चालू घडामोडी - २२ व २३ नोव्हेंबर २०१४

·        यंदाच्या वर्षातील २५ सर्वोत्तम शोधांची यादी टाईमया नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे.

·        त्यात भारताच्या 'मंगळयाना'चा समावेश आहे.

·        भारताच्या २०१५ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

·        जगातील पहिली पांढ-या वाघांची सफारी मध्य प्रदेशातील रेवा येथे पुढील महिन्यात सुरू होणार आहे.

·        रेवा येथे १९५१ मध्ये पहिला पांढरा वाघ दिसल्याची नोंद आहे

·        मराठा आरक्षणासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विचार समिती स्थापन करण्यात आली.

·        या समितीत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधी व न्याय विभागाच्या सचिवांचा समावेश आहे.

·        सेबी (SEBI) ने दिल्ली शेअर बाजाराची मान्यता रद्द केली आहे.

·        "ईनसीड" या बिझनेस स्कूलने जगातील आघाडीच्या शहरांची पाहणी करून सर्वाधिक आकर्षक शहरांची यादी तयार केली आहे. यामध्ये दुबई,ऍमस्टरडॅम  अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असून मुंबई भारतात सर्वप्रथम तर जगात तेराव्या स्थानी आहे.

·        आकर्षकतेमध्ये मुंबईला तेरावे स्थान मिळाले असून, आर्थिक उलाढालीमध्ये सातवे, जीवनाच्या गुणवत्तेमध्ये पंधरावे आणि जीवनमूल्यामध्ये हे शहर पाचव्या स्थानी आहे.

·        फॉर्मुला- चा सात वेळचा वर्ल्ड चॅम्पियन मायकल शूमाकर कोमातून बाहेर आला आहे. मात्र, शूमाकरला बोलणे आणि चालण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्याला अर्धांगवायू झाल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा