
कण्हत कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकविणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या कवितांतून व गीतांतून रसिकांना अखंड जीवनानंद दिला. कविता हा माझा श्वास आहे, असे कायम म्हणणारे पाडगावकर हे खरे आनंदयात्री कवी होते.
मंगेश पाडगावकरांचा जीवनपट
जन्म : १० मार्च १९२९ (वेंगुर्ला)
पूर्ण नाव : मंगेश केशव पाडगांवकर
शिक्षण : मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए.
कारकीर्द : काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवला.
१९५३ ते १९५५ अशी दोन वर्षे साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणूनही काम केले.
मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणून केले.
युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस येथे मराठी विभागाचे मुख्य संपादक म्हणून काही वर्षे काम करून, १९८९मध्ये निवृत्त झाले.
पाडगावकर आणि कविता
वयाच्या १४व्या वर्षापासूनच ते कविता करत असत. कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. मात्र ते कोणत्याच साच्यात अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. प्रेमकविता, भावगीते, बालगीते, निसर्गकविता असे विविध प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. त्यांच्या कविता जीवनरसाशी समरस झालेल्या होत्या, त्यामुळे प्रत्येकाला त्या कविता आपल्याच वाटल्या.
पाडगावकर, विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम १९६०-७०च्या दशकांत राज्यभर झाले. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही त्यांची गीते प्रचंड गाजली.
गाजलेली काही गीते | ||
---|---|---|
असा बेभान हा वारा | अशी पाखरे येती | भातुकलीच्या खेळामधली |
भेट तुझी माझी स्मरते | दिवस तुझे हे फुलायचे | शुक्रतारा मंदवारा |
सांग सांग भोलानाथ | लाजून हासणे अन् हासून ते पहाणे | सावर रे, सावर रे उंच उंच झुला |
प्रकाशित कवितासंग्रह | ||
---|---|---|
धारानृत्य | जिप्सी | छोरी |
वात्रटिका | शर्मिष्ठा | उत्सव |
निंबोणीच्या झाडामागे | कविता माणसाच्या माणसासाठी | तुझे गीत गाण्यासाठी |
भोलानाथ | मीरा | विदुषक |
सलाम | भटके पक्षी | गझल |
बोलगाणी | चांदोमामा | सुट्टी एक्के सुट्टी |
वेडं कोकरू | उदासबोध | सूरदास |
आनंदऋतू | काव्यदर्शन | गिरकी |
त्रिवेणी | कबीर | मोरू |
नाटक | ||
वादळ | ज्युलिअस सीझर | रोमिओ आणि ज्युलिएट |
गौरव |
---|
अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, (२०१०) |
अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (२०१०) |
पुरस्कार |
---|
साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०) : सलाम या कवितासंग्रहासाठी |
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००८) |
पद्मभूषण पुरस्कार (२०१३) |
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (२०१३) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा