प्रश्नसंच ३४ - [भूगोल]

[प्र.१] भारतातील सर्वात उंच धरण कोणते?
१] भाक्रा
२] नांगल
३] हिराकूड
४] हरिके


उत्तर
१] भाक्रा
------------------
[प्र.२] खाली दिलेल्या वने आणि त्यात आढळणारे वृक्ष यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
१] सुचीपर्णी - देवधर
२] सदाहरित - महोगनी
३] पानझडी - साल
४] भूमध्यसागरीय वने – फर, पाईन


उत्तर
४] भूमध्यसागरीय वने – फर, पाईन
------------------
[प्र.३] कोणत्या खंडातून विषुववृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त हि तीनही अक्षवृत्ते जातात?
१] दक्षिण अमेरिका
२] आफ्रिका
३] युरोप
४] आशिया


उत्तर
२] आफ्रिका
------------------
[प्र.४] 'अल निनो' या सागरी प्रवाहामध्ये होणा-या बदलांची स्थिती खालीलपैकी कोणत्या खंडाशी संबंधित आहे?
१] आशिया
२] युरोप
३] अंटार्क्टिका
४] दक्षिण अमेरिका


उत्तर
४] दक्षिण अमेरिका
------------------
[प्र.५] उरली व मोपला या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?
१] तामिळनाडू
२] केरळ
३] कर्नाटक
४] हिमाचल प्रदेश


उत्तर
२] केरळ
------------------
[प्र.६] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
१] कर्नाटक
२] उत्तरप्रदेश
३] गुजरात
४] मध्यप्रदेश


उत्तर
१] कर्नाटक
------------------
[प्र.७] नर्मदा प्रकल्पासंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ] या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशात 'सरदार सरोवर' बांधण्यात आले आहे.
ब] या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये 'इंदिरासागर धरण' बांधण्यात आले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य


उत्तर
४] दोन्ही अयोग्य
['सरदार सरोवर' गुजरातमध्ये व 'इंदिरासागर धरण' मध्यप्रदेशात बांधण्यात आले आहे.]
------------------
 [प्र.८] युरोपमध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे?
१] -हाईन
२] मिसिसीपी
३] हडसन
४] टिबर


उत्तर
१] -हाईन
------------------
[प्र.९] श्रीशैलमजवळील घळई कोणत्या नदीने तयार केली आहे?
१] पेरियार
२] पेन्नार
३] कृष्णा
४] कावेरी


उत्तर
३] कृष्णा
------------------
 [प्र.१०] हिंदाल्को हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] महाराष्ट्र
२] उत्तर प्रदेश
३] गुजरात
४] पश्चिम बंगाल


उत्तर
२] उत्तर प्रदेश
-------------------------------------------------------------