·
सरकारच्या
धोरणावर
आगपाखड करीत
लीला सॅमसन यांनी
सेन्सॉर
बोर्डाच्या
अध्यक्षपदाचा
राजीनामा
दिल्यानंतर
या पदावर सुप्रसिद्ध
चित्रपट
निर्माते
पहलाज निहलानी
यांची
नियुक्ती करण्यात
आली आहे.
सरकारने
बोर्डाचे
पुनर्गठन
करीत अन्य नऊ
सदस्यांचीही
नियुक्ती
केली.
·
डेरा
सच्चाचे
प्रमुख
गुरमीत राम
रहीम सिंग यांची
मुख्य
भूमिका
असलेल्या ‘मेसेंजर
ऑफ गॉड’ या
वादग्रस्त
चित्रपटाला
चित्रपट
प्रमाणीकरण
अँपिलेट
लवादाने
(एफसीएटी) मंजुरी
दिल्यानंतर
लीला सॅमसन
यांनी
तडकाफडकी राजीनाम्याचा
निर्णय
घेतला होता.
·
बोर्डाने
मनाई केली
असतानाही
एफसीएटीने
प्रदर्शनाला
मंजुरी
दिल्याने
त्या नाराज
झाल्या
होत्या.
त्यांच्या
सर्मथनार्थ बोर्डाच्या
अनेक
सदस्यांनीही
राजीनामे दिले
होते.
·
सरकारने
बोर्डाचे नऊ
सदस्यही
नियुक्त
केले आहेत.
या नऊ
सदस्यांमध्ये
भाजपा
नेत्या वाणी
त्रिपाठी
टिक्कू, चित्रपट
निर्माते
अशोक पंडित, चंद्रप्रकाश
द्विवेदी
यांचा
समावेश आहे. अन्य
सदस्यांमध्ये
पटकथा लेखक
मिहिर भुटा, सय्यद
अब्दुल बारी, रमेश
पतंगे, कलाकार
जॉर्ज बेकर, अभिनेता
आणि चित्रपट
निर्माता
जिविता आणि अभिनेता
एस. व्ही. शेखर
यांचा
समावेश आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा