| 
·       
  ज्येष्ठ
  शास्त्रज्ञ डॉ. वसंत
  गोवारीकर
  यांचे निधन
  झाले. 
·       
  सावित्रीबाई
  फुले पुणे
  विद्यापीठाचे
  ते माजी
  कुलगुरू
  होते. 
·       
  हवामान
  संशोधन, अवकाश
  आणि
  लोकसंख्या
  या
  क्षेत्रात
  त्यांचा संशोधनात्मक
  अभ्यास
  होता. 
·       
  ते मराठी
  विज्ञान
  परिषदेचे
  काही काळ
  अध्यक्ष
  होते. 
·       
  १९६५
  मध्ये टाटा
  इन्स्टिट्यूट
  ऑफ
  फंडामेंटल
  रिसर्च या
  संस्थेमध्ये
  त्यांनी काम
  करायला सुरुवात
  केली.
  त्यांच्या
  नेतृत्वाखाली
  एसएलव्ही-२.५
  हा उपग्रह
  वाहक तयार
  झाला. 
·       
  विज्ञान
  व तंत्रज्ञान
  विभागाचे
  सचिव
  आणि १९९२ ते १९९३
  या कालावधीत
  पंतप्रधानांचे
  विज्ञान
  सल्लागार
  म्हणून
  त्यांनी काम
  केले होते. 
·       
  लोकसंख्येवर
  भाष्य
  करणारे ‘आय- प्रेडीक्ट’
  हे त्यांचे
  पुस्तक
  प्रसिद्ध
  आहे. 
·       
  ते
  महाराष्ट्र
  शासनाच्या ‘राजीव
  गांधी विज्ञान
  आणि
  तंत्रज्ञान
  आयोगाचे’ अध्यक्ष
  होते. 
·       
  त्यांना 
  पदमश्री आणि
  पदमभूषण
  पुरस्कारांनी
  गौरविण्यात
  आले
  होते. 
·       
  वयाच्या
  अवघ्या २८
  व्या वर्षी
  त्यांना
  केम्ब्रिज
  विद्यापीठाने
  डॉक्टरेटच्या
  प्रबंधांचे
  परीक्षक
  म्हणून
  नेमले होते. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा