| 
·       
  ‘चार्ली
  हेब्डो’ व्यंगसाप्ताहिकावर
  हल्ला
  करणाऱ्या
  दोन दहशतवाद्यांचा
  खात्मा करून
  पॅरिस
  पोलिसांनी अखेर
  हे भयनाट्य
  संपवले.  
·       
  तर
  त्याचवेळी
  पूर्व
  पॅरिसच्या
  एका ज्यू सुपरमार्केटमध्ये
  अनेक
  नागरिकांना
  ओलिस धरत नवा दहशतअध्याय
  सुरू
  केलेल्या
  हल्लेखोरालाही
  पोलिसांनी
  कंठस्नान
  घातले. मात्र
  तोपर्यंत त्याने
  चार
  निष्पापांना
  ठार केले
  होते. 
·       
  ‘चार्ली
  हेब्डो’ हल्ल्यातील
  सईद कुआशी
  आणि चेरिफ
  कुआशी या बंधूंनी
  पॅरिसच्या
  ईशान्येकडील
  व चार्ल्स द गॉल
  विमानतळाजवळच्याच
  दामार्टिन-एन-गोल
  शहरातील एका
  गोदामात
  आश्रय
  घेतल्याचे
  पोलिसांना
  समजताच, त्यांनी
  या शहराच्या
  सर्व
  प्रवेशवाटा
  बंद केल्या.  
·       
  हेलिकॉप्टर
  व
  पोलिसांच्या
  असंख्य
  वाहनांनी आठ
  हजार
  वस्तीच्या
  या शहराला
  वेढा दिला.
  विमानतळावरील
  दोन रनवेही
  बंद केले.
  नंतर या गोदामाच्या
  दिशेने कूच
  करत, पोलिसांनी
  स्फोटकांनी
  हल्ला चढवला
  व त्याचवेळी
  सुरक्षारक्षकांनी
  आत प्रवेश
  करीत, त्यांना
  ठार केले. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा