चालू घडामोडी - ७ नोव्हेंबर २०१४

  • नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा सल्लागार समितीने जाहीर केलेल्या अहवालात प्राथमिक ते शालांत परीक्षेपर्यंत मराठी अनिवार्य करण्यात यावी अशी शिफारस केली. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर प्रवीण परदेशी (वन विभाग प्रधान सचिव) आणि मिलिंद म्हैसकर (मदत व पुनर्वसन विभाग प्रधान सचिव) यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
  • बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात त्यांचे जावई देवेंद्रकुमार यांची स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 
  • राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा बरखास्त केली असून फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होतील. 
  • अमेरिकेतील निवडणुकीमध्ये सिनेटच्या १०० जागांपैकी ५२ जागा रिपब्लिकन तर ४३ जागा डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकल्या. पूर्वीच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे ४५ तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे ५३ जागा होत्या. 
    • डेमोक्रॅटिक पक्षाच्या तुलसी गॅब्बर्ड "हवाई" येथून दुसऱ्यांदा विजयी झाल्या. अमेरिकी काँग्रेसमधील त्या एकमेव हिंदू सदस्या आहेत. 
    • भारतीय वंशाच्या निकी हॅले दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. 
  • अमेरिका उपखंडातील कॅलिफोर्निया ते वॉशिंग्टन दरम्यान घेतल्या जाणाऱ्या 'रॅम' या सायकलिंग रेसमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकचे डॉ. महेंद्र आणि हितेंद्र महाजन या बंधूंची निवड झाली आहे. ४८०० किलोमीटरची हि स्पर्धा १२ दिवसात पूर्ण करावी लागते.