प्रश्नसंच ५१ - [विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या वायुला मार्श गॅस असेही म्हणतात?
१] प्रोड्युसर गॅस
२] मिथेन गॅस
३] वॉटर गॅस
४] हायड्रोजन गॅस

उत्तर
२] मिथेन गॅस
----------------
[प्र.२] ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी करतात?
१] AC व्होल्टेजचे रुपांतर DC व्होल्टेज मध्ये करण्यासाठी
२] DC व्होल्टेजचे रुपांतर AC व्होल्टेज मध्ये करण्यासाठी
३] योग्य AC व्होल्टेज मिळविण्यासाठी
४] योग्य DC व्होल्टेज मिळविण्यासाठी

उत्तर
३] योग्य AC व्होल्टेज मिळविण्यासाठी
----------------
 [प्र.३] हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी काय वापरतात?
१] संयुक्त सूक्ष्मदर्शक
२] अपवर्तनी सूक्ष्मदर्शक
३] साधा सूक्ष्मदर्शक
४] बहिर्वक्र भिंग

उत्तर
३] साधा सूक्ष्मदर्शक
----------------
[प्र.४] जर एका वस्तूवर एकसारखे बल एकाच वेळी लावले तर ती वस्तू .......
१] एक समान वेगाने गतिमान होईल.
२] एक समान संवेगाने गतिमान होईल.
३] एक समान त्वरणाने गतिमान होईल.
४] वरीलपैकी एकही नाही.

उत्तर
२] एक समान संवेगाने गतिमान होईल.
----------------
[प्र.५] 'M' या भ्रमणकक्षेमध्ये अधिकतम इलेक्ट्रॉंनची संख्या किती असते?
१] ८
२] १८
३] ३२
४] ६४

उत्तर
२] १८
[K = २, L = ८, M = १८, N = ३२]

----------------
[प्र.६] जर पृथ्वीभोवती वायुमंडळ नसते तर दिवसाचा कालावधी .........
१] वाढला असता
२] कमी झाला असता
३] बदलला नसता
४] अर्धा झाला असता

उत्तर
२] कमी झाला असता
----------------
[प्र.७] विद्युत वितळतारबाबत सत्य विधान ओळखा.
अ] ती विद्युत परिपथामध्ये समांतर जोडणीने जोडतात.
ब] तिचा द्रवणांक फार कमी असतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
[ती विद्युत परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडतात.]

----------------
[प्र.८] योग्य विधान ओळखा.
अ] NaCl चा उत्कलनांक पाण्यापेक्षा जास्त आहे.
ब] उंच ठिकाणी अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
----------------
[प्र.९] अयोग्य विधाने ओळखा.
अ] क्ष-किरण हे अतिसूक्ष तरंगलांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होय.
ब] क्ष-किरण धन प्रभारित असतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
[क्ष-किरण प्रभाररहित असतात.]

----------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे 'धातुसदृश' आहेत?
अ] सिलिकॉन
ब] सेलेनियम
क] आर्सेनिक
ड] कॅडमियम

१] अ आणि क
२] अ, ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
२] अ, ब आणि क
-------------------------------------------------------------