प्रश्नसंच ५६ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] घरातील सिलेंडरमध्ये LPG वायू कोणत्या स्थितीत असतो?
१] स्थायू
२] द्रव
३] वायू
४] स्थायू आणि द्रव

उत्तर
२] द्रव
------------------
[प्र.२] समुद्राचे खारट पाणी कोणत्या प्रक्रियेने शुद्ध करतात?
१] बाष्पीभवन
२] उर्ध्वपातन
३] प्रभाजी उर्ध्वपातन
४] उत्कलन

उत्तर
२] उर्ध्वपातन
------------------
[प्र.३] चुकीचे विधान ओळखा.
अ] मिथेन छपाईची शाई तयार करण्यासाठी वापरतात.
ब] ग्लिसरीन डायनामाईट तयार करण्यासाठी वापरतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
------------------
[प्र.४] पावसाचे पाणी खडकांवर पडल्यावर काय होते?
1] पाण्यात सोडियम क्लोराईड मिसळते.
२] पाण्यात सोडियम कार्बोनेट मिसळते.
३] पाण्यात नायट्रोजन वायू मिसळतो.
४] पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.

उत्तर
४] पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.
------------------
[प्र.५] कोणत्या प्रक्रियेने कच्च्या तेलापासून गेसोलीन मिळवतात?
१] बाष्पीभवन
२] उर्ध्वपातन
३] प्रभाजी उर्ध्वपातन
४] उत्कलन

उत्तर
३] प्रभाजी उर्ध्वपातन
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या द्रावणातून विद्युतधारा वाहते?
१] ग्लिसरीन
२] अल्कोहोल
३] युरिया
४] हायड्रोक्लोरिक आम्ल

उत्तर
४] हायड्रोक्लोरिक आम्ल
------------------
[प्र.७] टंगस्टन स्टील मध्ये खालीलपैकी काय नसते.
अ] लोह
ब] कार्बन
क] निकेल
ड] टंगस्टन
इ] क्रोमियम

१] ब आणि क
२] फक्त क
३] क आणि इ
४] ब आणि इ

उत्तर
३] क आणि इ
------------------
[प्र.८] चुकीचे विधान ओळखा.
१] सोने मूलद्रव्याचा अणुअंक ७९ असतो.
२] सोने मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक १९७ असतो.
३] सोने नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्लाच्या संहत द्रावणात विरघळतो.
४] २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.

उत्तर
४] २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.
[२२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९१%-९५% सोने असते.]

------------------
[प्र.९] असत्य विधाने ओळखा.
अ] फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा धातू आहे.
ब] फॉस्फोरसचा शोध ब्रॅंड या शास्त्रज्ञाने लावला.
क] फॉस्फोरस अत्यंत क्रियाशील असून तो निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही.

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
[फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा अधातू आहे.]

------------------
[प्र.१०] चुकीचे विधान ओळखा.
अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला.
ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात.
क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] ब आणि क
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५५ - [पंचायत राज]

[प्र.१] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा

उत्तर
१] जिल्हा परिषद
----------------
[प्र.२] ग्रामपंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते?
१] ५
२] ७
३] ९
४] १०

उत्तर
२] ७
----------------
 [प्र.३] द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता

उत्तर
४] अशोक मेहता
----------------
[प्र.४] प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या?
अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.५] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा

उत्तर
२] पंचायत समिती
----------------
[प्र.६] पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता
२] वसंतराव नाईक
३] ल.ना.बोंगिरवार
४] पी.बी.पाटील

उत्तर
३] ल.ना.बोंगिरवार
----------------
[प्र.७] 'प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावा' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता

उत्तर
४] अशोक मेहता
----------------
[प्र.८] पी.बी.पाटील समितीने सरपंचाच्या एकूण जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली?
१] ५०%
२] २५%
३] २७%
४] ३३%

उत्तर
२] २५%
----------------
[प्र.९] वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल राज्य शासनाला कधी सादर केला?
१] १६ जून १९६२
२] १५ मार्च १९६१
२] २४ डिसेंबर १९६१
३] २ ऑक्टोबर १९६२

उत्तर
२] १५ मार्च १९६१
----------------
[प्र.१०] अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता?
अ] पंचायत राजमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविणे.
ब] पंचायत राजचे मूल्यमापन करणे.
क] पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करणे.

१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५४ - [राज्यघटना]

[प्र.१] राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र, राज्य व समवर्ती सूचींचा समावेश केलेला आहे?
१] ५ व्या
२] ६ व्या
३] ७ व्या
४] ८ व्या

उत्तर
३] ७ व्या
------------------
[प्र.२] भारतात राज्यपालाचे नेमके स्थान काय?
१] राष्ट्रपतींचा प्रतिनिधी
२] मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी
३] राज्याचा प्रमुख
४] केंद्र सरकारचा प्रमुख

उत्तर
३] राज्याचा प्रमुख
------------------
[प्र.३] लोकसभा सभापतींची निवड......................
१] राष्ट्रपती करतात.
२] पंतप्रधान करतात.
३] मंत्रीमंडळ करते.
४] लोकसभा सदस्य करतात.

उत्तर
४] लोकसभा सदस्य करतात.
------------------
[प्र.४] भारताच्या सध्याच्या लोकसभेची किमान गणसंख्या [Quorum] किती आहे?
१] ५४
२] ४५
३] ५५
४] ५६

उत्तर
३] ५५
------------------
[प्र.५] कोणत्या कलमाने राष्ट्रपती अंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात?
१] कलम २६१
२] कलम ३०३
३] कलम २६३
४] कलम २६४

उत्तर
३] कलम २६३
------------------
[प्र.६] १९५३ साली आंध्रप्रदेशची राजधानी कोणती होती?
१] गुंटूर
२] हैद्राबाद
३] तेलंगणा
४] कर्नुल

उत्तर
४] कर्नुल
------------------
[प्र.७] कोणत्या कलमाने वेठबिगारीला प्रतिबंध करण्यात आला आहे?
१] कलम २३
२] कलम २४
३] कलम २५
४] कलम २८

उत्तर
१] कलम २३
------------------
[प्र.८] भारतीय राज्यघटनेमध्ये भारताचे वर्णन कसे केले आहे?
१] भारत किंवा हिंदुस्थान
२] इंडिया किंवा भारत
३] इंडिया किंवा हिंदुस्थान
४] फक्त भारत

उत्तर
२] इंडिया किंवा भारत
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणती ठिकाणे भारताला फ्रेंचांकडून परत मिळवावे लागले?
अ] दादरा नगरहवेली
ब] दीव दमण
क] कारिकल
ड] माहे

१] अ, ब आणि क
२] ब, क आणि ड
३] क आणि ड
४] अ,क आणि ड

उत्तर
३] क आणि ड
------------------
[प्र.१०] भारतातील सर्वात मोठे चर्च कोणत्या राज्यात आहे?
१] महाराष्ट्र
२] गोवा
३] केरळ
४] आंध्रप्रदेश

उत्तर
२] गोवा (सेंट कॅथेड्रल)
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५३ - [भूगोल]

[प्र.१] आक्राणी टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत?
१] सातपुडा
२] गाविलगढ
३] सातमाळा
४] दरकेसा

उत्तर
१] सातपुडा
------------------
[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केली जाते?
१] औरंगाबाद
२] जळगाव
३] नाशिक
४] धुळे

उत्तर
२] जळगाव
------------------
[प्र.३] सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?
१] सागरी
२] भुईकोट
३] घाटमाथा
४] डोंगरमाथा

उत्तर
१] सागरी
------------------
[प्र.४] महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वाधिक सापेक्ष आद्रतेचे प्रमाण कोठे असते?
१] उत्तर महाराष्ट्र
२] नागपूर
३] कोकण
४] मराठवाडा

उत्तर
३] कोकण
------------------
[प्र.५] कोकणात उंचीवरील प्रदेशातील जांभा जमिनीवर कोणती अरण्ये आढळतात?
१] उप-समशीतोष्ण
२] समशीतोष्ण
३] वर्षारण्ये
४] पानझडी

उत्तर
३] वर्षारण्ये
------------------
[प्र.६] सुरजागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] नागपूर
२] चंद्रपूर
३] गोंदिया
४] गडचिरोली

उत्तर
४] गडचिरोली
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोठे तांदूळ संशोधन केंद्र आहे?
१] नाशिक
२] गोंदिया
३] खोपोली
४] दापोली

उत्तर
३] खोपोली
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] मध्यप्रदेशात सातमाळा पर्वतरांगांमध्ये तापी नदी उगम पावते.
ब] तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
[मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापी नदी उगम पावते.]

------------------
[प्र.९] 'अल्लापल्ली अरण्ये' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात?
१] आंध्रप्रदेश सीमेवर
२] गडचिरोली
३] विदर्भ
४] सिंधुदुर्ग

उत्तर
३] विदर्भ
------------------
[प्र.१०] महाराष्ट्रात प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी एकूण किती खनिजपट्टे आहेत?
१] २००
२] ८५
३] २८५
४] ५५

उत्तर
३] २८५
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५२ - [इतिहास]

[प्र.१] 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा व सेवाभाव धरा’ असे कोणी म्हटले आहे?
१] विनोबा भावे
२] पंजाबराव देशमुख
३] महात्मा फुले
४] वि.रा.शिंदे

उत्तर
२] पंजाबराव देशमुख
------------------
[प्र.२] डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
१] ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले.
२] १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
३] ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते.
४] १९५५ मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.

उत्तर
२] १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
------------------
[प्र.३] 'वैदिक वाङ्ग्मयातील धर्माचा उद्ग२म आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली?
१] कोलंबिया
२] ऑक्सफर्ड
३] एडीम्बरो
४] मराठवाडा

उत्तर
१] कोलंबिया
------------------
[प्र.४] महात्मा फुलेंवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता?
१] वज्रसुची
२] मनुस्मृती
३] भगवतगीता
४] वज्रापती

उत्तर
१] वज्रसुची
------------------
[प्र.५] महात्मा फुलेंनी पुण्यात पहिला पुनर्विवाह कधी घडवून आणला?
१] १८५८
२] १८५९
३] १८६०
४] १८६१

उत्तर
३] १८६०
------------------
[प्र.६] 'महाराष्ट्राला पुढील ५ हजार वर्षात मुंबई मिळणार नाही' हे उद्गार कोणाचे?
१] मोरारजी देसाई
२] स.का.पाटील
३] पा.वा.गाडगीळ
४] एस.एम.जोशी

उत्तर
२] स.का.पाटील
------------------
[प्र.७] पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली?
१] राघोबादादा
२] माधवराव पेशवे
३] दुसरा बाजीराव
४] नानासाहेब

उत्तर
२] माधवराव पेशवे
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] व्ही.डी.देशपांडे यांनी १९५२ मध्ये 'संयुक्त महाराष्ट्र' साप्ताहिकात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली होती.
ब] फाझल अली कमिशनने आपल्या अहवालात स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
------------------
[प्र.९] महात्मा फुले यांनी नभिकाञ्चा संप कोठे घडवून आणला?
अ] तळेगाव
ब] हडपसर
क] ओतूर

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] अ आणि क
------------------
[प्र.१०] रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
१] शिवाजी सावंत
२] विश्राम बेडेकर
३] चिंतामणराव कोल्हटकर
४] दिनानाथ जोशी

उत्तर
२] विश्राम बेडेकर
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५१ - [विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या वायुला मार्श गॅस असेही म्हणतात?
१] प्रोड्युसर गॅस
२] मिथेन गॅस
३] वॉटर गॅस
४] हायड्रोजन गॅस

उत्तर
२] मिथेन गॅस
----------------
[प्र.२] ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी करतात?
१] AC व्होल्टेजचे रुपांतर DC व्होल्टेज मध्ये करण्यासाठी
२] DC व्होल्टेजचे रुपांतर AC व्होल्टेज मध्ये करण्यासाठी
३] योग्य AC व्होल्टेज मिळविण्यासाठी
४] योग्य DC व्होल्टेज मिळविण्यासाठी

उत्तर
३] योग्य AC व्होल्टेज मिळविण्यासाठी
----------------
 [प्र.३] हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी काय वापरतात?
१] संयुक्त सूक्ष्मदर्शक
२] अपवर्तनी सूक्ष्मदर्शक
३] साधा सूक्ष्मदर्शक
४] बहिर्वक्र भिंग

उत्तर
३] साधा सूक्ष्मदर्शक
----------------
[प्र.४] जर एका वस्तूवर एकसारखे बल एकाच वेळी लावले तर ती वस्तू .......
१] एक समान वेगाने गतिमान होईल.
२] एक समान संवेगाने गतिमान होईल.
३] एक समान त्वरणाने गतिमान होईल.
४] वरीलपैकी एकही नाही.

उत्तर
२] एक समान संवेगाने गतिमान होईल.
----------------
[प्र.५] 'M' या भ्रमणकक्षेमध्ये अधिकतम इलेक्ट्रॉंनची संख्या किती असते?
१] ८
२] १८
३] ३२
४] ६४

उत्तर
२] १८
[K = २, L = ८, M = १८, N = ३२]

----------------
[प्र.६] जर पृथ्वीभोवती वायुमंडळ नसते तर दिवसाचा कालावधी .........
१] वाढला असता
२] कमी झाला असता
३] बदलला नसता
४] अर्धा झाला असता

उत्तर
२] कमी झाला असता
----------------
[प्र.७] विद्युत वितळतारबाबत सत्य विधान ओळखा.
अ] ती विद्युत परिपथामध्ये समांतर जोडणीने जोडतात.
ब] तिचा द्रवणांक फार कमी असतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
[ती विद्युत परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडतात.]

----------------
[प्र.८] योग्य विधान ओळखा.
अ] NaCl चा उत्कलनांक पाण्यापेक्षा जास्त आहे.
ब] उंच ठिकाणी अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
----------------
[प्र.९] अयोग्य विधाने ओळखा.
अ] क्ष-किरण हे अतिसूक्ष तरंगलांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होय.
ब] क्ष-किरण धन प्रभारित असतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
[क्ष-किरण प्रभाररहित असतात.]

----------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे 'धातुसदृश' आहेत?
अ] सिलिकॉन
ब] सेलेनियम
क] आर्सेनिक
ड] कॅडमियम

१] अ आणि क
२] अ, ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
२] अ, ब आणि क
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५० - [अर्थशास्त्र]

[प्र.१] राज्याच्या करेतर उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रमुख वाटा आहे?
१] केंद्राचे अनुदान
२] व्याजाच्या जमा रकमा
३] देशांतर्गत कर्ज
४] आंतरराष्ट्रीय कर्ज

उत्तर
१] केंद्राचे अनुदान
----------------
[प्र.२] महिला धोरण राबविणारे तसेच महिला व बाल विकास या स्वतंत्र खात्याची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
१] पंजाब
२] अरुणाचल प्रदेश
३] हरियाणा
४] महाराष्ट्र

उत्तर
४] महाराष्ट्र
----------------
 [प्र.३] १३व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०११-१२पासुन कर्जाचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करण्यात येतो?
१] शासकीय व्यवहार
२] भांडवली विकास खर्च
३] अनुदाने
४] शेती विकास

उत्तर
२] भांडवली विकास खर्च
----------------
[प्र.४] महाराष्ट्र शासनाची द्वार वितरण योजना कोणत्या भागात राबविली जाते?
१] आदिवासी व अवर्षणग्रस्त भागात
२] शहरी भागात
३] ग्रामीण भागात
४] पूरग्रस्त व प्रकल्पग्रस्त भागात

उत्तर
१] आदिवासी व अवर्षणग्रस्त भागात
----------------
[प्र.५] राष्ट्रीय पोषण संस्थेने भारत देशासाठी प्रती व्यक्ती प्रतिवर्षी अंडी व कोंबडीचे मांस सेवनाची अनुक्रमे किती शिफारस केली आहे?
१] १८० अंडी व ११ किलो मांस
२] ५० अंडी व १२ किलो मांस
३] १०० अंडी व ३० किलो मांस
४] ३६५ अंडी व ६० किलो मांस

उत्तर
१] १८० अंडी व ११ किलो मांस
----------------
[प्र.६] महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केव्हा झाली?
१] २० मे २००५
२] २९ जून २००६
३] १ मार्च २००२
४] ३१ मे २००६

उत्तर
२] २९ जून २००६
----------------
[प्र.७] महाराष्ट्रामध्ये १९९९-२००० पासून कार्यरत राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?
१] १२ खरीप, १० रब्बी
२] १६ खरीप, १० रब्बी
३] ४ खरीप, ५ रब्बी
४] सर्व खरीप

उत्तर
२] १६ खरीप, १० रब्बी
----------------
[प्र.८] अंत्योदय योजनेबाबत योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर, पामतेल पुरविण्याची व्यवस्था आहे.
ब] या योजनेंतर्गत २ रु. प्रती किलो दराने गहू व ३ रु प्रती किलो दराने  तांदूळ पुरविले जातात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
----------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्राने पहिला मानव विकास अहवाल २००२ साली प्रकाशित केला.
ब] यानुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.५८ होता.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
----------------
[प्र.१०] अयोग्य विधाने ओळखा.
अ] केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण १:२ असे निश्चित केले आहे.
ब] केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरविल्या जाणा-या केरोसिनचा रंग निळा करण्यात आला आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
[केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण ९:१ असे निश्चित केले आहे.]

-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४९ - [भूगोल]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या वृक्षाने भारतातील सर्वात जास्त क्षेत्रीय भाग व्यापला आहे?
१] स्फ़्रुस
२] देवधर
३] साल
४] साग

उत्तर
३] साल
----------------
[प्र.२] ’कुरुख’ हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
अ] आसाम
ब] झारखंड
क] मेघालय
ड] ओरिसा

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] ब आणि ड
४] क आणि ड

उत्तर
३] ब आणि ड
----------------
 [प्र.३] चंबळ हि कोणत्या नदीची उपनदी आहे?
१] गंगा
२] महानदी
३] यमुना
४] शोण

उत्तर
३] यमुना
----------------
[प्र.४] अयोग्य विधाने ओळखा.
१] काक्रापार जलविद्युत केंद्र गुजरात राज्यात आहे.
ब] रावतभाटा अणूविद्युत केंद्र आंध्रप्रदेश मध्ये आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] अ आणि ब दोन्ही
----------------
[प्र.५] खालीलपैकी कोणते शहर लोकर लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
१] मदुराई
२] जालंधर
३] गाझियाबाद
४] घाटशिला

उत्तर
२] जालंधर
----------------
[प्र.६] नाईल हि आफ्रिकेतील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही?
१] इथिओपिआ
२] युगांडा
३] सोमालिया
४] केनिया

उत्तर
३] सोमालिया
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणते ज्वालामुखीय बेट अटलांटिक महासागराशी संबंधित आहे?
१] मॉरेशर्स
२] दक्षिण सॅंडविच
३] मदेयरा
४] सेंट हेलेना

उत्तर
४] सेंट हेलेना
----------------
[प्र.८] खालीलपैकी कोणता देश भूवेष्टित आहे?
१] कंबोडिया
२] मलेशिया
३] लाओस
४] थायलंड

उत्तर
३] लाओस
----------------
[प्र.९] व्यापारी तत्वावर धान्याची शेती हे खालीलपैकी कोणत्या मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट आहे?  
१] उत्तर चीन मैदान
२] पंपाज मैदान
३] व्होल्गा मैदान
४] डॅन्यूब खोरे

उत्तर
२] पंपाज मैदान
----------------
[प्र.१०] तिहरी प्रकल्पासंदर्भात अयोग्य विधान ओळखा.
अ] हा पर्यावरणदृष्ट्या वादग्रस्त प्रकल्प आहे.
ब] मुख्य धरण भागिरथी नदीवर आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४८ - [इतिहास]

[प्र.१] तिस-या अंग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतान विरुद्ध पुढीलपैकी कोणी संयुक्त फळी उभी केली?
१] निजाम, कर्नाटकचा नवाब, इंग्रज
२] मराठे, इंग्रज, कर्नाटकचा नवाब
३] निजाम, मराठे, इंग्रज
४] त्रावणकोरचे राजे, मराठे, इंग्रज

उत्तर
३] निजाम, मराठे, इंग्रज
------------------
[प्र.२] गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा.
अ] १८९७ साली गोखलेंनी मॅंचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली.
ब] त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] अ व ब दोन्ही
------------------
[प्र.३] अयोग्य विधान ओळखा.
१] १८१३च्या चार्टर कायद्याने कंपनीचे भारतीय व्यापारावरील अधिकार समाप्त झाले.
२] १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
३] खेडा चळवळ मुंबई सरकार विरुद्ध होती.
४] १९२१मध्ये मोपला बंद आणि खिलाफत चळवळ एकमेकांत मिसळून गेले.

उत्तर
२] १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
------------------
[प्र.४] खालीलपैकी मोपला बंडाचे  तात्कालिक कारण कोणते?
१] राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फुट.
२] इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
३] इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.
४] जमीनदारांचे मोपल्यांवरील अत्याचार  

उत्तर
२] इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
------------------
[प्र.५] कॅबिनेट मिशन भारतात आले कारण...............
१] भारताचे सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता.
२] भारताच्या फाळणीला गती देण्याकरिता
३] भारताला सत्ता हस्तांतरित करण्याकरीता
४] राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता

उत्तर
४] राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीशी संबंधित नाही.
१] परकीय वस्तूंवर बहिष्कार
२] कायदा न्यायालयांवर बहिष्कार
३] इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
४] भारत सरकारच्या १९१९च्या कायद्यान्तर्गत घेतलेल्या निवडणुकांवर बहिष्कार.
 
उत्तर
३] इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] डेक्कन सभेची स्थापना गोखलेंनी केली.
ब] १८९५मध्ये टिळक व त्यांच्या सहका-यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेतून गोखले व रानडे यांना बाजूला सारले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] अ व ब दोन्ही
------------------
[प्र.८] होमरूलसंबंधी अयोग्य विधाने ओळखा.
अ] भारतीयांसाठी स्वराज्य हि होमरूलची मागणी होती.
ब] मद्रासमध्ये होमरूलची स्थापना अनी बेजंट यांनी केली.
क] या चळवळीमध्ये स्त्रिया व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ड] फ्रांसच्या होमरूलच्या धर्तीवर भारतात हि चळवळ सुरु झाली.

१] फक्त क व ड
२] फक्त क
३] फक्त ड
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त ड
------------------
[प्र.९] १८७८च्या भारतीय वृत्तपत्र कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ] भारतीय वृत्तपत्रांमधून प्रतिज्ञा घेण्यात आली कि त्यांनी सरकारविरोधी लिखाण करू नये.
ब] जिल्हा दंडाधिकारी अशा वृत्तपत्रांकडून अनामत रक्कम मागवू शकत होता.
क] दंडाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल त्यावर अपील करता येणार नाही.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] शिक्षणाशी संबंधित हार्टोग समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१] १९१३
२] १९१७
३] १९२९
४] १९३५

उत्तर
३] १९२९
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४७ - [चालू घडामोडी]

[प्र.१] कोणत्या खेळाडूला नुकतेच सीआरपीएफ [CRPF] चे  ब्रँड एम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले?
१] विजेंदर सिंग
२] सुशीलकुमार
३] मेरी कोम
४] सायना नेहवाल

उत्तर
३] मेरी कोम
----------------
[प्र.२] धुम्रविरहित तंबाखूवर कायद्याने बंदी घालणारे पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] आसाम
३] गुजरात
४] सिक्कीम

उत्तर
२] आसाम
----------------
 [प्र.३] नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली?
१] गिरीजा प्रसाद कोईराला
२] सुशील कोईराला
३] रामबरन यादव
४] सुमित कोईराला

उत्तर
२] सुशील कोईराला
----------------
[प्र.४] 'इराणी ट्रॉफी २०१४'चा विजेता संघ कोणता?
१] शेष भारत
२] मुंबई
३] महाराष्ट्र
४] कर्नाटक

उत्तर
४] कर्नाटक
----------------
[प्र.५] चार्ली चॅप्लिन यांनी लिहिलेले एकमेव पुस्तक आता प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचे नाव काय?
१] एनग्रेव्ह चार्ली
२] फुटलाईट
३] दि ट्रंम्प
४] चार्ली अँड हिज टाइम्स

उत्तर
२] फुटलाईट
----------------
[प्र.६] प्रस्तावित दुगराजपट्टणम बंदर कोणत्या जिल्ह्यात आकाराल येणार आहे?
१] आंध्रप्रदेश
२] तामिळनाडू
३] कर्नाटक
४] केरळ

उत्तर
१] आंध्रप्रदेश
----------------
[प्र.७] सन २०१८ सालचे हिवाळी ऑलंपिक कोणत्या देशात होणार आहे?
१] ग्रीस
२] भारत
३] दक्षिण कोरिया
४] बेल्जियम

उत्तर
३] दक्षिण कोरिया
----------------
[प्र.८] 'वॅटसन' या कॉम्प्युटर सिस्टमची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे?
१] IBM
२] Apple
३] Microsoft
४] Intel

उत्तर
१] IBM
----------------
[प्र.९] गोल्ड स्टॅंडर्ड फाउंडेशनचा उर्जेचा प्रभावी वापर केल्याबद्दल गौरविण्यात आलेला जगभरातील पहिला रेल्वे प्रकल्प कोणता?
१] मुंबई मेट्रो
२] कोलकत्ता मेट्रो
३] बंगलोर मेट्रो
४] दिल्ली मेट्रो

उत्तर
४] दिल्ली मेट्रो
----------------
[प्र.१०] हिंदी साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा 'व्यास सन्मान' यावर्षी कोणाला देण्यात आला?
१] नरेंद्र कोहली
२] विश्वनाथ तिवारी
३] रामप्रसाद त्रिपाठी
४] विश्वनाथ त्रिपाठी

उत्तर
४] विश्वनाथ त्रिपाठी
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४६ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात?
१] बँक ऑफ इंग्लंड
२] बँक ऑफ कोलकत्ता
३] ब्रिटीश भारत सरकार
४] स्थानिक कलेक्टर

उत्तर
३] ब्रिटीश भारत सरकार
----------------
[प्र.२] गृहनिर्माण क्षेत्राची सर्वोच्च संस्था म्हणून कोण कार्य करते?
१] ICICI बँक
२] RBI
३] NHB
४] HDFC

उत्तर
३] NHB [National Housing Bank]
----------------
 [प्र.३] खालीलपैकी कोणत्या उद्योगास मुलभूत उद्योग म्हणता येईल ?
१] लोह-पोलाद उद्योग
२] कापड उद्योग
३] रंग उद्योग
४] औषध निर्मिती उद्योग

उत्तर
१] लोह-पोलाद उद्योग
----------------
[प्र.४] स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणत्या करांची आकारणी करते?
१] घरपट्टी व देणगीकर
२] घरपट्टी व पाणीपट्टी
३] उत्पादन शुल्क
४] वाहन कर व विक्रीकर

उत्तर
२] घरपट्टी व पाणीपट्टी
----------------
[प्र.५] औद्योगिक कामगारांकरिता वर्गीकृत रोजगारातील किमान वेतन निश्चित करणे व सुधारित करणे यासाठी कशाचा वापर करतात?
१] ग्राहक किंमत निर्देशांक
२] उद्योगातील नफ्याच्या प्रमाणानुसार
३] सरकारी आदेशानुसार
४] कामगारांच्या अपेक्षांचा विचार करून

उत्तर
१] ग्राहक किंमत निर्देशांक
----------------
[प्र.६] राज्यात कृषीसंजीवनी योजना केव्हापासून सुरु झाली?
१] १९९९
२] १९९३
३] २०११
४] २०१३

उत्तर
३] २०११
----------------
[प्र.७] एप्रिल १९८७ पासून कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नवीन प्रादेशिक बँक स्थापनेस स्थगिती देण्यात आली?
१] सी रंगराजन समिती
२] केळकर समिती
३] अभिजित सेन गुप्ता समिती
४] नरिमन समिती

उत्तर
२] केळकर समिती
----------------
[प्र.८] जिल्हास्तरावरील उत्पन्नाचे अंदाज तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो?
१] उत्पन्न स्त्रोत पद्धत
२] खर्च पद्धत
३] गुंतवणूक पद्धत
४] उत्पन्न-खर्च पद्धत

उत्तर
१] उत्पन्न स्त्रोत पद्धत
----------------
[प्र.९] इंदिरा आवास योजनेबाबत योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेला केंद्र व राज्य यांच्याकडून अनुक्रमे ७५:२५ निधी पुरविला जातो.
ब] या योजनेची सुरुवात १९८५-८६ साली झाली.
क] किमान ६०% निधीचा वापर SC/ST करिता करणे बंधनकारक आहे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या आधारभूत वर्षासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] पहिले आधारभूत वर्ष १९४९-५० हे मानण्यात आले.
ब] २०१० सालापासून आधारभूत वर्ष म्हणून २००४-०५ हे वर्ष स्वीकारले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब योग्य
[पहिले आधारभूत वर्ष १९४८-४९ हे मानण्यात आले.]

-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४५ - [इतिहास]


[प्र.१] वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पुजली जात?
१] पुशाण
२] सावित्री
३] अदिती
४] अंजनी

उत्तर
३] अदिती
------------------
[प्र.२] राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला?
१] दुसरा पुलकेशी
२] किर्तिवर्मन
३] जयसिंग
४[ विनयादित्य

उत्तर
१] दुसरा पुलकेशी
------------------
[प्र.३] १९व्या शतकातील सुर्यपुराण साहित्याचा लेखक कोण होता?
१] परमेश्वर
२] रमाई पंडित
३] परंगल खान
४] अलाओ

उत्तर
२] रमाई पंडित
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते?
१] चंद्रगुप्त १
२] चंद्रगुप्त २
३] समुद्रगुप्त
४] हर्षवर्धन

उत्तर
२] चंद्रगुप्त २
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाश्याने राजा हर्षवर्धनच्या राज्याला भेट दिली?
१] मेगास्थेनिस
२] फा-हीन
३] ह्युएन-त्सांग
४] इब्न बतुता

उत्तर
३] ह्युएन-त्सांग
------------------
[प्र.६] महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम कोण?
१] महंमद घोरी
२] अल्लाउद्दिन खिलजी
३] महंमद बिन कासीम
४] महंमद बिन तुघलक

उत्तर
२] अल्लाउद्दिन खिलजी
------------------
[प्र.७] बारभाईंचे कारस्थान कोणाविरुद्ध होते?
१] राघोबादादा
२] सदाशिवराव भाऊ
३] चिमाजी अप्पा
४] नाना फडणवीस

उत्तर
१] राघोबादादा
------------------
 [प्र.८] ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?
१] डॉ.स्वामिनाथन
२] डॉ.पंजाबराव देशमुख
३] शाहू महाराज
४] कर्मवीर भाऊराव पाटील

उत्तर
२] डॉ.पंजाबराव देशमुख
------------------
[प्र.९] प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
१] गोपाळ हरी देशमुख
२] बाळशास्त्री जांभेकर
३] भाऊ महाजन
४] भाऊ दाजी लाड

उत्तर
३] भाऊ महाजन
------------------
[प्र.१०] कोल्हापुरचे अंबाबाई मदिर कोणाच्या काळातील आहे?
१] राष्ट्रकुट
२] सातवाहन
३] वाकाटक
४] शिलाहार

उत्तर
४] शिलाहार
--------------------------------------------------

प्रश्नसंच ४४ - [भूगोल]

[प्र.१] भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
१] दिबांग वॅली
२] भूम
३] लडाख
४] गारो हिल्स

उत्तर
४] गारो हिल्स
----------------
[प्र.२] दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
१] पश्चिम बंगाल
२] उत्तराखंड
३] जम्मू काश्मीर
४] उत्तर प्रदेश

उत्तर
३] जम्मू काश्मीर
----------------
[प्र.३] मारवाडचे पठार व मेवाडचे पठार यांना विभागणा-या पर्वताचे नाव काय?
१] अरवली
२] विंध्य
३] सातपुडा
४] महेंद्रगिरी

उत्तर
१] अरवली
----------------
[प्र.४] भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते?
१] एन्नोर
२] कोलकत्ता
३] न्हावा शेवा
४] मुंबई

उत्तर
३] न्हावा शेवा
----------------
[प्र.५] 'बाल्को' हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली?
१] उत्तर प्रदेश
२] तामिळनाडू
३] ओडिशा
४] छत्तीसगड

उत्तर
४] छत्तीसगड
----------------
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या खिंडीतून तिबेट-हिमालय हा मार्ग जातो?
१] जोझीला
२] शिपकीला
३] नथुला
४] वरील सर्व

उत्तर
२] शिपकीला
----------------
[प्र.७] जांभी मृदेसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] कमी सुपीक असते.
ब] उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
क] लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.८] दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
१] उल्हास
२] तुंगभद्रा
३] पेरियार
४] पेन्नार

उत्तर
३] पेरियार
----------------
[प्र.९] राजस्थान व माळवा प्रांतातून लुप्त झालेला पक्षी कोणता?
१] सैबेरियन करकोचा
२] मोर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
४] किंगफिशर

उत्तर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
----------------
[प्र.१०] काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात.
ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात.
क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात.

१] अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४३ - [इतिहास]

[प्र.१] १९४०च्या 'ऑगस्ट प्रस्तावा'नुसार काय तरतुदी सादर करण्यात आल्या?
१] भारताला टप्प्यांमध्ये स्वातंत्र्य देणे.
२] वसाहतींचे स्वातंत्र्य
३] प्रांतिक स्वायत्तता
४] केंद्रात प्रातिनिधिक सरकार

उत्तर
२] वसाहतींचे स्वातंत्र्य
------------------
[प्र.२] कोणत्या कायद्याने बर्मा [म्यानमार] भारतापासून वेगळे करण्यात आले?
१] १९०९ मोर्ले मिंटो कायदा
२] १९१९ भारत सरकार कायदा
३] १९३५ भारत सरकार कायदा
४] १९४७ भारत स्वातंत्र्याचा कायदा

उत्तर
३] १९३५ भारत सरकार कायदा
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणी रेडशर्टस संघटना स्थापन केली?
१] खान अब्दुल गफार खान
२] भगत सिंग
३] राजगुरू
४] सूर्यसेन

उत्तर
१] खान अब्दुल गफार खान
------------------
[प्र.४] १८५७ च्या उठावात मणिराम देवण याने कोणत्या भागात नेतृत्व केले?
१] दक्षिण भारत
२] आसाम
३] ओरिसा
४] बंगाल

उत्तर
२] आसाम
------------------
[प्र.५] ऑक्टोबर १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अरजी-हुकुमत-ए-हिंद कोठे स्थापन केली?
१] जपान
२] जर्मनी
३] सिंगापूर
४] रंगून

उत्तर
३] सिंगापूर
------------------
[प्र.६] महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गुजरात सभेने खालीलपैकी कशामध्ये प्रमुख भूमिका निभावली?
१] भटमाद्ची गिरणी कामगार आंदोलन
२] खेडा चळवळ
३] बार्डोली चळवळ
४] मीठ सत्याग्रह

उत्तर
२] खेडा चळवळ
------------------
[प्र.७] घटना कालानुक्रमे लावा.
अ] रौलेट कायदा असंतोष
ब] खेडा सत्याग्रह
क] चंपारण्य लढा
ड] अहमदाबाद गिरणी कामगार आंदोलन

१] क-ब-अ-ड
२] क-ब-ड-अ
३] ब-क-अ-ड
४] क-ड-ब-अ

उत्तर
२] क-ब-ड-अ
------------------
 [प्र.८] असहकार चळवळीचा भाग म्हणून जंगल सत्याग्रहाची चळवळ पुढीलपैकी कोठे सुरु झाली?
१] ओरिसा, महाराष्ट्र
२] मद्रास, बंगाल, महाराष्ट्र
३] कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रांत
४] केरळ, गुजरात, आसाम

उत्तर
३] कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रांत
------------------
[प्र.९] पुढीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांना लॉर्ड हार्डींग्जवर बॉम्ब फेकल्याप्रकरणी शिक्षा झाली?
अ] अमीरचंद
ब] अवध बेहरी
क] बालमुकुंद
ड] वसंतकुमार विश्वास

१] अ आणि ब
२] ब, क आणि ड
३] अ, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] १८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा.
अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी.
ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये.
क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] एकही नाही.

उत्तर
३] फक्त क
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४२ - [सामान्य-ज्ञान]

[प्र.१] भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे?
१] कर्नाटक
२] डेहरादून
३] कोलकत्ता
४] नागपूर

उत्तर
३] कोलकत्ता
----------------
[प्र.२] मतदान सक्तीचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] केरळ
३] गुजरात
४] पश्चिम बंगाल

उत्तर
३] गुजरात
----------------
 [प्र.३] भारताने ब्राम्होस हे सुपर सॉनिक क्षेपणास्त्र कोणाच्या मदतीने बनविले आहे?
१] अमेरिका
२] रशिया
३] जपान
४] चीन

उत्तर
२] रशिया
----------------
[प्र.४] महाराष्ट्र शासनातर्फे सन २००८ पासून कोणता दिवस 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा केला जातो?
१] २२ सप्टेंबर
२] २० सप्टेंबर
३] २८ सप्टेंबर
४] २५ सप्टेंबर

उत्तर
३] २८ सप्टेंबर
----------------
[प्र.५] महाराष्ट्रातील पहिला बोलपट कोणता आहे?
१] राजा हरिशचंद्र
२] अयोध्येचा राजा
३] आलम अरा
४] औट घटकेचा राजा

उत्तर
२] अयोध्येचा राजा
----------------
[प्र.६] दुहेरी भूमिका [Double Role] असलेला महाराष्ट्रातील पहिला चित्रपट कोणता?
१] औट घटकेचा राजा
२] अयोध्येचा राजा
३] श्यामसुंदर
४] जुडवा

उत्तर
१] औट घटकेचा राजा
----------------
[प्र.७] 'कमला' या काव्याची रचना वि.दा.सावरकरांनी कोठे असताना केली?
१] लंडन
२] फ्रांस
३] अंदमान
४] नाशिक

उत्तर
३] अंदमान
----------------
[प्र.८] 'कवी बी' या नावाने कविता करणारे कवी कोण?
१] माधव ज्युलिअन
२] त्र्यंबक ठोंबरे
३] नारायण गुप्ते
४] बा.सी.मर्ढेकर

उत्तर
३] नारायण गुप्ते
----------------
[प्र.९] 'लीलावती पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो?
१] गणित
२] आरोग्य क्षेत्र
३] भाषा
४] तंत्रज्ञान

उत्तर
१] गणित
----------------
[प्र.१०] 'भारतीय अन्नधान्य बँक जाळे योजना'चे प्रणेते कोण आहेत?
१] शरद पवार
२] सॅम पित्रोदा
३] सी.रंगराजन
४] डॉ.स्वामिनाथन

उत्तर
२] सॅम पित्रोदा
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४१ - [सामान्य अध्ययन]

[प्र.१] 'जेव्हा माणूस जागा होतो'  पुस्तकाच्या लेखिका कोण ?
१] अनुताई वाघ
२] गोदावरी परुळेकर
३] आनंदीबाई जोशी
४] पंडिता रमाबाई

उत्तर
२] गोदावरी परुळेकर
----------------
[प्र.२] आधुनिक आवर्तसारणीत .......... आवर्तने आहेत ?
१] ७
२] १६
३] १८
४] २१

उत्तर
१] ७
----------------
 [प्र.३] आधुनिक आवर्तसारणीत .......... गण आहेत ?
१] १७
२] १६
३] १८
४] २१

उत्तर
३] १८
----------------
[प्र.४] व्होल्ट हे कश्याचे एकक आहे ?
१] विधुतधारा
२] विभवांतर
३] विधूतरोध
४] विधूतप्रभार

उत्तर
२] विभवांतर
----------------
[प्र.५] 'अखंड प्रेरणा-गांधी विचारांची' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
१] मोहन धारीया
२] अण्णा हजारे
३] डॉ. रघुनाथ माशेलकर
४] डॉ.विश्वनाथ कराड

उत्तर
२] अण्णा हजारे
----------------
[प्र.६] किरगीज लोकांचे मुख्य पेय .......आहे ?
१] चहा
२] कॉफी
३] क्युमीस
४] कोको

उत्तर
३] क्युमीस
----------------
[प्र.७] मानवी जठराचा आकार ........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो ?
१] T
२] J
३] L
४] I

उत्तर
२] J
----------------
[प्र.८] भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ?
१] शाहू महाराज
२] महर्षी कर्वे
३] गाडगे महाराज
४] तुकडोजी महाराज

उत्तर
३] गाडगे महाराज
----------------
[प्र.९] वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?
१] वसंत
२] सुनंदा
३] वैभव
४] वासंती

उत्तर
२] सुनंदा
----------------
[प्र.१०] एका विध्यार्थ्याचे बरोबर प्रश्न्याच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
१] १७
२] ३४
३] ४८
४] ३०

उत्तर
१] १७
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ४० - [जीवशास्त्र]

[प्र.१] सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?
१] कार्ल लिनिअस
२] अरीस्टॉटल
३] थिओफ्रॅट्स
४] चार्ल्स डार्विन

उत्तर
१] कार्ल लिनिअस
------------------
[प्र.२] मानवी संतुलित आहार म्हणजे ......................
१] माशांच्या सेवनातून मिळणारी प्रथिने
२] मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्ये
३] तूप व दुधाचे पदार्थ
४] वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य

उत्तर
४] वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य
------------------
[प्र.३] जीवशास्त्रानुसार मृत्यू (Biological Death) केव्हा होतो?
१] हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा
२] श्वासोच्छवास बंद होतो तेव्हा
३] शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
४] डोळ्यांमधील बाहुली स्थिर होते तेव्हा

उत्तर
३] शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
------------------
[प्र.४] वटवाघूळ _ _ _ _ _ _ _ वर्गीय आहे.
१] पक्षी वर्गीय
२] सरीसृप वर्गीय
३] सस्तनी वर्गीय
४] उभयचर वर्गीय

उत्तर
३] सस्तनी वर्गीय
------------------
[प्र.५] पेशी चक्रामध्ये कोणत्या क्रिया घडतात?
१] समसुत्री आणि अर्धसुत्री विभाजन
२] G1, S Phase आणि G2
३] पुर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था
४] इंटरफेज आणि समसुत्री विभाजन

उत्तर
४] इंटरफेज आणि समसुत्री विभाजन
------------------
[प्र.६] झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात?
१] ३ जोड्या
२] ४ जोड्या
३] २ जोड्या
४] ५ जोड्या

उत्तर
१] ३ जोड्या
------------------
[प्र.७] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] कवकांच्या अभ्यासाला मायक्रोलॉजी म्हणतात.
ब] कवकवर्गीय वनस्पती पारपोषी असतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
 [प्र.८] अन्नसाखळीमध्ये खाली घटक असतात.
१] फक्त अन्न तयार करणारे
२] अन्न तयार करणारे व ते खाणारे
३] अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक
४] यापैकी नाही

उत्तर
३] अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक
------------------
[प्र.९] मानवी शरीरात RBC : WBC हे प्रमाण किती असते?
१] १: ७००
२] ७०० : १
३] १२०० : १
४] ९००० : १

उत्तर
२] ७०० : १
------------------
[प्र.१०] माणसाच्या १००Kg वजनाच्या शरीरात किती लीटर पाणी असते?
१] ५०
२] ६०
३] ७०
४] ८०

उत्तर
३] ७०
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ३९ - [चालू घडामोडी]

[प्र.१] भारताचे लोकसभा सभापती कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] करिया मुंडा
३] सुषमा स्वराज
४] मीरा कुमार

उत्तर
४] मीरा कुमार
----------------
[प्र.२] भारताचे राज्यसभा सभापती कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] अरुण जेटली
३] पी.जे.कुरियन
४] हमीद अन्सारी

उत्तर
४] हमीद अन्सारी
----------------
 [प्र.३] भारताचे लोकसभा उपसभापती कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] करिया मुंडा
३] सुषमा स्वराज
४] मीरा कुमार

उत्तर
२] करिया मुंडा
----------------
[प्र.४] भारताचे राज्यसभा उपसभापती कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] अरुण जेटली
३] पी.जे.कुरियन
४] हमीद अन्सारी

उत्तर
३] पी.जे.कुरियन
----------------
[प्र.५] भारताचे राज्यसभा विरोधी पक्ष नेते कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] अरुण जेटली
३] पी.जे.कुरियन
४] हमीद अन्सारी

उत्तर
२] अरुण जेटली
----------------
[प्र.६] भारताचे लोकसभा विरोधी पक्ष नेते कोण आहेत?
१] मुरली मनोहर जोशी
२] लालकृष्ण अडवानी
३] सुषमा स्वराज
४] मीरा कुमार

उत्तर
३] सुषमा स्वराज
----------------
[प्र.७] भारताचे केंद्रीय नागरी विकास मंत्री कोण आहेत?
१] कपिल सिब्बल
२] कमल नाथ
३] जयराम रमेश
४] वायलर रवी

उत्तर
२] कमल नाथ
----------------
[प्र.८] रामनरेश यादव कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
१] झारखंड
२] उत्तराखंड
३] मध्यप्रदेश
४] मिझोरम

उत्तर
३] मध्यप्रदेश
----------------
[प्र.९] भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
१] व्ही.के.चंद्रमौली
२] व्ही.के.सारस्वत
३] व्ही.एस.संपत
४] सुधा पिल्लई

उत्तर
३] व्ही.एस.संपत
----------------
[प्र.१०] भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
१] दीपक सिंधू
२] हीना सिंधू
३] सुषमा सिंग
४] सुजाता सिंग

उत्तर
३] सुषमा सिंग
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ३८ - [भूगोल]

[प्र.१] पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो?
१] ऑक्टोबर
२] जुलै
३] सप्टेंबर
४] जून

उत्तर
१] ऑक्टोबर
------------------
[प्र.२] हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] जळगाव
३] धुळे
४] बुलढाणा

उत्तर
३] धुळे
------------------
[प्र.३] कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो?
१] सोलापूर
२] कोल्हापूर
३] नागपूर
४] सातारा

उत्तर
२] कोल्हापूर
------------------
[प्र.४] महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे?
१] गडचिरोली
२] औरंगाबाद
३] अमरावती
४] चंद्रपूर

उत्तर
१] गडचिरोली
------------------
[प्र.५] महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे?
१] ३५
२] ३३
३] ८
४] ९

उत्तर
४] ९
------------------
[प्र.६] महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?
१] अवर्षण प्रदेश
२] जास्त पर्जन्याचा प्रदेश
३] पर्जन्यछायेचा प्रदेश
४] निश्चित पावसाचा प्रदेश

उत्तर
३] पर्जन्यछायेचा प्रदेश
------------------
[प्र.७] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?
१] पंडित नेहरू
२] सलीम अली
३] जिम कोर्बेट
४] कैलास सांकला

उत्तर
४] कैलास सांकला
------------------
 [प्र.८] महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?
१] कापूस
२] बाजरी
३] तांदूळ
४] खरीप ज्वारी

उत्तर
३] तांदूळ
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
१] नाशिक
२] अमरावती
३] कोकण
४] नागपूर

उत्तर
२] अमरावती
------------------
[प्र.१०] ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते?
१] अहमदाबाद
२] पालमपूर
३] बडोदा
४] भोपाळ

उत्तर
१] अहमदाबाद
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ३७ - [इतिहास]

[प्र.१] चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले?
१] मार्को पोलो
२] इब्न बतुता
३] अल बरुनी
४] इत्सिंग

उत्तर
१] मार्को पोलो
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते?
१] राष्ट्रकुट
२] प्रतिहार
३] पाल
४] चालुक्य

उत्तर
२] प्रतिहार
----------------
 [प्र.३] राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत?
१] मंडल
२] विषय
३] राष्ट्र
४] यापैकी नाही

उत्तर
३] राष्ट्र
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकुट राजाने जलसमाधी घेतली?
१] कृष्णा दुसरा
२] इंद्र तिसरा
३] कृष्ण तिसरा
४] अमोघवर्ष

उत्तर
४] अमोघवर्ष
----------------
[प्र.५] नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले?
१] भोज
२] धर्मपाल
३] देवपाल
४] नागभट्ट

उत्तर
२] धर्मपाल
----------------
[प्र.६] महंमद गझनीने सोमनाथवर स्वारी कधी केली?
१] १०१५
२] १०१८
३] १०२०
४] १०२५

उत्तर
४] १०२५
----------------
[प्र.७] महंमद गझनीच्या दरबारी कवी कोण होता?
१] अल बरुनी
२] फिरदौसी
३] अल मसुदी
४] सुलेमान

उत्तर
२] फिरदौसी
----------------
[प्र.८] चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.
१] विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली.
२] राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
३] राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली.
४] चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले.

उत्तर
२] राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
----------------
[प्र.९] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] अलवार संत हे विष्णूचे भक्त होते.
ब] नयनार संत हे विष्णूचे भक्त होते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
----------------
[प्र.१०] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] 'मान्यखेड' हि राष्ट्रकुट साम्राज्याची राजधानी होती.
ब] अमोघवर्षने मान्यखेड हि राजधानी वसवली.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
-------------------------------------------------------------



प्रश्नसंच ३६ - [राज्यघटना]

-------------------------------------------------------------
[प्र.१] राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हि दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो?
१] पंतप्रधान
२] लोकसभा सभापती
३] सरन्यायाधीश
४] महालेखापाल

उत्तर
३] सरन्यायाधीश
------------------
[प्र.२] स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील तत्वांमागची प्रेरणा कोणती आहे?
१] अमेरिकन राज्यक्रांती
२] आयरिश राज्यक्रांती
३] रशियन राज्यक्रांती
४] फ्रेंच राज्यक्रांती

उत्तर
४] फ्रेंच राज्यक्रांती
------------------
[प्र.३] राज्यसभेचे सदस्य कशाप्रकारे निवडले जातात?
१] लोकांकडून
२] विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून
३] विधान परिषदेच्या सदस्यांकडून
४] यापैकी नाही

उत्तर
२] विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून
------------------
[प्र.४] राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे?
१] १२ ते १४
२] २१ ते २४
३] २५ ते २८
४] २९ ते ३०

उत्तर
३] २५ ते २८
------------------
[प्र.५] खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
१] लोकसभा सभापतींकडून विसर्जित केली जाते.
२] राज्यसभेचा कालावधी ६ वर्षे असतो.
३] धनविधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाते.
४] राज्यसभेचे १/३ सदस्य दर २ वर्षांनी निवृत्त होतात.

उत्तर
४] राज्यसभेचे १/३ सदस्य दर २ वर्षांनी निवृत्त होतात.
------------------
[प्र.६] लोकसभा सभापतीची निवड कोण करते?
१] राष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] संसद सदस्य
४] लोकसभा सदस्य

उत्तर
४] लोकसभा सदस्य
------------------
[प्र.७] घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?
अ] साध्य करावयाचे स्त्रोत
ब] शासन व्यवस्था
क] सत्तेचा स्त्रोत

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
 [प्र.८] विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी किती वाचन अवस्थांमधून जावे लागते?
१] तीन
२] चार
३] पाच
४] दोन

उत्तर
१] तीन
------------------
[प्र.९] लोकसभेची लोकनिर्वाचित सदस्यसंख्या जास्तीत जास्त किती असू शकते?
१] ५४५
२] ५५०
३] ५५२
४] ५४३

उत्तर
२] ५५०
------------------
[प्र.१०] खालीलपैकी राज्यांचा अस्तित्वात येण्याचा योग्य क्रम लावा.
१] सिक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड-हरियाणा
२] सिक्कीम-हरियाणा-नागलॅंड-अरुणाचल प्रदेश
३] नागलॅंड-हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश
४] हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड

उत्तर
३] नागलॅंड-हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश
-------------------------------------------------------------