·
नर्मदा
नदीच्या
कालव्यावर
३.६ किलोमीटर
अखंड
लांबीचा १०
मेगावॉट
क्षमता
असलेला सौर
ऊर्जा
निर्मिती
प्रकल्प
सुरु
करण्यात आला
आहे.
·
कालव्यावर
छत टाकून
केलेल्या या
प्रकल्पातून
दरवर्षी
१.६२ कोटी
युनिट
विजेचे
उत्पादन
होणार आहे.
तसेच यामुळे
कालव्यातील प्रवाहाच्या
बाष्पीभवनाला
आणि
प्रदूषणाला
आळा बसणार
आहे.
·
संयुक्त
राष्ट्रसंघाचे
सरचिटणीस
बान की मून
यांच्या
हस्ते या
प्रकल्पाचे
उद्घाटन झाले.
·
गुजरात
सरकारने ‘सरदार
सरोवर
नर्मदा निगम लिमिटेड’
ही संस्था
स्थापन केली
आहे. या
प्रकल्पासाठी
सरकारने १०९.९१
कोटी रुपये
खर्च केले
आहेत.
कालव्यावर
साडेतीन
किलोमीटर
लांब छप्पर
केले असून, त्यावर
३६ हजार
सौर पॅनल
बसविण्यात
आले आहेत.
·
हैदराबाद
येथील मेघा
इंजिनिअरिंग
आणि इन्फ्रास्ट्रक्चर
लिमिटेड
(एमईआयएल) या
कंपनीने
प्रकल्प
पूर्णत्वास
नेला असून, पुढील
२५ वर्षे
कंपनी
त्याची
देखभाल
करणार
आहे.
·
ताशी
१५०
किलोमीटर
वेग
असलेल्या
वाऱ्याचा सामना
करण्याची या
प्रकल्पाची
क्षमता
आहे.
·
पहिल्या
वर्षी १.६२
कोटी विजेचे
युनिट उत्पादन
प्रकल्पातून
होणार आहे.
·
सौर
पॅनेलमुळे कॅनॉलमध्ये
पडणारा कचरा
पूर्णपणे
बंद झाला आहे.
तसेच, उन्हाळ्यात
या पाण्याचे
होणारे
बाष्पीभवन घटेल.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा