- मित्रांनो महाराष्ट्र विधान सभेत आवाजी मतदानाने विश्वास समर्थन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चला आता जाणून घेवू या कि आवजी मतदान हा काय प्रकार आहे . साधारणत: एखाद्या विधेयकावर आमदारांनी मांडलेल्या सूचना किंवा प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात येते. या प्रकारच्या मतदानात आमदार त्यांचा होकार किंवा नकार, होय किंवा नाही हे बोलून सांगतात. हि मतदान पद्धतीतील सर्वात सोपी व सुलभ पद्धत आहे.
- ह्या पद्धतीत सभापती प्रस्तावावर सभागृहातील सभासदांना त्यांचा होकार किंवा नकार होय किंवा नाही म्हणून सांगावयास लावतात. आधी ते होकार असणार्यांना विचारतात व नंतर नकार असणार्यांना त्यांचे मत विचारतात.
- त्यानंतर ते त्यांचा ढोबळ मानाने घेतलेला निर्णय सभागृहाला देतात. हि मतदान पद्धती सदोष आहे व अचूक निर्णय होईलच याची खात्री नसते विशेषत: जेव्हा हो आणि नाही म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास सारखीच असते. अशा स्थितीत एखाद्या सदस्याने मागणी केल्यास मतविभागणी द्वारे किंवा इतर पद्धतीने मतदान करण्याची घटनेत तरतूद आहे.
- आवाजी मतदानात किती मते मिळाली याची नोंद कामकाजात केली जात नाही मात्र इतर पद्धतीच्या मतदान पद्धतीत मिळालेल्या मतांची नोंद केली जाते.
- भारताखेरीज हि पद्धत अमेरिका व इंग्लंड मध्ये वापरण्यात येते . अमेरिकेत ९५ % विधेयके या पद्धतीनेच संमत करण्यात येतात.
- भारतात हि पद्धती लोकसभा, राज्यसभा व घटक राज्यांच्या विधानसभेत विधेयक संमत करण्यास वापरली जाते.
- हि पद्धती जेव्हा सभागृहात मतैक्य नसते तेव्हा वापरली जाते. तेलंगाणा राज्याला २९व्या राज्याचा दर्जा देण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आला.
- १४ ऑगस्ट २०१४ रोजी राज्यसभेने न्यायाधीशांच्या नेमणुकीच विधेयक आवाजी मतदान पद्धतीने संमत केले होते
- १२ नोव्हेंबर २०१४ रोजी भाजपा ने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने संमत केला , शिवसेना व कॉंग्रेसने या बाबत प्रश्नचिन्ह उभे केले असून मतविभागणी ची मागणी केली
आवाजी मतदान म्हणजे काय?
लेबल:
आवाजी मतदान,
विधानसभा निवडणूक,
bjp,
Current affairs,
latest news,
MPSC,
MPSC Mains,
mpsc pre,
STI pre 2015,
upsc