- भारत जपान संबंधांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनमोहन सिंग यांना "द ग्रँड कॉर्डोन ऑफ द पौलोवनिया फ्लॉवर्स" या जपानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
- फ्रान्समध्ये "सीवायडी-टिडिव्ही" (CYD-TDV) या डेंग्यूच्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होइल. ही लस सॅनोफी पाश्चर कंपनीने तयार केली आहे.
- पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धकसोटी मालिका २-० अशी जिंकून ICC रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
- ICC रॅंकिंग :
- दक्षिण आफ्रिका (१२४ गुण)
- ऑस्ट्रलिया (११७ गुण)
- पाकिस्तान (१०५ गुण)
- इंग्लंड (१०४ गुण)
- श्रीलंका (१०१ गुण)
- भारत (९६ गुण)
- आर्थिक विकासदर निर्देशांकासाठी २०११-२०१२ हे नवीन आधारभूत वर्ष मानले जाणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते.
- किरकोळ व्यापारातील निर्देशांक (CPI), घाऊक बाजारातील निर्देशांक (WPI), औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP) यासाठी २०१४-२०१५ हे आधारभूत वर्ष मे २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते.
- माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले.
- काँग्रेसमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपामुळे हि कारवाई करण्यात आली.
- तामिळनाडूमध्ये तमिळ मनिला काँग्रेसची स्थापना करण्याचे वासन यांचे प्रयत्न चालू आहेत.
- पिता जी. के. मुपनार यांनी स्थापन केलेल्या तमिळ मनिला काँग्रेसचे १४ वर्षांनंतर पुनरुज्जीवन करण्यासाठी वासन सज्ज झाले आहेत.
चालू घडामोडी - ४ नोव्हेंबर २०१४
लेबल:
asst pre,
Asst Pre 2014,
civil services,
Current affairs,
economics,
Important questions for MPSC,
MPSC,
mpsc blog,
MPSC Mains,
MPSC online,
mpsc online study,
mpsc study material,
psi pre,
STI,
sti pre