प्रश्नसंच २७ - [अर्थशास्त्र]

---------------------------------------------------
[प्र.१] २०१२ च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक कर्जबाजारी पहिली तीन राज्ये कोणती?
१] उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल
२] बिहार, केरळ, महाराष्ट्र
३] गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल
४] मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात

उत्तर
१] उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल
----------------
[प्र.२] शेतक-यांना शेती विकासासाठी जमिनीच्या तारणावर दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारी बँक कोणती?
१] महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
२] आरबीआय
३] नाबार्ड
४] भूविकास बँक

उत्तर
४] भूविकास बँक
----------------
 [प्र.३] खालील विधाने कोणत्या अर्थ व्यवस्थेची लक्षणे आहेत?
अ] या अर्थ व्यवस्थेमध्ये भांडवलवाद व समाजवाद दोन्हीतील दोषांचे निवारण केलेले असते.
ब] यामध्ये खाजगी व सार्वजनिक दोन्ही क्षेत्र समाविष्ठ असतात.

१] भांडवलशाही
२] लोकशाही
३] मिश्र
४] समाजवादी

उत्तर
३] मिश्र
---------
[प्र.४] स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले?
१] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
२] आय.सी.आय.सी.आय
३] पंजाब नॅशनल बँक
४] स्टेट बँक ऑफ इंडिया

उत्तर
१] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
----------------
[प्र.५] स्थूल देशांतर्गत उत्पादनातून स्थिर भांडवलाचा घसारा वजा केल्यास प्राप्त होणा-या मुल्यास काय म्हणतात?
१] निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न
२] स्थूल देशांतर्गत उत्पन्न
३] निव्वळ देशांतर्गत उत्पन्न
४] स्थूल राष्ट्रीय उत्पन्न

उत्तर
३] निव्वळ देशांतर्गत उत्पन्न
----------------
[प्र.६] प्रादेशिक ग्रामीण बँका खालीलपैकी कोणाला प्रत्यक्ष कर्ज मंजूर करतात?
१] उद्योगपती
२] ग्रामीण कारागीर
३] सधन शेतकरी
४] गृहनिर्माण प्रकल्प

उत्तर
२] ग्रामीण कारागीर
----------------
[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.
अ] गिनी गुणांकाचे मुल्य नेहमी  ० ते १ च्या दरम्यानच असते.
ब] गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढी आर्थिक विषमता कमी असते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
[गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढी आर्थिक विषमता जास्त असते.]

----------------
[प्र.८] RBIच्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात?
१] मौद्रिक व पतधोरण
२] अर्थसंकल्पीय धोरण
३] वित्तीय धोरण
४] राजकोषीय धोरण

उत्तर
१] मौद्रिक व पतधोरण
----------------
[प्र.९] ग्रामीण व नागरी भागाकरिता स्वतंत्र मासिक ग्राहक किंमत निर्देशांक तयार करण्यात येतात याकरिता आधारभूत वर्ष कोणते वापरले जाते?
१] १९९३
२] २००३
३] २००५
४] २००८

उत्तर
२] २००३
----------------
[प्र.१०] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.
अ] जी.एस.पटेल समितीच्या शिफारशीच्या आधारावर १९८८ मध्ये सेबीची स्थापना झाली.
ब] १ एप्रिल १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा मिळाला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
[३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा मिळाला.]

-------------------------------------------------------------