चालू घडामोडी - २ नोव्हेंबर २०१४
- अंतराळ पर्यटनासाठी तयार करण्यात आलेल्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक' या अंतराळयानाचा स्फोट कॅलिफोर्निया येथे झाला.
- व्हर्जिन विमानवाहतूक कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी हि महत्वकांक्षी योजना आखली आहे.
- कर्नाटक राज्योत्सव दिनाचे औचित्य साधून राजधानी बंगळूरसह राज्यातील १२ शहरांचे कन्नड नामांतर कर्नाटक राज्य सरकारने केले.
- बेळगावमधील मराठी भाषिक नागरिकांनी हा दिवस 'काळा दिन' म्हणून पाळून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
- नावे बदलण्यात आलेली १२ शहरे १. बेळगाव (बेळगावी), २. म्हैसूर (म्हैसुरु), ३. बंगलोर (बंगळूरू), ४. गुलबर्गा (कलबुर्गी), ५. विजापूर (विजयपुरा), ६. शिमोगा (शिवमोग्गा), ७. होसपेट (होसपेटे), ८. हुबळी (हुब्बळळी), ९. तुमकुर (तुमकुरु), १०. चिकमंगळूर (चिक्कमंगळुरू), ११. मंगळूर (मंगळूरू) १२. वेल्लारी (बळळारी)
- १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५वी जयंती साजरी करण्यात आहे.
- त्यानिमित्त १४ ते १९ नोव्हेंबर याकाळात देशातील सर्व शाळांमध्ये "बाल स्वच्छता मिशन" राबविण्यात येणार आहे.
- तसेच हे वर्ष "बाल स्वच्छता वर्ष" म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
- दौरा अर्धवट सोडून जाणाऱ्या वेस्ट इंडीज संघामुळे BCCI ने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून २५० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.