·
सेन्सॉर
बोर्डाने
अडवलेल्या ‘एमएसजी:
मेसेंजर ऑफ
गॉड’ या
वादग्रस्त
चित्रपटाच्या
प्रदर्शनाला
चित्रपट
लवादानं (फिल्म
सर्टिफिकेशन
अपिलेट
ट्रायब्युनल)
मान्यता
दिल्यानं
संतापलेल्या
सेन्सॉर बोर्डाच्या
अध्यक्षा
लीला सॅमसन
यांनी राजीनामा
दिला.
·
सेन्सॉर
बोर्डाच्या
कामकाजात
माहिती आणि
प्रसारण
मंत्रालयाकडून
हस्तक्षेप
आणि दबाव आणला
जात
असल्याचा
आरोप
सॅमसन यांनी
दिलेल्या
राजीनामा
पत्रात केला
आहे.
·
डेरा
सच्चा सौदा या कथित
अध्यात्मिक
संस्थानाचे
प्रमुख व स्वयंघोषित
संत गुरमीत
रामरहीम
सिंग इन्सान यांनी ‘एमएसजी’
हा चित्रपट
बनवला आहे.
स्वत:
राम-रहीम
यांची यात
प्रमुख
भूमिका आहे.
रामरहीम देव
असल्याचा प्रचार
तसेच अनेक
चमत्काराची
पेरणी
चित्रपटात
असल्यानं
सेन्सॉर
बोर्डानं
त्यास आक्षेप
घेतला होता.
·
हा
चित्रपट
अंधश्रद्धा
पसरवतो तसंच
त्यामुळं
धार्मिक
भावना भडकू
शकतात, असं मत
नोंदवत
बोर्डानं हा
चित्रपट
लवादाकडं
पाठवला होता.
·
चित्रपट
लवादानं
एमएसजीला
हिरवा कंदील
दिल्याचे
वृत्त असले
तरी पंजाबमध्ये
या
चित्रपटाच्या
प्रदर्शनावर
अघोषित बंदी घालण्यात
आली आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा