·
तिरकस
आणि
व्यंगात्मक
लिखाणासाठी
प्रसिद्ध
असलेले
फ्रान्समधील
‘चार्ली
हेब्डो’
साप्ताहिक
दहशतवाद्यांचे
लक्ष्य ठरले.
·
‘आयसिस’च्या
दहशतवाद्यांनी
‘चार्ली
हेब्डो’
मुख्यालयावर
केलेल्या अंदाधुंद
गोळीबारात
१२ जण ठार तर
१० जण गंभीर जखमी
झाले आहेत. मृतांमध्ये
साप्ताहिकाचे
संपादक
स्टिफन
शार्बोनियर
यांच्यासह ४
व्यंगचित्रकार,
६ पत्रकार व २
पोलिसांचा
समावेश आहे.
·
थेट
आणि
धर्मांच्या
सीमांपलिकडे
विचार मांडणारे
साप्ताहिक
म्हणून
त्याची ओळख
आहे.
कार्टुन्स, वादविवाद,
वेगवेगळ्या
विषयांवरील
तपशीलवार
अहवाल, विनोद
आदींचा
त्यात
समावेश असतो.
·
निधर्मी
आणि कडव्या
डाव्या
विचारसरणीच्या
लेखनामुळे
इस्लाम, ख्रिश्चन,
ज्यू, उजवी
विचारसरणी, राजकारण,
संस्कृती
आदींवर या
साप्ताहिकामध्ये
प्रामुख्याने
भाष्य होते.
·
१९६९
ते १९८१ या
कालावधीमध्ये
हे
साप्ताहिक पहिल्यांदा
सुरू झाले
होते.
त्यानंतर ते बंद
करण्यात आले. मात्र, १९९२
मध्ये ते
नव्याने
सुरू झाले.
·
२
नोव्हेंबर
२०११ला या
साप्ताहिकाच्या
कार्यालयावर
बॉम्बहल्ला
झाला होता.
·
साप्ताहिकाचे
ब्रीदवाक्य - आम्हाला
कट्टरपंथीयांचे
हसू येते. ते
मुस्लिम असो, ज्यू
किंवा
कॅथलिक... धार्मिक
असणे गैर
नाही, पण
कट्टर विचार
आणि तशीच
कृती
आम्हाला
मान्य नाही...
·
शेवटचे
‘ट्विट’ आणि
हल्ला - या
कार्यालयावर
हल्ला
होण्याआधी ‘चार्ली
हेब्डो’ साप्ताहिकाकडून
एक कार्टून
ट्विट
करण्यात आले
होते. तेही
इस्लामी
दहशतवादाशी
संबंधित होते.
आयएसआयएस
दहशतवादी
संघटनेचा म्होरक्या
अल बगदादी
नववर्षाच्या
शुभेच्छा
देत
असल्याचे हे
उपहासात्मक
कार्टून
होते.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा