·
६
जानेवारी १८३२
:
बाळशास्त्री
जांभेकरांनी
मराठीतील पहिले
वृत्तपत्र ‘दर्पण’सुरु
केले.
·
६
जानेवारी १९२८
: विजय
तेंडुलकर
जन्मदिन, मराठी
साहित्यिक.
|
·
दहा
टन वजनाच्या
उपग्रहाला
अवकाशात
नेतील असे
प्रक्षेपक, पुन्हा-पुन्हा
वापरता येईल
असे पंख
असणारे रॉकेट,
मानवी अवकाश
मोहीम, चंद्र
आणि
मंगळासोबत
बुध, शुक्र
आणि
लघुग्रहांच्या
परिक्रमा
करणारी याने, जीपीएसपेक्षाही
आधुनिक
भारतीय
दिशामार्गदर्शक
प्रणाली आणि
प्रत्येकाच्या
गरजेनुसार
मोबाइल
फोनवर
उपलब्ध
होणारी
लाइव्ह माहिती...
·
येत्या
वीस वर्षांत
अवकाश
क्षेत्रात
भारत कोठे
असू शकेल
याची झलक सायन्स
काँग्रेसमध्ये
अवकाश
संशोधन
संस्थेच्या
वरिष्ठ
शास्त्रज्ञांनी
‘अवकाश
विज्ञान आणि
तंत्रज्ञान’ या
विषयावर
आयोजित
परिसंवादात
दाखवली.
|
·
इंडियन
रिजनल
नेव्हिगेशन
सॅटेलाइट
सिस्टिम
(आयआरएनएसएस)
ही सात
उपग्रहांची
शृंखला चालू
वर्षात सक्रीय
होणार आहे.
·
या
सिस्टिमच्या
माध्यमातून
अमेरिकेच्या
ग्लोबल
पोझिशनिंग
सिस्टिमसारखी
(जीपीएस) गगन
ही भारतीय
दिशामार्गदर्शक
प्रणाली उपलब्ध
होणार आहे.
·
GAGAN - GPS Aided Geo Augmented Navigation
·
‘गगन’द्वारे
एक मीटरच्या
अचूकतेने
स्थाननिश्चिती
होणार
असून, वाहने, रेल्वे,
हवाई वाहतूक
या सर्व
क्षेत्रांना
त्याचा लाभ
होणार आहे.
त्यासाठी
जमिनीवरही
पंधरा केंद्रे
बसविण्यात
येत आहेत.
·
कोणत्याही
अवस्थेत
सिग्नल
जाणार नाहीत
अशी ‘गगन’ची
खासियत
आहे. देशातील
सर्व मोबाइल धारकांना
येत्या
काळात
जीपीएसपेक्षाही
प्रभावी ‘गगन’चा
पर्याय
उपलब्ध
होणार आहे.
|
·
पाटणा
येथे २७
ऑक्टोबर
२०१३ रोजी
पंतप्रधान नरेंद्र
मोदी
यांच्या ‘हुंकार
रॅली’ दरम्यान
झालेल्या
बॉम्बस्फोटप्रकरणी
इंडियन
मुजाहिदीन
(आयएम) आणि
स्टुटंड
इस्लामिक
मूव्हमेंट
ऑफ इंडिया
(सिमी)च्या
अकरा संशयितांविरोधात
राष्ट्रीय
तपास
यंत्रणेच्या
(एनआयए) विशेष
कोर्टाने
गुन्हा दाखल
केला आहे.
·
या
घटनेत ६
जणांचा
मृत्यू
झाला होता, तर १०० जण
जखमी झाले
होते.
|
·
ईदच्या
मिरवणुकीदरम्यान
काही
तरुणांनी भारतविरोधी
आणि
पाकिस्तान
झिंदाबादच्या
घोषणा
दिल्यामुळे
बेळगाव
शहरातील
काही भागांत
रविवारी
तणाव
निर्माण
झाला होता.
·
प्रक्षोभक
घोषणाबाजी
करणाऱ्या
तरुणांवर पोलिसांनी
तत्काळ
कारवाई केल्यामुळे
पुढील
अनुचित
प्रकार टळला.
|
·
पंजाबचे
माजी
मुख्यमंत्री
बेअंतसिंग
यांच्यासह
इतरांच्या
१९९५मधील
हत्या
प्रकरणात
सहभाग
असलेला फरारी
शीख
दहशतवादी
जगतारसिंग
तारा उर्फ
गुरमितसिं(वय
३७) याला
थायलंड
पोलिसांनी
अटक केली आहे.
·
जगतारसिंग
तारा
ऑक्टोबरमध्ये
थायलंडमध्ये
आला होता,
त्याला चॉन बुरी
प्रांतात
सोमवारी अटक
केल्याचे
थाई नॅशनल
पोलिसांचे
प्रवक्ते लेफ्टनंट
जनरल प्रवुत
थावोर्नसिरी
यांनी सांगितले.
|
·
केंद्रीय
राज्यमंत्री
आणि
जालन्याचे
खासदार
रावसाहेब
दानवे यांची महाराष्ट्र
प्रदेश
भाजपाध्यक्षपदी निवड
झाली.
|
·
माजी
केंद्रीय
राज्यमंत्री
शशी थरूर
यांच्या
पत्नी
सुनंदा पुष्कर
यांचा
मृत्यू
हत्या
असल्याची
खळबळजनक
माहिती
दिल्ली
पोलीस
आयुक्त बी.एस.
बस्सी यांनी
दिली
आहे.
·
या
आधी सुनंदा
पुष्कर
यांनी
आत्महत्या
केल्याची
शक्यता
व्यक्त
करण्यात आली
होती.
मात्र
पोलिसांनी
केलेल्या या
खुलाशानंतर
शशी थरूर
यांच्या
अडचणी
वाढल्या
आहेत.
·
दिल्ली
पोलिसांनी
या प्रकरणी अज्ञात
व्यक्तीविरोधात
गुन्हा दाखल
केला आहे.
·
१७
जानेवारी
२०१४
रोजी दिल्लीच्या
लीला
हॉटेलमध्ये
सुनंदा
पुष्कर
यांचा
मृतदेह
आढळला होता.
|
·
माजी
पंतप्रधान
अटलबिहारी
वाजपेयी व
पंडित मदनमोहन
मालवीय
यांना ‘भारतरत्न’
सन्मान
दिल्यानंतर
मोदी सरकार
आता भाजपचे ज्येष्ठ
नेते
लालकृष्ण
आडवाणी व
योगगुरू बाबा
रामदेव
यांना पद्म
पुरस्काराने
गौरविणार
असल्याची शक्यता
आहे.
·
१९५४
पासून
आतापर्यंत
भारत
सरकारने २९४
व्यक्तींना ‘पद्म
विभूषण’,
१२२९
व्यक्तींना ‘पद्म
भूषण’
तर २६७९
व्यक्तींना 'पद्मश्री’ पुरस्काराने
गौरविले आहे.
|
·
काश्मीरमधील
सांबा आणि
कथुआ
भागांतील
भारतीय
चौक्यांना पाक
सैन्याने
लक्ष्य केले
असून,
त्यांच्या
तोफमाऱ्यात
सीमा
सुरक्षा
दलाचा एक
जवान शहीद
झाला आहे.
·
पाकिस्तानी
सैन्य नागरी
वस्त्यांवरही
तोफमारा करू
लागले असून
त्यांच्या
या दुःसाहसाला
भारतीय
लष्कराकडून
प्रत्युत्तर
दिले जात आहे.
|
·
मराठी
उद्योजकांची
उत्पादने
आणि सेवांना
जागतिक
स्तरावर
बाजारपेठ
मिळावी या
उद्देशाने सॅटर्डे
क्लब ग्लोबल
ट्रस्टने ९
आणि १० जानेवारी
रोजी वर्ल्ड
ट्रेड सेंटर, कफ
परेड येथे ‘उद्योगबोध-२०१५’ या आंतरराष्ट्रीय
उद्योजक
परिषदेचे
आयोजन केले
असल्याची
माहिती संस्थापक
माधवराव
भिडे यांनी
दिली.
|
·
एनटीटी
डोकोमो
या जपानच्या
अग्रणी
टेलिकॉम
कंपनीने टाटा
टेलिसर्व्हिसेसच्या
विरोधात
लवादाकडे
धाव घेतली
आहे.
·
गेल्या
वर्षी ‘टाटा
डोकोमो’ या
कंपनीपासून
फारकत
घेण्याचा
निर्णय घेतल्यानंतर
टाटांनी
कंपनीचा
उर्वरित
हिस्सा ७,२५०
कोटी
रुपयांना
खरेदी
करण्याचे
आश्वासन
दिले होते.
·
मात्र,
आपला
शब्द
पाळण्यात
टाटा कंपनी
अपयशी ठरल्याचा
दावा ‘एनटीटी
डोकोमो’ने
केला आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा