· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर फॉलोअर्स ८० लाखांच्या घरात पोहोचले आहेत. · अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पोप फ्रान्सिस यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा तिसरा क्रमांक लागतो. · मोदींचे फेसबुकवर १ कोटी ५० लाख चाहते असून फॉलोअर्सच्या चाहत्यांमुळे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. |
· गुगलने खास बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या वैदही रेड्डीने बाजी मारली होती. · बालदिनी गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून वैदहीने आसामवर रेखाटलेले चित्र दाखविण्यात आले. |
· गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २० नोव्हेंबर रोजी थाटात उद्घाटन झाले. · महोत्सवाचे प्रमुख अतिथी : अमिताभ बच्चन · पुढील वर्षी इफ्फीसाठी गोव्यातील दोनापावला येथे स्वतंत्र संकुल निर्माण करण्यात येणार · ४५व्या इफ्फीचे औचित्य साधून दक्षिणी अभिनेते रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘शताब्दी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. |
· जागतिक प्रसाधनगृह दिवसाच्या (World Toilet Day) निमित्ताने संयुक्त राष्ट्राने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५९० कोटी लोक प्रसाधनगृहाचा वापर करत नाहीत. · त्यापैकी ५९.७ कोटी उघड्यावर प्रातर्विधी उरकणारे लोक भारतातील आहेत. भारत देशातील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण जवळपास ४७ टक्के आहे. · संयुक्त राष्ट्रांनी ‘टेक पू टू द लू’ मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे उघड्यावर बसण्याचा धोका कमी होणार आहे. · भारताने २०१९ पर्यंत ११ कोटी प्रसाधनगृह बांधण्याचे ठरवले आहे. · जागतिक प्रसाधनगृह दिवस ( World Toilet Day ): १९ नोव्हेंबर |
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या महाधिवक्तापदावर नागपूर हायकोर्टातील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांची नियुक्ती केली आहे. · राज्याचे महाधिवक्ता दरायस जहांगीर खंबाटा यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती. |
· श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली. · अध्यक्ष म्हणून राजपक्षे यांची ही दुसरी टर्म आहे. श्रीलंकेत अध्यक्षपदाचा कालावधी सहा वर्षाचा असतो. · आताही त्यांचा सहा वर्षाचा कालावधी २०१६मध्ये पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी निवडणुकीची घोषणा केली आहे. |
· सर्वोच्च न्यायालयाद्वारे १० वर्षांतील रद्द करण्यात आलेल्या कोळसा खाणींच्या लिलावाची नवी प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. · पहिल्या टप्प्यात ७४ खाणींसाठी ई-लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. |
· भारताचा महत्त्वाकांक्षी अवकाश प्रकल्प मंगळ मोहिमेसाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजी सरकारचे आभार मानले आहेत. · मंगळ मोहिमेचा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून भारताचे आघाडीचे शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या अभियंत्यांनी फिजीमध्ये तळ ठोकला होता. · ही संपूर्ण मोहीम फिजीतून ऑपरेट करण्यात आली होती. |
· एमएमआरडीएच्या बैठकीनंतर मुंबई मेट्रो-२, मेट्रो-५ ला प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. · मेट्रो-२ साठी २५ हजार ६०५ कोटी तर मेट्रो-५ साठी १९ हजार ९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. · मेट्रो-२ प्रकल्पामध्ये दहिसर, चारकोप ते मानखूर्द आणि वांद्रे या मार्गाचा समावेश आहे. · मेट्रो-५ प्रकल्पामध्ये वडाळा, घाटकोपर ते ठाणे आणि कासारवाडवली या मार्गाचा समावेश आहे. |
· यंदाच्या प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता पुरस्कारासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ची निवड करण्यात आली आहे. |
· यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिकास दिला जातो. · ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. · नव्या उभारीच्या प्रतिभावंताना देण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्कारासाठी कवी संदीप खरे यांची निवड करण्यात आली. · तर गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांना देण्यात येणार आहे. · गायिका उर्मिला धनगर यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे. · शिवाय मराठी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणारी हातकणंगले येथील विद्यार्थिनी नेहा शांतीनाथ पाटील हिला गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे. |
चालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा