- मराठी साहित्यातील समीक्षेचा मानदंड असणारे ‘दभि’ हे सौंदर्यवादी, सैद्धांतिक समीक्षेसाठी ओळखले जात.
प्रकाशित साहित्य | ||
---|---|---|
अंतरिक्ष फिरलो पण.. | अन्यनता मर्ढेकरांची | अपार्थिवाचा यात्री |
स्वरूप व समीक्षा, चौदावे रत्न | जीएंची महाकथा | मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन |
देवदास आणि कोसला | जुने दिवे | अपार्थिवाचे चांदणे |
ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती | नवे दिवे | महाकाव्य : स्वरूप व समीक्षा |
मराठी वाङ्मयाचा इतिहास | दुसरी परंपरा | समीक्षेची चित्रलिपी |
पहिली परंपरा | द्विदल | हिमवंतीची सरोवरे |
पार्थिवतेचे उदयास्त | पस्तुरी | पोएट बोरकर |
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती : बिल गेट्स
- वेल्थ-एक्स कंपनीने नव्याने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. गेट्स यांच्याकडे ८७.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५.९ लाख कोटी इतकी संपत्ती आहे.
- यादीत इंडीटेक्स फॅशन ग्रुपचे अमाचिओ ओर्टेगा दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ४.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. ब्रेकशिरे हथवेचे वॉरेन बफेट ४.१ लाख कोटी संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
- रिलायन्य उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांना भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती म्हणून यादीत २७व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. अंबानींशिवाय अजीम प्रेमजी व दिलीप संघवी या भारतीय उद्योजकांनाही टॉप-५० मध्ये स्थान मिळाले आहे.
- या यादीतील टॉप-५० मध्ये २९ व्यक्ती अमेरिकेच्या आहेत.
या यादीतील टॉप-१० व्यक्ती | |||
---|---|---|---|
क्रमांक | नाव | संपत्ती (हजार कोटी रु.) | कंपनी |
१ | बिल गेट्स | ५९० | मायक्रोसॉफ्ट |
२ | अमाचिओ ओर्टेगा | ४५० | इंडीटेक्स फॅशन ग्रुप |
३ | वॉरेन बफेट | ४१० | ब्रेकशिरे हथवे |
४ | जॅफ बेजॉन | ३८० | अमेजन |
५ | डेव्हिड कोच | ३२० | कोच इंडस्ट्रीज |
६ | चार्ल्स कोच | ३१० | कोच इंडस्ट्रीज |
७ | लॅरी एलिसन | ३०० | ओरेकल कार्पोरेशन |
८ | मार्क झुकरबर्ग | २९० | फेसबुक |
९ | मायकल ब्लूमबर्ग | २८० | ब्लूमबर्ग ग्रुप |
१० | इनग्वार कम्पर्ड | २६० | रिटेल कंपनी IKEA |
२७ | मुकेश अंबानी | १६९ | रिलाइन्स समूह |
४३ | अजीम प्रेमजी | ११२ | विप्रो |
४४ | दिलीप संघवी | १११ | सन फार्मा |
१९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वकप २०१६
- स्थान व कालावधी : बांगलादेशमध्ये २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान
- एकूण संघ : १६ (गट ४) [सुरक्षांच्या कारणांमुळे ऑस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.]
- एकूण सामने : ४८ (७ मैदानांवर)
- भारत ‘ड’ गटात असून या गटातील इतर सदस्य : आयर्लंड, नेपाल, न्यूझीलंड
- भारतीय संघाचा कर्णधार : ईशान किशन
- भारतीय संघाचा प्रशिक्षक : राहुल द्रविड
- भारताने यापूर्वी २०००. २००८ व २०१२ अशा तीन वेळा १९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वकप जिंकला आहे.
पाकिस्तानात ४ लाख पॉर्न साइट्स ब्लॉक
- या पॉर्न साइट्सच्या माध्यमातून अश्लील साहित्याचा फैलाव होत असल्याने त्याचा युवा पीढीवर दुष्परिणाम होत आहे, असा ठपका ठेऊन पाकिस्तानात ४ लाख पॉर्न साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
- पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने अशा साइट्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दूरसंचार प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.
- डोमेन स्तरावर या साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. दूरसंचार प्राधिकरणाने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.
- भारतातही अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती मात्र, ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली होती.
एस. मोहम्मद युनूसला शौर्य पदक
- चेन्नईतील पुरात अडकलेल्या तब्बल २१०० जणांना वाचवणाऱ्या २६ वर्षीय एस. मोहम्मद युनूस या वीराला तामिळनाडू सरकारने ‘अण्णा मेडल फॉर गॅलन्ट्री’ या पुरस्कारानं सन्मानित केले आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झालेल्या कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- १७ नोव्हेंबरला मुसळधार पावसामुळे चेन्नईवर पुराचे संकट कोसळले होते. त्यावेळी युनूसने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सहकाऱ्यांच्या मदतीनं १५०० जणांचे प्राण वाचवले होते. जवळपास ३०० घरांमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली होती.
- त्यानंतर २ डिसेंबरलाही चेन्नई पाण्याखाली गेली होती. त्यावेळी ६०० जणांना त्यानं वाचवलं होते. उरापक्कम येथे गरोदर महिला आणि तिच्या पतीचे प्राण वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केलं होते.
स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू डेन्मार्कमध्ये होणार जप्त
- सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे. यानुसार स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (१३४० युरो, १००० पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.
- गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये २१,००० स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे.
- डेन्मार्कच्या संसदेत ८१ विरुद्ध २७ अशा मतांनी यास मंजूरी मिळाली. या कायद्यानुसार साखरपुड्याची अंगठी, चित्रे, सजावटीच्या वस्तू, बक्षीस-पदके स्थलांतरितांना आपल्या जवळ बाळगता येणार आहेत. मात्र घड्याळ, मोबाइल, कॉम्प्यूटर्स जप्त केले जाऊ शकतात.
- स्वित्झर्लंडने याआधीच स्थलांतरितांकडून पैसे काढून घेतलेले आहेत. ११२ स्थलांतरितांकडून २,१०,००० स्वीस फ्रँक्स त्यांनी गोळा केलेले आहेत तर नेदरलँडसने प्रतीव्यक्ती ५,८९५ युरो व प्रती कुटुंब ११,७९० युरो खर्चापोटी वसूल केलेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा