शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

चालू घडामोडी - १९ जानेवारी २०१५

·        १९ जानेवारी १९०५ : देबेन्द्रनाथ टागोर स्मृतिदिन
·       दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डी-विलियर्सने विंडीजविरुद्धच्या वन डे सामन्यातA B Devilliers अवघ्या ३१ चेंडूत दमदार शतक ठोकत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
·       त्याने ४४ चेंडूत ३३८.६४ च्या सरासरीने १४९ धावा केल्या आणि बाद झाला. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश आहे.
·       प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हाशिम आमला आणि रिली रोसू या दोघांची जोडी फोडणंच विंडिज संघाला कठीण गेलं. आमला आणि रोसू दोघांनही शतक ठोकले. रोसू १२८ धावांवर बाद झाला आणि आमला मात्र १५३ धावांवर नाबाद राहिला.
·       सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या ५० जागतिक बँकांच्या यादीत भारताच्या एचडीएफसी या एकमेव बँकेला स्थान मिळाले असून ४१ अब्ज डॉलर बाजारमूल्य (२०१४ अखेर) असलेली ही बँक यादीत ४५ व्या क्रमांकावर आहे.
·       स्टेट बँक (बाजारमूल्य ३६.४० अब्ज डॉलर) आणि आयसीआयसीआय बँक (बाजारमूल्य ३६.४० अब्ज डॉलर) अनुक्रमे ५१ आणि ५५ व्या क्रमांकावर आहे.
·       अमेरिकेतील वेल फार्गो ही जगातील सर्वात मोठी बँक असून जगभर ७ कोटी ग्राहक आणि ९ हजार शाखा असणाऱ्या या बँकेचे बाजारमूल्य २४८.३९ अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे.
·       बाजारमूल्याच्या आधारावर इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे. या बँकेचे बाजारमूल्य २३३.९४ अब्ज डॉलर इतके आहे.
·       पहिल्या दहा बँकांमध्ये अमेरिका आणि चीनच्या प्रत्येकी ४ आणि ब्रिटन, ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका बँकेचा समावेश आहे.
·       बाजारमूल्य - एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत आणि शेअर्सची एकूण संख्या यांचा गुणाकार.
·       सामाजिक बांधलकी (सीएसआर) म्हणून विविध उपक्रम राबवण्यासाठी सर्वाधिक खर्च करणाऱ्या जगभरातील कंपन्याच्या ‘फॉर्च्युन ग्लोबल ५००’ यादीत आठ भारतीय कंपन्या आहेत. रिलायन्स आणि ओएनजीसी आदी आठ कंपन्यांनी वर्षभरात ८ कोटी डॉलर ‘सीएसआर’साठी खर्च केले आहेत.
·       या तुलनेत १३२ अमेरिकन कंपन्यांनी १० अब्ज डॉलर खर्च केले. २६ ब्रिटिश कंपन्यांनी २ अब्ज डॉलर, आठ ऑस्ट्रिलियन कंपन्यांनी ९० कोटी ८० लाख डॉलर तर आठ स्पॅनिश कंपन्यांनी ६० कोटी ४८ लाख डॉलर खर्च केले आहेत.
·       जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या सामाजिक प्रकल्पांवर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी असून प्रत्येकी सुमारे १ कोटी डॉलर इतके आहे. अर्थात चीन आणि जपानी कंपन्यांपेक्षा ते जास्त आहे.
·       यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले कॉंग्रेस नेते कृष्णा तिरथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
·       अमेरिकेतील उद्योजक आणिFrank Islam समाजसेवक फ्रँक इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
·       आंतरराष्ट्रीय सेवा आणि नागरी क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल दि मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष हॅरी जॉन्सन यांच्या हस्ते इस्लाम यांना गौरविण्यात आले.
·       इस्लाम मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा