चालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१४

·        चायना ओपन सुपर सिरीज प्रिमियर बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष आणि महिला एकेरीचे जेतेपद भारतीयांनी मिळविले.

·        सायना नेहवालने अंतिम फेरीच्या रोमहर्षक लढतीत जपानच्या अकेन यामागुचीचा २१-१२, २२- असा पराभव करत पहिल्यांदाच चायना ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

·        सायनाचे वर्षातील तिसरे जेतेपद आहे. यापूर्वी जूनमध्ये तिने ऑस्ट्रेलिया सुपर सिरीजचे जेतेपद पटकावले होते तर वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रँड पिक्स गोल्ड स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.

·        पुरुष एकेरीत कें.श्रीकांतनेही उत्तम खेळ करत पाचवेळा विश्वविजेत्या आणि ऑलम्पिक स्पर्धेच्या सुवर्णपदक विजेत्या चीनच्या लिन डॅनवर २१-१९, २१-१७ अशी मात केली. आतापर्यंत श्रीकांतने आपल्या कारकिर्दीत मिळवलेला हा सर्वात  मोठा विजय आहे.

·        घरगुती गॅसचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याच्या डीबीटीएल योजनेची सर्व जिल्ह्यात अमलबजावणी करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

·        यानंतर गोव्याचा नंबर लागतो.

·        माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांना प्रतिष्ठेची जवाहरलाल नेहरू फेलोशिप जाहीर झाली आहे.

·        जवाहरलाल नेहरू स्मृती निधीतून ही फेलोशिप दिली जाते.

·        राव "राजकीय इतिहास : भारत आणि चीन, १९४९-१९६२" या विषयावर संशोधन करणार आहेत. त्या २००९ ते २०११ दरम्यान परराष्ट्र सचिव होत्या.

·        चोकिला अय्यर यांच्यानंतरच्या त्या दुस-या महिला परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. राव यांनी अमेरिका, चीन, श्रीलंका आदी देशांमध्ये विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

·        शेतीसंबंधित संपूर्ण माहिती पुरवणारी दूरदर्शन किसान ही २४ तास टिव्ही वाहिनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

·        या वाहिनीद्वारे हवामानाची स्थिती, बियाणे, शेतीसंबंधित सर्व विषयांचे मार्गदर्शन शेतक-यांना केले जाणार आह. तसेच विविध अकरा भाषांमध्ये ही वाहिनी उपलब्ध होणार आहे.

·        गोवा आणि केरळ ही दोन राज्ये पद्दुचेरी,चंडीगड आणि लक्षव्दीप या तीन केंद्रशासित प्रदेशांनी प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत १००% आर्थिक समावेश (Financial Inclusion) चे उद्दिष्ट साध्य केले आहे.

·        ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ब्रिस्बेनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

·        महात्माजींचा हा पुतळा ब्रिस्बेनच्या रोमा स्ट्रिट पार्कलँडमध्ये उभा करण्यात आला आहे.

·        पंतप्रधान मोदी ब्रिस्बेन येथे जी-२० च्या बैठकीसाठी गेलेले होते.

·        जी-२० चा अर्थ आहे ग्रुप-२०. हा जगातील १९ शक्तीशाली देश आणि युरोपियन युनियन (युरोप देशांचा समुह) यांचा समुह आहे. याची स्थापना १९९९ मध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती.

·        मात्र २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीनंतर या जागितिक समुहाचे नेतृत्व अर्थमंत्र्यांकडून समुह देशांच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले.

·        हा समुह जगातील ८५ टक्के अर्थव्यवस्था आणि ७५ टक्के व्यापारावर नियंत्रण ठेवतो. अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, भारत रशिया यांसारख्या महत्वाच्या देशांचे प्रमुख दरवर्षी जी-२० परिषदेच्या निमित्ताने भेटत असतात.

·        यावर्षीची शिखर परिषद ही वी आहे. याचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले आहे

·        पुढील वर्षी (२०१५) ही परिषद तुर्कस्थानात होणार आहे.

·        केंद्र सरकारने जारी केलेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोख्यासाठी पुन्हा कटिबध्द होण्यासाठी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण देशात कौमी एकता सप्ताह (राष्ट्रीय एकात्मता सप्ताह) साजरा होईल.

·        १९ नोव्हेंबर - राष्ट्रीय एकता दिन

·        २० नोव्हेंबर - अल्पसंख्याक कल्याण दिन

·        २१ नोव्हेंबर - भाषिक सलोखा दिन

·        २२ नोव्हेंबर - मागास घटकांसाठीचा दिन

·        २३ नोव्हेंबर - सांस्कृतिक ऐक्य दिन

·        २४ नोव्हेंबर - महिलांसाठीचा दिन

·        २५ नोव्हेंबर - पर्यावरण रक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल.

·        युरोपीय अवकाश संस्थेच्या फिली या यंत्रमानवरूपी लँडरने ६७ पी चुरयुमोव- गेरिसमेन्को या धूमकेतूवर चांगले बस्तान बसवले असून त्याने रोसेटा या मातृयानाशी संपर्क साधला; शिवाय काही छायाचित्रेही पृथ्वीकडे पाठवली आहे.

·        आता त्याची बॅटरी संपल्यानंतर ते थंडावले आहे पण त्याच्याआधीच त्याने धूमकेतूची बरीच माहिती पाठवली आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा