चालू घडामोडी - २७ मे २०१५


काळा पैसा धारक पाच भारतीयांची नावे उघड
    Black Money
  • स्वित्झर्लंडमधील बॅंक खात्यांत पैसा जमा करणाऱ्यांची नावे उघड होण्यास सुरवात झाली असून, स्वित्झर्लंडने त्यांच्या अधिकृत राजपत्राद्वारे काळा पैसा जमा करणाऱ्या परदेशी व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत.
  • भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेल्या माहितीच्या आधारावर स्वित्झर्लंडने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उद्योगपती यश बिर्ला यांच्यासह स्नेहलता सोहनी, संगीता सोहनी, गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा या पाच भारतीयांची नावे जाहीर झाली आहेत. 
  • ही यादी संबंधित व्यक्तींच्या देशांना अधिक तपासासाठी पुरविली जाणार आहे. या पाच जणांपैकी बिर्ला आणि शर्मा यांच्याबाबत काही माहिती याआधीच स्वित्झर्लंडच्या कर प्रशासन विभागाने भारताला पुरविली आहे.
  • गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा हे दोघेही सिटी लिमोझीन गैरव्यवहाराशी संबंधित आहेत.
  • आयकरासंबंधीच्या परस्पर सहकार्यांतर्गत भारतीय प्रशासनाला सविस्तर माहिती देण्यासंदर्भात आक्षेप असल्यास फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टासमोर ३० दिवसांत अपील करावे, असे स्विस फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनने या भारतीयांना सांगितले आहे. 
  • काळा पैसाधारकांची नावे उघड करताना या सर्वांची नावे आणि जन्म तारखांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

फोर्ब्सच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत ४ भारतीय
  • ‘फोर्ब्स‘ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील १०० सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत.
  • फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (३०व्या स्थानी), आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (३५व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (८५व्या स्थानी) आणि हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (९३व्या स्थानी) यांचा समावेश आहे. 
  • फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत.
  • फोर्ब्सच्या हि १२वी वार्षिक यादी आहे. अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.

चंडीगड शहरात निकोटीनवर बंदी
  • चंडीगडमध्ये निकोटीनवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 
  • अलीकडेच निकोटीनवर बंदी असलेले पंजाब हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने याबाबत काल निर्देश दिल्यानंतर चंडीगड प्रशासनाने ही बंदी घातली आहे. 
  • ‘बर्निंग ब्रेन’ या सोसायटीने दाखल केलेली जनहित याचिका निकालात काढताना न्यायालयाने बंदीचे निर्देश दिले आहेत. 
  • हुक्का पार्लरमध्ये निकोटीनचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी चंडीगड प्रशासनाला आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. 
  • विषाचा कायदा १९१९ आणि विष (ताबा आणि विक्री) नियम २०१५ अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे. 
  • द्रवरूपातील निकोटीनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने चंडीगड प्रशासनाला कृती समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

ब्लॉगरवर हल्ला करणाऱ्या संघटनेला बांगलादेशात बंदी
  • बांगलादेशमधील तीन ब्लॉगर्सवर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या अन्सरूल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेवर बांगलादेशात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी सरकारकडे या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. 
  • गेल्या काही महिन्यांतच तीन धर्मनिरपेक्ष ब्लागर्सची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्यांनंतर नागरिकांनी आणि विविध संघटनांनी मोठी निदर्शने केली होती. 
  • पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्यांमागे ‘एबीटी’ असल्याचे निदर्शनास आले होते.

भारत-व्हिएतनाम सामंजस्य करार
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि व्हिएतनामचे संरक्षणमंत्री फुंग क्वांग थान्ह यांच्यातील बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांदरम्यान पुढील पाच वर्षांसाठीच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 
  • दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी संरक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर या वेळी चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांमध्ये सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारासही या वेळी मान्यता देण्यात आली. व्हिएतनामचे संरक्षणमंत्री सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

तीन राज्यांमध्ये ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग
  • देशातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढल्याने याचा जबरदस्त फटका दक्षिण भारताला बसला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये उष्माघातामुळे साडेसातशेपेक्षाही अधिक लोक मरण पावले आहेत. 
  • पुढील आठवडाभर ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हवामान खात्याने ओडिशा, झारखंड, किनारी आंध्रसाठी ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी केली आहे. 
  • सर्वसाधारणपणे वातावरणातील उष्णता वाढल्याने जेव्हा उष्माघाताचा धोका बळावतो तेव्हा ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात येते. आंध्र प्रदेशातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडल्याने ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात आल्याचे समजते. 
  • आतापर्यंत उष्माघातामुळे आंध्र प्रदेशात ५५१ आणि तेलंगणमध्ये २१३ मृत्यू झाले आहेत. रामागुंडम शहरामध्ये ४४.८ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
  • ओडिशामध्येही उष्णतेची लाट आली असून भुवनेश्वरमध्ये ४५.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगूल शहरामध्ये ४७ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले.

राजधानीत सार्वजनिक वाहनात जीपीएस अनिवार्य
  • दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य करण्याची घोषणा केली.
  • याअंतर्गत सर्व वाहनांना योग्यतेचे प्रमाणपत्र मिळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीपीएस नसलेल्या वाहनांना हे प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
  • विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत १ जूननंतर ऑटो रिक्षा, टॅक्सीसहित कोणत्याही सार्वजनिक वाहनास जीपीएस डिव्हाइसशिवाय योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
  • जीपीएस-संबंधित माहिती :
    • जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) उपग्रह आधारित दिशादर्शक प्रणाली आहे. या माध्यमातून रिअल टाइम माहिती साध्य करता येते. ज्या वाहनात जीपीएस डिव्हाइस बसवलेले असेल त्या वाहनावर नियान्त्राल खोलीत बसून नजर ठेवणे शक्य होणार आहे.

२-जी प्रकरणी ‘पुस्तक बॉम्ब’
    2G Spectrum Scam
  • “२-जी दूरसंचार परवाने देताना सहकार्य न केल्यास तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याला दिली होती,” असा गंभीर आरोप ‘ट्राय’ चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 
  • २-जी प्रकरणात मी अरुण शौरी व रतन टाटांना अडकवावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असा दावाही त्यांनी केला.
  • २-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात बैजल हेही एक आरोपी आहेत. त्यांनी या घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे एक पुस्तक स्वत:च प्रकाशित केले आहे. ‘द कम्प्लिट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स : २-जी, पॉवर अँड प्रायव्हेट एंटरप्राइझ - ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
  • बैजल म्हणतात, “संपुआचे दूरसंचारमंत्री राहिलेले दयानिधी मारन यांच्या कार्यकाळापासूनच २ जी घोटाळ्याची सुरुवात झाली होती. जर मी सहकार्य केले नाही तर माझे नुकसान होईल, अशी सीबीआयने मला प्रत्येक बाबतीत धमकी दिली.”
  • माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील कथित २-जी गैरव्यवहारावर प्रकाश टाकणारे गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले हे तिसरे पुस्तक आहे. याआधी मनमोहनसिंग यांचे सहकारी व मीडिया सल्लागार राहिलेले संजय बारू आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख या दोघांनीही आपल्या पुस्तकात मनमोहनसिंग यांच्यावर आरोप केले होते.

पाक क्रिकेट मंडळाकडून रझावर दोन वर्षांची बंदी
  • उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. स्थानिक स्पर्धेदरम्यान जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला. 
  • रझा पाकिस्तानकडून एकमेव एकदिवसीय, तर १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 
  • या निर्णयामुळे रझा पाक मंडळाच्या वतीने आयोजित कुठल्याच क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

चालू घडामोडी - २६ मे २०१५


‘डी. डी. किसान’ या कृषिविषयक वाहिनीचे उद्घाटन
    DD Kisaan
  • भाजप सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘डी. डी. किसान’ या २४ तास चालणाऱ्या कृषिविषयक वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. 
  • सरकारी दूरचित्रवाहिनी दूरदर्शनच्या वतीने ‘डी डी किसान’ हि वाहिनी सुरु करण्यात आली आहे. शेतीवर आधरित २४ तास प्रसारण करणारी हि देशातील  पहिलीच वाहिनी आहे.
  • ‘डी. डी. किसान’ या वाहिनीला केंद्र सरकारने ‘मस्ट कॅरी’ वाहिनीच्या श्रेणीमध्ये टाकले आहे. त्यामुळे केबल ऑपरेटर्संना ही वाहिनी ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य असेल. सध्या २५ विविध वाहिन्यांचा ‘मस्ट कॅरी’ श्रेणीमध्ये समावेश असल्याचे दूरदर्शनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
  • या वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक योजना, पीक व्यवस्थापन, शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतीची बाजारपेठ, आयातनिर्यात, बीबियाणे, खते, खतांचा पुरवठा व त्यांची मात्रा, कीटनाशके, नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती, पीकांना पाणीपुरवठा, पाण्याची बचत, कमी पाण्यातील शेती अशा अनेक मुद्यांवर व्यवहारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
  • कृषी व्यवसाय फायद्यात करणे, हे या वाहिनीचे प्रमुख उद्दिष्टय़ असणार आहे.
  • या वाहिनीच्या माध्यमातून बीबियाणे, खते आणि भूमी यांचे तज्ञ एकत्र येतील. तसेच ते संयुक्तरित्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. 
  • भारतातला शेतकरी समाज हा संख्येने प्रचंड आहे. त्याचे जीवनमान सुधारल्याखेरीज भारताच्या प्रगतीचे स्वप्न पाहता येत नाही, असे प्रतिपादन मोदींनी केले.

सीएट क्रिकेट पुरस्कार २०१५
  • १९ व्या सीएट क्रिकेट पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. भारताच्या फलंदाज अजिंक्य रहाणेची सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले, तसेच श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात २६४ धावांची विक्रमी खेळी करणारा भारताचा सलामीवीर रोहित शर्माला या विक्रमाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. भारताचे माजी कसोटीपटू आणि कर्णधार कपिलदेव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
  • सीएट पुरस्कार विजेते :
  • सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू : कुमार संगकारा
    Ajinkya Rahane
  • विशेष पुरस्कार : रोहित शर्मा
  • उत्कृष्ट फलंदाज : हाशीम आमला
  • उत्कृष्ट गोलंदाज : रंगना हेराथ
  • उत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू : ड्वेन ब्राव्हो
  • लोकप्रिय क्रिकेटपटू : किरॉन पोलार्ड
  • सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणे
  • सर्वोत्कृष्ट स्थानिक क्रिकेटपटू : विनय कुमार
  • उत्कृष्ट युवा क्रिकेटपटू : दीपक हुडा

आयसीआयसीआय बँकेची ‘व्हॉइस पासवर्ड‘ सुविधा
  • आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ‘व्हॉइस पासवर्ड‘ सुविधा सादर केली आहे. या माध्यमातून ग्राहकांना केवळ आवाजाचा उपयोग करून बँकेचे सर्व व्यवहार करता येणार आहेत तसेच त्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाही.
  • ‘व्हॉइस रिकग्निशन सर्विस’मार्फत ग्राहकांच्या आवाजाची ओळख पटवून त्यांना फोनवरून बँकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे बँकेने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
  • आतापर्यंत व्यवहारांची गुप्तता राखण्यासाठी ग्राहकांना कार्ड नंबर सांगणे, सिक्युरिटी क्वेशन्सचे उत्तर देणे तसेच पिन नंबर सांगणे यासारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागत असे. आता ग्राहकांचा आवाजच त्यांचा पासवर्ड म्हणून काम करेल असे बँकेने म्हटले आहे.

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा
  • भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पद सोडावे लागलेले इस्राईलचे माजी पंतप्रधान एहुद ओल्मर्ट यांना न्यायालयाने आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर गैरव्यवहार आणि विश्‍वासघाताचा आरोप ठेवण्यात आले होते. 
  • ओल्मर्ट यांना वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांना आधीही लाचप्रकरणी सहा वर्षांची शिक्षा झाली असून, याविरुद्धही त्यांनी अपील केले आहे. ओल्मर्ट यांना २६ हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 
  • ओल्मर्ट यांनी देशासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना आठच महिन्यांची शिक्षा सुनावल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ओल्मर्ट हे २००६ ते २००९ या काळात पंतप्रधान होते.

इराक व सीरिया या दोन देशांच्या फौजांचे इसिसवर हल्ले
  • इराक व सीरियामधील महत्त्वपूर्ण शहरे इसिसच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेविरुद्ध इराक व सीरिया या दोन देशांच्या फौजांनी प्रभावी हल्ले सुरु केले आहेत.
  • पश्चिम इराकमधील रमादी या महत्त्वपूर्ण शहरावर इसिसने सुमारे आठवड्याभरापूर्वी नियंत्रण मिळविले. हे शहर पुन्हा घेण्यासाठी इराकचे सैन्य व काही शिया संघटनांनी एकत्रित प्रयत्न सुरु केले आहेत. या लढाईसाठी इसिसनेही अतिरिक्त कुमक धाडली आहे. मात्र रमादीच्या दक्षिण व पूर्वेकडील थोड्या भागावर नियंत्रण मिळविण्यात इराकचे सैन्य यशस्वी ठरले आहे.
  • सीरियामध्येही इसिसच्या ताब्यामधून पालमिरा हे ऐतिहासिक शहर मुक्त करण्यासाठी सीरियन सैन्याने हवाई हल्ले सुरु केले आहेत. या शहरामधील शेकडो जणांना इसिसने ठार केले आहे.

‘मसान’ चित्रपटास कान महोत्सवात दोन पुरस्कार
  • नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मसान’ या पहिल्याच चित्रपटाला ६८व्या कान चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात 'इंटरनॅशनल ज्युरी ऑफ फिल्म क्रीटिक्स' पुरस्कार व 'प्रॉमिसिंग फ्युचर' पुरस्कार या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. 
  • या चित्रपटात रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सर्वानी पाच मिनिटे उभे राहून दाद दिली.
  • तसेच फ्रेंच चित्रपट ‘धीपन’ला पाल्मे डी' ऑर पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट जॅक्स ऑडीऑर्ड यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्या युद्धग्रस्त देशातून फ्रांसमध्ये पलायन करण्यासाठी निघालेल्या तीन तामिळ निर्वासितांबद्दल हा चित्रपट आहे.

मनोज ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
  • मनोज मिश्रा यांची ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’चे (एनएफएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते माजी अध्यक्ष नीरू अबरोल यांची जागा घेतील.
  • एनएफएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी मनोज मिश्रा राज्य वाणिज्य निगमचे (स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, एसटीसी) वित्त संचालक म्हणून कार्यरत होते.
  • नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) : या मिनिरत्न कंपनीची स्थापना २३ ऑगस्ट १९७४ रोजी झाली. तिचे नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली इथे असून कॉर्पोरेट कार्यालय नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आहे. एनएफएल भारत सरकारच्या केमिकल अँड फर्टिलायझर्स मंत्रालयाच्या अंतर्गत आहे.

बाइकर सी एस संतोष ‘मोटर स्पोर्ट मॅन ऑफ़ द इयर’
  • बाइकर सी एस संतोषला २५ मे २०१५ रोजी फेडरेशन ऑफ़ मोटर स्पोर्ट क्लब ऑफ़ इंडिया (एफएमएससीआई)च्या ‘मोटर स्पोर्ट मॅन ऑफ़ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला चषक आणि २ लाख रुपये रोख बक्षीस प्रदान कण्यात आले.
  • सी एस संतोष डकार रॅलीमध्ये भाग घेणारे आणि यशस्वीरित्या पूर्ण करणारे भारताचे एकमेव बाइकर आहेत.
  • याव्यतिरिक्त डॉ विजय माल्या यांना भारतातील मोटर खेळांतील त्यांच्या योगदानासाठी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

निर्भय शर्मा मिझोरामचे १८वे राज्यपाल
  • सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांनी २६ मे रोजी मिझोरामचे १८वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
  • त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी वाईफेई यांनी संविधानाच्या १५९व्या कलमानुसार पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
  • यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्यावर मिझोरामच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. 
  • निर्भय शर्मा यांनी याआधी अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषविले आहे.

दीपा कुमारी यांना ‘आंतरराष्ट्रीय आउटडोर अंपायर’ हा दर्जा
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या पंचाच्या समितीने भारताच्या दीपा कुमारी यांची पदोन्नती करत त्यांना ‘आंतरराष्ट्रीय आउटडोर अंपायर’ हा दर्जा दिला.
  • गेल्या काही वर्षांत एक पंच म्हणून दीपा कुमारी यांनी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांना हा दर्जा देण्यात आला.
  • दीपा कुमारी यांच्या २०१०मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली आणि भारतामध्ये अनेक स्पर्धा पंच म्हणून काम केले आहे.

चालू घडामोडी - २५ मे २०१५


चेन्नईला नमवून मुंबई अजिंक्य
Mumbai Indians IPL 8 Winner
  • इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या आवृत्तीतील कोलकात्ता येथील इडेन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सचा ४१ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. 
  • मुंबई इंडियन्सच्या २०३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ फक्त १६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकवताना २६ चेंडूत ६ चौकार, २ षटकारांच्या मदतीने ५० धावा फटकावल्या. तो अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.
फक्त चारच शतकांची नोंद
  • यंदाच्या या स्पर्धेत फक्त चारच शतकांची नोंद झाली. त्यात एबी डिव्हिलियर्स (बंगलोर),  ख्रिस गेल (बंगलोर), शेन वॉटसन (राजस्थान) आणि ब्रेंडन मॅकल्लम (चेन्नई) यांचा समावेश आहे. 
  • विशेष म्हणजे यात एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. वास्तविक पाहता यंदा पहिला शतकवीर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ठरला असता. सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रोहित ९८ धावांवर नाबाद राहिला.
विविध पुरस्कार
  • वेगवान अर्धशतक : आंद्रे रसेल (केकेआर)
  • सर्वाधिक षटकार : ख्रिस गेल (आरसीबी)
  • ऑरेंज कॅप : डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद)
  • पर्पल कॅप : ड्वेन ब्रॅव्हो (चेन्नई, दुसऱयांदा)
  • स्पर्धेतील मोल्यवान खेळाडू : आंद्रे रसेल (केकेआर)

तमिळनाडूमध्ये तूर आणि उडीदडाळ स्वस्त दरात
    Jayalalitha
  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच दोन कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून सरकारी दुकानांमधून सवलतीच्या दरामध्ये तूर आणि उडीदडाळीची विक्री केली जाणार आहे. 
  • खुल्या बाजारातील तूर आणि उडदाच्या डाळीची किंमत वाढल्याने सामान्य माणसाला महागाईचे चटके सोसावे लागत आहे. या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने ही उपाययोजना केली आहे. 
  • सवलतीच्या दरामध्ये अर्धा किलोग्रॅम तूरडाळ घेण्यासाठी आता ५३.५० रुपये मोजावे लागणार असून, तर तितक्याच वजनाच्या ‘ए’ ग्रेडच्या उडीददाळीसाठी ५६ रुपये मोजावे लागणार आहेत.

सिम्बेक्स-१५
  • भारत आणि सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव सिम्बेक्स-१५ २३ मे २०१५ रोजी सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आली होता. हा तीन दिवसीय नौदल सराव २६ मे रोजी समाप्त झाला. 
  • नौदल सरावाची ही आवृत्तीमध्ये पाणबुडी विरोधी युद्ध आणि अधिक जटिल समुद्राचा सराव यावर मुख्य भर दिला गेला. याबरोबरच हवाई संरक्षण, सागरी संरक्षण आणि शोध व बचाव कार्यक्षेत्रासाहित विविध क्षेत्रांचा सराव करण्यात येईल.
  • या सरावात सामील झालेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका
    • आयएनएस सातपुडा – ही भारतीय बनावटीची अत्यंत आधुनिक अशा स्टेल्थ प्रकारातील (रडारवर न दिसणारी) हेलिकॉप्टर्स बाळगण्याची क्षमता असलेली युद्धनौका आहे.
    • आयएनएस कौमात्रा - ही एक पाणबुडी विरोधी स्वदेशी युद्धनौका आहे. 
    • पी ८ आय विमाने – हे एक दूरच्या श्रेणीतील पाणबुडीवरील विमान आहे.
  • सिंगापुरतर्फे रिपब्लिक ऑफ़ सिंगापुरच्या नौदलाचे सुप्रीम जहाज तसेच इतर लढाऊ विमानांनी भाग घेतला.
  • सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर यामधील नौदल सराव १९९९ पासुन दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

समलैंगिक विवाहाला आयर्लंडमध्ये मंजुरी
  • समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. 
  • तब्बल साडेतीन लाख नागरिकांनी यासाठी केलेल्या मतदानात तब्बल ६२ टक्के नागरिकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मत नोंदविले. त्यामुळे आयरिश सरकारला समलैंगिक विवाहाला परवानगी द्यावी लागली. आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे. 
  • समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का? या मुद्द्यावर ४३ पैकी ४० क्षेत्रांतून लोकांनी मते मांडली. डबलिन कॅस्टल मैदानात हजारो समलैंगिक विवाह समर्थक एकत्र आले होते आणि निकालानंतर आपला आनंद व्यक्त करत त्यांनी सप्तरंगी झेंडे फडकावले.

नोबेल विजेते जॉन नॅश यांचे निधन
  • निर्णय क्षमतेच्या अभ्यासासाठी (गेम थिअरी) १९९४ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचे अपघाती निधन झाले. 
  • ते आपल्या पत्नीसह एके ठिकाणी टॅक्सीने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला एका इमारतीवर धडकली. यामध्ये नॅश आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. 
  • नॅश यांच्या आयुष्यावर आधारित ‘अ ब्युटिफुल माइंड’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

भारतीय बॉक्सिंगपटूंची सुवर्ण कामगिरी
  • भारतीय बॉक्सिंगपटूंनी चार सुवर्णपदके जिंकून दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. या सुवर्णपदकांखेरीज भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली. 
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो) व मनोजकुमार (६४ किलो) यांनी सोनेरी कामगिरी केली. गौरव बिधुरी याने ५२ किलो गटात रौप्यपदक जिंकले. मनदीप जांगरा (६९ किलो) व विकास कृष्णन (७५ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.
महिलांचा सुवर्ण ठोसा
  • भारतीय महिलांनी तैवानची राजधानी असलेल्या ताइपेइ येथे पार पडलेल्या एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली. सविता (५० किलो), मनदीप संधू (५२ किलो) आणि साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या गटांत जेतेपदांसह सुवर्ण जिंकले, तर सोनिया (४८ किलो) आणि निहारिका गोनेल्ला (७० किलो) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
  • भारतीय बॉक्सिंगपटूंनी शनिवारचा (२३ मे) दिवस गाजवताना दोन विविध स्पर्धामध्ये एकूण सात सुवर्णपदकांची कमाई केली. दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पुरुषांनी चार, तर एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली.

तुर्की येथे चित्रकार सावंत बंधूंनी रचला इतिहास
  • इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, तुर्की या जागतिक मान्यवर संस्थेच्या जगभरातील ५५ विविध देशांत शाखा असून, तुर्की येथील आद्यसंस्था आहे. 
  • तुर्की सरकार व इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, तुर्की यांच्यातर्फे तुर्की देशातील इझमीर राज्यातील बार्नोवा शहरात ‘होमर लव ऍण्ड पिस वॉटर कलर फेस्टिव्हल’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय ऑन दी स्पॉट निसर्गचित्रण स्पर्धा, चित्रप्रदर्शन, वॉटर कलर फेस्टिव्हल व आर्ट टूरचे जागतिक पातळीवर भव्य आयोजन करण्यात आले होते.
  • त्यात नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना जागतिक सर्वोत्कृष्ट चित्रकारांचे ‘बोर्नोव्हा ग्रॅण्ड बझार’ या निसर्गचित्रासाठी जागतिक सर्वप्रथम क्रमांकाचे २ लाख ६० हजार रुपयांचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक तर चित्रकार राजेश सावंत यांना त्यांच्या ‘ग्रीन मेनशन’ या जलरंगातील निसर्गचित्रासाठी जागतिक सहाव्या क्रमांकाचे ६५ हजार रुपयांचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
  • तुर्की येथील सदर जागतिक पारितोषिक घेणारे सावंत बंधू सर्वांत कमी वयाचे चित्रकार आहेत. तसेच भारतीय कलेच्या इतिहासात सदर आंतरराष्ट्रीय पारितोषिकप्राप्त करणारे सावंत बंधू पहिले भारतीय आहेत.
  • या आंतरराष्ट्रीय पारितोषिकामुळे चित्रकार सावंत बंधूंनी ४० विविध देशांतील आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचा मोठा टप्पा केला पार आहे.

ब्रिटिश सरकारमधील मंत्र्यांचे वेतन आणखी पाच वर्षांसाठी गोठविणार
  • ब्रिटिश सरकारमधील मंत्र्यांचे वेतन आणखी पाच वर्षांसाठी गोठविणार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जाहीर केले. अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
  • केंद्रीय मंत्र्यांना वर्षाला सुमारे दोन लाख आठ हजार डॉलर एवढे वेतन दिले जाते. यामध्ये संसदीय वेतनाचाही समावेश असतो; परंतु हे वेतन २०१० पासून गोठविण्यात आले होते. 
  • त्यावेळी असलेल्या श्रीमंतीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरवातीला या वेतनात पाच टक्के कपात करण्यात आली होती, नंतर मात्र वेतन पूर्णपणे गोठविण्यात आले होते. 
  • अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आम्हाला काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. याचाच विचार करता वेतन पुढील पाच वर्षांसाठीही गोठविण्यात येणार आहोत, असे कॅमेरॉन म्हणाले.

ऐतिहासिक पालमिरामध्ये इसिसकडून शेकडो ठार
  • सीरियामधील ऐतिहासिक शहर असलेल्या पालमिरा येथे इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने शेकडो जणांची हत्या केली आहे. 
  • इसिसने ठार केलेल्या नागरिकांच्या ओळखीसंदर्भात मतभेद आहेत. सीरियन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने किमान ४०० नागरिकांना ठार करण्यात आल्याचे म्हटले आहे. 
  • पालमिरा येथे पकडलेल्या २० सीरियन सैनिकांची छायाचित्रे इसिसने त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहेत. 
  • पालमिरामधील नागरिकांच्या शहराबाहेर पडण्यावर वा इतरांना शहरामध्ये येण्यावर इसिसने निर्बंध घातले असून; येथील पाणी, वीजपुरवठा वा दूरध्वनी यांसारख्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 
  • पालमिरा शहर इसिसच्या कचाट्यामधून सोडविण्यासाठी सीरियन सैन्य शहरापासून जवळच काही अंतरावर मोठी तयारी करत असल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

ऍड. एकनाथ आवाड यांचे निधन
  • दलित चळवळ, गायरान हक्‍क चळवळीचे लढवय्ये नेते, मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. एकनाथ दगडू आवाड ऊर्फ जिजा (वय ६४) यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.
  • ऍड. आवाड यांनी पोतराज प्रथा बंद करण्यासाठी कायम पुढाकार घेतला. यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही झाले. 
  • रेशनकार्डसाठी आंदोलनाने त्यांच्या सामाजिक कार्याला सुरवात झाली. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही सक्रिय सहभाग नोंदविला. 
  • स्वत:च्या वकिली पदवीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव यावे म्हणून त्यांनी एक वर्ष उशिराने परीक्षा दिली. 
  • मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ हा लढा उभारला. त्यातून अनेक दलित आणि मातंग समाजातील लोकांना गायरान जमिनी मिळाल्या.

भारतीय वंशाचे परविंदर सिंग बट ब्रिटनमध्ये महापौर
  • भारतीय वंशाचे परविंदर सिंग बट यांनी २२ मे २०१५ रोजी युनायटेड किंग्डममधील वोकिंघम शहराचे महापौर पद ग्रहण केले. या पदावर विराजमान होणारे ते पहिले शीख व्यक्ती आहेत.
  • आधी परविंदर यांनी या शहराचे उपमहापौर म्हणून देखील काम पाहिले आहे. कंझरव्हेटीव पक्षाचे परविंदर मुळचे पंजाबचे आहेत.
  • क्लार्क यांची जागा घेणारे परविंदर २०१७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. आजपर्यंत ब्रिटनमध्ये कोणतीही शीख व्यक्ती महापौर होऊ शकली नव्हती.

चालू घडामोडी - २४ मे २०१५


केद्र सरकारचा पीएसएलव्ही कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पीएसएलवी-सी५० आणि पीएसएलवी-सी३६’च्या १५ उड्डाणांना मंजुरी देऊन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • या कार्यक्रमाअंतर्गत २०१७ ते २०२० या तीन वर्षात सर्व पंधरा उड्डाणे पूर्ण होतील.
  • पीएसएलव्ही कार्यक्रम चालू ठेवल्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) पृथ्वी निरीक्षण आणि दिशादर्शन या व्यतिरिक्त अंतराळ विज्ञानाचा उच्च पातळीवर अभ्यास करण्यास सक्षम बनेल.
  • हा कार्यक्रम सुरु ठेवण्यामुळे सरकारी तिजोरीवर ३०९० कोटी रुपये अतिरिक्त भार येईल.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) कार्यक्रमाविषयी
  • हा कार्यक्रम २००८मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला होते.
  • उद्देश : पृथ्वी निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अंतराळ विज्ञान व दिशादर्शन यासारख्या क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविणे.

जी. मोहनकुमार नवे संरक्षण सचिव
    G Mohan Kumar takes charge as the new Defence Secretary
  • संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव जी. मोहनकुमार यांची पुढील दोन वर्षांसाठी नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहनकुमार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले आर.के. माथुर यांचे स्थान घेतील.
  • ओडिशा १९७९च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले जी. मोहनकुमार हे देखील येत्या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होते; पण निवृत्तीच्या एक महिनाआधीच त्यांना संरक्षण सचिव बनविण्यात आले.

लोकशाही पर्यावरण निर्देशांकात भारताचा २४वा क्रमांक
  • वॉशिंग्टनस्थित ‘वर्ल्ड रिसोर्स इंस्टिट्यूट आणि एक्सेस इनिशिएटिव’ संस्थेने  २१ मे २०१५ रोजी जगातील पहिला लोकशाही पर्यावरण निर्देशांक सादर केला.
  • लोकशाही पर्यावरण निर्देशांकाच्या ७० देशांच्या यादीत भारताचा २४वा क्रमांक आहे. या यादीत लिथुआनिया देशाने पहिले स्थान मिळवले.
  • या यादीतील अनुक्रमे पहिले दहा देश : १) लिथुआनिया २) लाटव्हिया ३) रशिया ४) अमेरिका ५) दक्षिण आफ्रिका ६) ब्रिटन ७) हंगेरी ८) बल्गेरिया ९) पनामा आणि १०) कोलंबिया
लोकशाही पर्यावरण निर्देशांकाबद्दल
  • लोकशाही पर्यावरण निर्देशांक हा पर्यावरणासंबंधी निर्णय घेणे व त्यात लोकांचा सहभाग वाढविणे यासाठी कोणत्याही देशात बनविलेल्या कायद्यांचे आकलन करणारा निर्देशांक आहे. 
  • मुल्यांकन करण्यात आलेल्या देशांपैकी ९३ टक्के देशांमध्ये पर्यावरणासंबंधी माहिती प्राप्त करण्याचा अधिकार दिला गेला आहे.
  • जवळपास ४६ टक्के देशांनी त्यांच्या राजधानीची हवाई गुणवत्ता माहिती अद्याप ऑनलाइन उपलब्ध करून दिलेली नाही.
  • मुल्यांकन करण्यात आलेल्या देशांपैकी ७३ टक्के देशांमध्ये न्यायालयात पर्यावरण प्रकरणांची सुनावणी केली जाते.

आसाममध्ये अमोनिया-यूरिया कॉम्पलेक्सच्या स्थापनेला मंजुरी
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने नामरूप (आसाम) मध्ये अमोनिया-यूरिया कॉम्पलेक्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. हे कॉम्प्लेक्स संयुक्त उपक्रमांतर्गत (joint venture) सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप - पीपीपी) स्थापन करण्यात येईल.
  • प्रस्तावित संयुक्त उपक्रमामध्ये पीएसयू ब्रम्हपुत्रा वॅली फर्टिलाइजर कॉरपोरेशन लिमिटेड ( बीवीएफसीएल), आसाम सरकार आणि ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल) यांची भागीदारी अनुक्रमे ११ टक्के, ११ टक्के व २६ टक्के असेल. तर उर्वरित ५२ टक्के खाजगी/सार्वजनिक क्षेत्राची भागीदारी असेल.
  • या कॉम्प्लेक्सची वार्षिक क्षमता ८.६४ लाख मेट्रिक टन असेल तसेच त्यासाठी ४५०० कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • या कॉम्प्लेक्समुळे बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडसहित ईशान्यकडील राज्यात युरियाची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल तसेच या भागात युरिया वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी होईल.
  • त्याचप्रमाणे रोजगार आणि शेती उत्पादनात वाढ होईल त्यामुळे ईशान्येकडील राज्यांच्या विकासाला चालना मिळेल.
  • भारतात सध्या ३१० लाख मेट्रिक टन युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी ८० लाख टन युरिया दरवर्षी आयात करावा लागत आहे.

जागतिक बँकेचे बिहारला २५ कोटी डॉलरचे कर्ज
    World Bank Logo
  • जागतिक बँकेने बिहारमधील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना अधिक योग्य व जबाबदार करणे तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे यांसाठी सहाय्यक कार्यक्रमांकरीता २५ कोटी डॉलर (सुमारे १५.९ अब्ज रुपये) कर्ज  देण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक बोर्डाद्वारे राबविण्यात येणारा कार्यक्रम बिहार सरकारच्या शालेय शिक्षण सुधारणा कार्यक्रमाचा भाग असेल.
  • या कार्यक्रमांतर्गत विशेषतः प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • जागतिक बँकेच्या मते बिहारमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव शिक्षणाचा दर्जा सुधारणेतील सर्वात मोठा अडथळा आहे. या शिक्षकांची संख्या २०२० पर्यंत ६ लाखपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची बिहारची क्षमता मात्र प्रतिवर्ष ५००० पेक्षा कमी आहे.

अंदमान आणि निकोबारच्या पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण
  • २१ मे २०१५ रोजी अंदमान आणि निकोबारच्या पोलीस विभागाने निरीक्षक आणि उपनिरीक्षक महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयामुळे संवेदशील समस्या जसे महिला, बालके यांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल.
  • अंदमान आणि निकोबार पोलीस विभागात सध्या महिलांची संख्या फक्त १८ टक्के आहे. 
  • यापूर्वी जून २०१४ मध्ये गुजरात सरकारने पोलीस दलात महिलांकरिता ३३ टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिल्लीसह सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस दलात महिलांकरिता  ३३ टक्के आरक्षणाचा स्वीकार केला होता.

राजारहट शहरातील कोल इंडिया लिमिटेडच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील राजारहट शहरातील कोल इंडिया लिमिटेडच्या (CIL) नवीन मुख्यालयाचे उद्घाटन १५ मे रोजी केले.
  • यावेळी केंद्रीय उर्जा, कोळसा आणि अक्षय ऊर्जा मंत्री पियुष गोयल आणि शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबुल सुप्रियो उपस्थित होते.
  • नवीन मुख्यालयाची इमारत २७००० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेली असून आणि याचे बांधकाम शहरी विकास मंत्रालयाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशनने (एनबीसी) केले आहे. 
  • कोल इंडिया लिमिटेड एक महारत्न कंपनी असून ती जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. भारतातील कोळसा उत्पादनामध्ये कोल इंडिया लिमिटेडचे योगदान ८१ टक्के आहे.

चालू घडामोडी - २३ मे २०१५


जयललिता पुन्हा तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री
    Jayalalitha sworn in as Tamilnadu CM
  • ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या प्रमुख नेत्या असलेल्या जयललिता यांनी तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. तमिळनाडुचे राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जयललिता यांच्याबरोबरच यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामधील २८ सहकाऱ्यांनीही शपथ घेतली.
  • याबरोबरच जयललिता या पाचव्यांदा तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. चेन्नई येथील मद्रास विद्यापीठामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यास दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार रजनीकांत हेदेखील उपस्थित होते.
  • जयललितांना पदावरून दूर व्हावे लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा भार सांभाळणारे जयललितांचे एकनिष्ठ मंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी २२ मे रोजी आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला व राज्यपालांनीही तो मंजूर केला होता.
  • बेहिशोबी मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे सप्टेंबर २०१४ मध्ये जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

सरकारी कर्मचाऱ्यांच्याही कामाचे मूल्यमापन
  • लालफितीचा कारभार संपुष्टात आणून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी आता प्रत्येक खात्याने नेमके काय करावे, याचा वार्षिक आराखडा तयार केला जाणार असून, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे ‘केआरए’ (Key Result Area) भरावा लागणार आहे.
  • वर्षभरात कर्मचाऱ्याने काय केले याच्यावरच त्याची वेतनवाढ तसेच पदोन्नतीचे निर्णय घेतले जातील, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
  • कर्मचारी संघटनांशी या संदर्भात चर्चा झाली असून, प्रशासकीय कामाला वेग येण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे संघटनांनीही मान्य केले आहे.
  • कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांतर्गत वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. याच मालिकेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या खात्याने येत्या काळात काय करायचे याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

गुज्जर समुदायाने रेल रोको आंदोलन
  • केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळण्यासाठी गुज्जर समुदायाने सलग तिसऱ्या दिवशी रेल रोको आंदोलन केले. यामुळे दिल्ली-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
  • गुज्जर समुदायाच्या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

माऊंट एव्हरेस्टवर भारताचे ऐतिहासिक गिर्यारोहणाला ५० वर्षे पूर्ण
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २० मे २०१५ रोजी राष्ट्रपती भवनात ‘भारतीय गिर्यारोहण फाउंडेशन’तर्फे आयोजित माऊंट एव्हरेस्टवर भारताचे ऐतिहासिक गिर्यारोहणाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे उद्घाटन केले. २० मे १९६५मध्ये भारताने एव्हरेस्ट शिखर सर केले होते.
  • १९६५ मध्ये लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग कोहली यांच्या नेतृत्वाखाली २१ सदस्यीय भारतीय पथक माउंट एव्हरेस्टवर पोहोचले होते. हि मोहीम भारतीय गिर्यारोहण फाऊंडेशनने प्रायोजित केली होती.
  • अलिकडच्या वर्षांत या फाऊंडेशनने हिमालयात पर्यावरणाच्या संरक्षणाचे कामदेखील स्वीकारले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘ॲमेझॉन’ व ‘पेपाल’बरोबर करार
  • भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) २० मे २०१५ रोजी  ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी ‘ॲमेझॉन’बरोबर सामंजस्य करार केला.
  • या कराराद्वारे स्टेट बँक आपल्या ग्राहकांना विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगाच्या ग्राहकांना ई-कॉमर्स संकेतस्थळावर भरणा (पेमेंट) सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
  • या व्यतिरिक्त या कराराद्वारे स्टेट बँकेला अशा ग्राहकांपर्यंत पोहचणे शक्य होईल जे नियमितपणे ॲमेझॉनचा वापर करतात.

  • तसेच एसबीआयने २० मे रोजी डिजिटल भरणा कंपनी ‘पेपाल’ (Paypal) बरोबर देखील सामंजस्य करार केला.
  • या करारामुळे ९ लाख लहान आणि मध्यम ग्राहकांना सुरक्षित पैसे व्यवहार करण्यास मदत होईल. सुरुवातीला या कराराचा उद्देश परदेशात निधी व्यवहार करणे असून नंतर स्थानिक व्यवहारांचादेखील यात समावेश करण्यात येणार आहे.
  • हि सुविधा एसबीआय डेबिट कार्ड धारकांसाठी देखील उपलब्ध होईल.
  • विक्रम नारायण पेपालचे भारतातील व्यवस्थापक आहेत. पेपाल जगातील २०३ देशांमध्ये उपलब्ध असून हि कंपनी प्रतिदिन १.१५ कोटी रुपयाचे व्यवहार करते.

व्ही. शंगमुखनाथन मेघालयचे १५वे राज्यपाल
    V. Shangmukhnathan
  • कोलकाताचे माजी भाजप नेते व्ही. शंगमुखनाथन यांनी मेघालयचे १५वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमा नाथ सिंग यांनी राज्यघटनेचे कलम १५९ च्या तरतुदी नुसार राज्यपाल पदाची शपथ दिली.
  • जानेवारी २०१५ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्यावर मेघालय राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची जागा आता व्ही. शंगमुखनाथन घेतील.
  • व्ही. शंगमुखनाथन यांच्याबद्दल
    • जन्म : १९ नोव्हेंबर १९४९
    • शिक्षण : राजकीय विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण (पोस्टग्रॅज्युएट) आणि एम. फिल
    • ते १९६२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाले आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य झाले. त्यांनी पक्षाच्या विविध महत्वाच्या पदांवर कार्य केलेले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची ९वी बैठक
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची (जेएमसी) ९वी बैठक दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे १९ मे २०१५ रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री मैती नकोआना मशाब आणि भारताचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्तरीत्या भूषविले.
  • या बैठकीला जेएमसीच्या ७ उपसमित्यांचे अधिकारीदेखील उपस्थित होते.
या बैठकीतील प्रमुख निर्णय
  • संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगला अधिक प्रभावी बनविण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाच वर्षाच्या धोरणात्मक कार्यक्रमाच्या चौकटीत काम करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी सहकार्यासाठी प्राधान्य भागात खालील क्षेत्रांचा समावेश केला. संरक्षण | केंद्रित उत्खनन | विज्ञान आणि तंत्रज्ञान | कृषी आणि अन्न प्रक्रिया | विमा
  • हे सुलभ व्हावे यासाठी व्यापार आणि आर्थिक व्यवहार प्रकरणांवर एका नवीन संयुक्त गटाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान याकरिता एक नवीन उपसमिती स्थापन करण्याचा तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) सहकार्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दोन्ही देशांनी परस्पर सोयीस्कर तारीखेला संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची पुढील (१०वी) बैठक भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने चीनमधील नवीन दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून तिबेटला वेगळे ठेवण्याची घोषणा
  • भारताने चीनमधील नवीन दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून तिबेटला वेगळे ठेवण्याची घोषणा केली. याअंतर्गत चीनच्या चेंगदू शहरात भारताचा नवीन दूतावास सुरु झाल्यावर तिबेट त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर राहणार आहे.
  • भारताचा हा निर्णय चीनबरोबरची मैत्री वाढविण्यासाठी घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
  • याच धर्तीवर चेन्नईमध्ये सुरु होणाऱ्या चीनच्या दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून कर्नाटकला वेगळे ठेवण्यात आले आहे.
  • भारत तिबेटची राजधानी ल्हासामध्ये आपला तिसरा दूतावास सुरु करण्यास इच्छुक होता परंतु चीनने याकरिता असहमती दर्शवली.
  • चेंगदूस्थित भारताचा दूतावास सिजुआन, युन्नान, गुईझाओ राज्य व चूंगचींग नगरपालिका क्षेत्राची देखरेख करेल.
  • भारताचे चीनमध्ये बीजिंग, शांघाय तसेच गुआंगझौ मध्ये दूतावास आहेत. त्त्याच्प्रमाने चीनचे भारतात दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमध्ये दूतावास कार्यरत आहेत.

पाच आंतरराष्ट्रीय बँकांवर ५.७ अब्ज डॉलरचा दंड
  • अमेरिकने पाच आंतरराष्ट्रीय बँकांवर ५.७ अब्ज डॉलरचा दंड लावला. जेपी मॉर्गन, सिटीग्रुप, बार्कलेज, आरबीएस आणि यूबीएस एजी या पाच बँकांवर परकीय चलन किंवा व्याज दरात घोटाळा करण्याचे आरोप आहेत.
  • याअंतर्गत बार्कलेज बँकेवर सर्वाधिक २.४ अब्ज डॉलर दंड लावण्यात आला. कारण या बँकेने ब्रिटन, अमेरिका आणि स्वित्झर्लंडच्या  नियामकांना तपासात सहकार्य केले नाही.
  • जेपी मॉर्गन, सिटीग्रुप, बार्कलेज आणि आरबीएसने अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे.  यूबीएस एजीने व्याजदरमध्ये घोटाळा केल्याचे आरोप मान्य केले आहेत.

सिंद्री प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
  • २१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (FCIL) सिंद्री (झारखंड) प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास मंजुरी दिली आहे. याकरीता सुमारे ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
  • FCILचे सिंद्री युनिट २००२ पासून बंद आहे. बिहार, पश्चिम बंगाल व झारखंडसहित पूर्वेकडील राज्यांची युरियाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे ५०० आणि अप्रत्यक्षपणे ३००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

चालू घडामोडी - २२ मे २०१५


सरकारच्या कामकाजाचा अहवाल संकेतस्थळावर
    NDA Government One year completion
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात केलेल्या कामकाजाचा अहवाल विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • pib.nic.in/nda/ या संकेतस्थळावर सरकारने वर्षभरात केलेल्या कामाची मंत्रालयानुसार माहिती देण्यात आली आहे. तसेच या संकेतस्थळावर विविध छायाचित्रे, व्हिडिओज्‌, यशोगाथांचेही संकलन करण्यात आले आहे. यामाध्यमातून सरकारच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लढाऊ विमान उतरले महामार्गावर
    Miraaj 2000 Lands on Yamuna Expressway
  • भारतीय हवाई दलाचे मिराज २००० हे लढाऊ विमान यमुना मथुरेजवळ एक्सप्रेस-वेवर यशस्वीरित्या उतरले. राष्ट्रीय महामार्गांचा आपत्कालात विमान उतरविण्याकरता उपयोग होण्यासाठी केलेल्या नियमित सरावाचा हा भाग होता.
  • या सरावासाठी हवाई वाहतुकीसह रस्त्यांवरील वाहतूकही वळविण्यात आली होती. तसेच सुरक्षेचे सर्व उपाय केले गेले होते. भविष्यात आणखी अशा महामार्गांचा वापर करण्याचा विचार असल्याचे हवाई दलाने जाहीर केले.

सिध्दीविनायक मंदिराला आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र
  • मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिराला २० मे २०१५  त्याच्या सर्वोत्तम गुणवत्ता परंपरेसाठी आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र देण्यात आले. आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारे सिध्दीविनायक मंदिर हे मुंबईतील पहिलेच असे मंदिर आहे.
  • हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिध्दीविनायक मंदिराचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांना मंदिर परिसरात समारंभात प्रदान केले. हे प्रमाणपत्र मंदिराची दर्शन व्यवस्था, दुष्काळ व्यवस्थापन, राज्यात सार्वत्रिक शिक्षण अशा विविध उपक्रमांकरिता केलेल्या आर्थिक मदतीचे व्यवस्थापन केल्याबद्दल देण्यात आले आहे.
  • श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे स्थित आहे. सिध्दीविनायक मंदिर १८०१ मध्ये विठू आणि देऊबाई पाटील यांनी बांधले होते.
  • आंतरराष्ट्रीय मानक संघटना (आयएसओ)
    • आंतरराष्ट्रीय मानक संघटना (आयएसओ) विविध राष्ट्रांच्या मानक संस्थांच्या प्रतिनिधींची मिळून बनलेली एक आंतरराष्ट्रीय मानक संरचना संस्था आहे. 
    • स्थापना : २३ फेब्रुवारी १९४७
    • मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
    • सदस्य राष्ट्र : १५७

मेघालयने पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत १०० टक्के आर्थिक समावेशकतेचे लक्ष्य गाठले
  • मेघालय राज्य सरकारने  महत्त्वाकांक्षी पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत १०० टक्के आर्थिक समावेशकतेचे लक्ष्य गाठले आहे.
  • मेघालय राज्यातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये किमान एक बँक खाते उघडण्यात आले आहे. आतापर्यंत या राज्यात ५.५३ लाख कुटुंबांकरिता १.५५ लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली आहेत.
  • हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्याच्या ग्रामीण लोकसंख्येचे योगदान नागरी लोकसंख्येपेक्षा जास्त होते. राज्यातील १८ लाख बँक खाती ग्रामीण भागात तर ४७००० खाती राज्यातील शहरी भागात उघडण्यात आली.
  • पंतप्रधान जन धन योजना
    • हि योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली होती.
    • उद्देश : सहा महिन्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी किमान एक बँक खाते उघडून अर्थिक समावेशकतेचे ध्येय साध्य करणे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत औपचारिक बँकिंग प्रणाली पोहचविणे.
    • या योजनेद्वारे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अनुदानाची रक्कम गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहचविणे सहज शक्य होणार आहे व भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
    • या योजनेअंतर्गत २६ जानेवारी २०१५ पर्यंत ७.५ कोटी बँक खाते उघडण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते परंतु ते वेळेपूर्वीच साध्य झाल्यामुळे लक्ष्य वाढवून १० कोटी बँक खाती ठरविण्यात आले.

साईना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर
  • भारताची बॅडमिंटनपटून साईना नेहवाल हिने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे.
  • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्लूएफ) तर्फे २१ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत साईनाला पहिले स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात साईनाने प्रथमच क्रमवारीत पहिले स्थान मिळविण्याची कामगिरी केली होती. पण, पराभवामुळे तिला हे स्थान गमवावे लागले होते.
  • भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची घसरण होऊन ती १२व्या स्थानावर पोहचली आहे. पुरुषांच्या क्रमवारीत के. श्रीकांतने पुन्हा चौथे स्थान मिळविले आहे. तर, पी. कश्यप आणि एच. एस. प्रणॉय १३ आणि १५व्या स्थानावर आहेत.

पालमिरा शहर इसिसच्या ताब्यात
  • प्राचीन सिल्क रोडवरील व्यापारी तांड्यांचा थांबा असलेल्या ऐतिहासिक पालमिरा शहरावर इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यामुळे जागतिक वारसा यादीतील अमूल्य वास्तूंचे भवितव्य संकटात आले आहे.
  • ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी मोठ्या संख्येने पालमिरात प्रवेश केल्यामुळे सरकारी सैन्याने माघार घेतली. पालमिरातील बहुसंख्य नागरिकांचे स्थलांतरही करण्यात आले आहे.
  • इराकमधील निमरुद आणि मोसूल या ऐतिहासिक शहरांची ‘इसिस’ने आधीच नासधूस केली आहे.
  • पालमिराचे ऐतिहासिक महत्व
    • सीरियातील पालमिरा शहराला दोन हजार वर्षांचा वारसा लाभला आहे.
    • ऐतिहासिक आणि पुरातन अवशेष असलेल्या पालमिरा शहराचे वर्णन सीरियात ‘वाळवंटातील मोती’ अशा शब्दांत केले जाते.
    • पूर्वीच्या राजवटींमधील वास्तू, पुरातन कबरी आणि ग्रीक-रोमन काळातील अवशेष या शहरात आहेत. सीरियात २०११ मध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी पालमिराला दरवर्षी दीड लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत होते.

'स्टार्ट-अप'साठी मूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती
  • स्टार्ट-अप कंपन्यांना शेअर बाजारांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक नियम आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अठरा सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.
  • यासंदर्भात धोरणात्मक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी आयटी उद्योजक एन. नारायण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही १८ सदस्यीय समिती काम करणार आहे.
  • या पर्यायी गुंतवणूक धोरण सल्लागार समितीत सेबीने विविध खाजगी इक्विटी कंपन्या आणि स्टार्टअप संस्थेतील प्रतिनिधी, उद्योगातील प्रतिनिधी, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय आणि सेबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.
  • नवीन समिती स्टार्टअप आणि पर्यायी गुंतवणूक विकासासाठी संबंधित विषयांवर ‘सेबी’ला (इंडिया सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) शिफारशी देऊ शकणार आहे. शिवाय पर्यायी गुंतवणूक आणि उद्योगांच्या विकासासाठी कोणताही अडथळा निर्माण करू शकणाऱ्या बाबतीत सल्ला देऊ सेबीला सल्ला देऊ शकणार आहेत.

मैत्रेयी पुष्पा यांची हिंदी अकादमीच्या उपाध्यक्षपदी
  • दिल्ली राज्य सरकारने हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांची २० मे २०१५ रोजी हिंदी अकादमीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
  • तसेच मैथिली-भोजपुरी अकादमीच्या उपाध्यक्षपदी पत्रकार संजॉय कुमार सिंग आणि संस्कृत अकादमी उपाध्यक्षपदी प्राध्यापक गणेश दत्त शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
  • या तिन्ही अकादमींचे अध्यक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. उपाध्यक्षांचा तसेच सदस्यांचा कार्यकाल १ वर्षाचा असेल.
  • हिंदी अकादमी, दिल्ली :
    • हिंदी अकादमी, दिल्लीची स्थापना १९८१ मध्ये दिल्लीच्या प्रशासनाने एक स्वायत्त संस्था म्हणून केली.
    • या अकादमीचा मुख्य उद्देश दिल्लीमध्ये हिंदी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि विकास करणे हा आहे.

अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • भारताने स्वनिर्मित अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी २० मे २०१५ चंडीपूर, ओडिशा येथून घेतली.
  • हवेतूनवरून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने केली आहे.
  • या क्षेपणास्त्राचा वेग १.२ मॅक ते १.४ मॅक असून हे एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे.
  • या क्षेपणास्त्राची १५ किलोची पारंपारिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • हि चाचणी सुखोई-३० MKI या विमानावरून घेण्यात आली आहे.
  • हे भारताचे पहिले बियॉंड विज्युअल रेंज (दृष्टी पलीकडील) क्षेपणास्त्र असून ते कोणत्याही हवामानात शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेऊ शकते.

तथागत रॉय त्रिपुराचे १६वे राज्यपाल
  • २० मे २०१५ रोजी तथागत रॉय यांनी त्रिपुराचे १६वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे.सी. दिपक गुप्ता यांनी राज्यघटनेचे कलम १५९ नुसार तथागत रॉय यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
  • नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य राज्यपाल यांच्यावर त्रिपुरा राज्याच्या अतिरिक्त राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तथागत रॉय बालकृष्ण आचार्य यांची जागा घेतील.

सुवर्ण मौद्रीकरण योजना

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Gold Monetization Scheme       देशातील नागरिकांकडे आणि विविध संस्थांकडे जमा असलेले सोने उपयोगात आणण्यासाठी केंद्र सरकारने सुवर्ण मौद्रीकरण योजना (गोल्ड मोनिटायझेशन स्कीम) सादर केली असून याअंतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संस्था स्वतःकडे जमा असलेले सोने बॅंकेत जमा करुन त्यावर व्याज मिळवू शकणार आहे.
  • या संदर्भात सादर करण्यात आलेल्या मसुद्यातील मार्गदर्शक तत्वांनुसार, किमान ३० ग्रॅम सोने जमा केले जाऊ शकेल आणि यावर मिळणारे व्याजावर प्राप्तिकर तसेच भांडवली लाभ कर देखील आकारला जाणार नाही.
  • या मसुद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे जर अतिरिक्त सोने आहे तर संबंधित व्यक्ती किंवा संस्था सोन्याचे बीआयएस प्रमाणित हॉलमार्किंग केंद्रांकडून मूल्यमापन करुन कमीत कमी एक वर्षाच्या कालावधीसाठी बॅंकांमध्ये ‘सुवर्ण बचत खाते’ उघडू शकणार आहे आणि व्याजाच्या स्वरुपात रोख रक्कम किंवा सोने प्राप्त करु शकतात.
  • या योजनेची मुदत किमान एक वर्ष असून नंतर ती एक-एक वर्षाच्या पटीत वाढवता येईल. ही योजना म्हणजे मुदत ठेवीसारखीच आहे. मध्येच या योजनेतून सोने काढून घेता येईल.
  • वित्त मंत्रालयाने या सुवर्ण मौद्रीकरण योजनेसंदर्भात संबंधित विभागांना दोन जूनपर्यंत मते कळविण्यास सांगितले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली असून सुरुवातीच्या काळात ठराविक शहरांमध्ये ही योजना सादर करण्याचा प्रस्ताव आहे.
  • जगात भारत हा सोन्याचा सर्वांत मोठा ग्राहक असून दरवर्षी तो ८००-१,००० टन सोन्याची आयात करतो. भारतात व्यापारही होत नसलेला किंवा ज्याचा पैसाही करण्यात आलेला नाही असा सोन्याचा साठा २० हजार टनांवर आहे.
  • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील नागरिकांकडे तसेच संस्थांकडे विनावापर पडून असलेले सोने एकत्र करुन हिरे आणि दागिने क्षेत्राला चालना देणे असणार आहे. तसेच आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सोन्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.
  • प्रस्तावित योजनेतंर्गत बॅंक ग्राहकांना सुवर्ण बचत खाते सुरु करण्यात आल्यानंतर ३० ते ६० दिवसांनंतर व्याज देणार आहे. या दिशादर्शक मसुद्यात सांगण्यात आले आहे की, व्याज दरासंदर्भातील निर्णय बॅंकांतर्फे घेतला जाण्याचा प्रस्ताव आहे.
  • बॅंकांनाही प्रोत्साहन मिळावे असा या योजनेचा उद्देश असून ठेव म्हणून आलेले सोने बँका सीआरआर/ एसएलआरच्या गरजांनुसार रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवू शकतात. तथापि, या मुद्याचा अजून अभ्यास केला जात आहे.
  • तसेच बॅंका सोन्याची विक्री करून त्यातून परकीय चलन मिळवू शकतात व या चलनाद्वारे निर्यातदार किंवा आयातदारांना कर्ज देता येईल हादेखील या योजनेचा फायदा आहे. 
  • या योजनेद्वारे भारतीय सुवर्ण नाणे तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नाण्यावर अशोक चक्र असेल.

चालू घडामोडी - २१ मे २०१५


२१ मे २०१५ : दहशतवाद विरोधी दिन
  • २१ मे २०१५ रोजी भारतात दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
  • याच दिवशी म्हणजे २१ मे १९९१ रोजी श्रीपेरुंबुदूर (तामिळनाडू) येथे भारताचे ७वे पंतप्रधान राजीव गांधी यांची एलटीटीईच्या (लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम) दहशतवाद्याने एका आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या केली होती. 
  • तेव्हापासून राजीव गांधी यांना सन्मान आणि श्रद्धांजली म्हणून हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
  • कारण मिळत आहेत, सामान्य दहशतवाद मुद्दे राष्ट्रीय हितसंबंध दहशतवाद विरोधी दिन परिणाम, उद्देश, दूर दहशतवादी अहिंसा ठेवा.
  • या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २४वी पुण्यतिथी देखील साजरा करण्यात आली. 
  • देशाच्या सर्व वर्गांमधील लोकांमध्ये दहशतवाद आणि हिंसा याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच दहशतवादाचा लोक, समाज आणि देशावर होणाऱ्या परिणामांची  जाणीव करून देण्यासाठी हा दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्र कारखाने अधिनियमात बदल
  • राज्यात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी, तसेच उद्योग सुलभतेसाठी महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९४८ मध्ये बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
  • महत्वाचे बदल : 
  • या अधिनियमाच्या कलम-२ नुसार ज्या ठिकाणी विजेचा वापर करून १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील अथवा विजेच्या वापराविना २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कार्यरत असतील, अशी आस्थापना म्हणजे कारखाना ही व्याख्या निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये बदल करून विजेच्या वापरावर व वापराविना चालणाऱ्या कारखान्याची व्याख्या करताना आवश्‍यक असणाऱ्या कामगारांच्या संख्येत अनुक्रमे १० व २० ऐवजी २० व ४० अशी वाढ करण्यात आली आहे. 
  • या बदलांमुळे सुमारे १४ हजार ३०० कारखाने या इंस्पेक्टरराज मधून व अधिनियमाच्या कक्षेतून मुक्त होऊन त्याचा लाभ लघुउद्योजकांना होणार आहे. तसेच या उद्योगांमधील सध्याच्या १ लाख ९० हजार या रोजगारक्षमतेत भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.
  • अधिनियमाच्या कलम ६५ (२) नुसार  कामगारांना ओवर टाईम करण्यासाठी आधी व्यवस्थापनाची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु आता ही अट रद्द करण्यात आली आहे. तसेच ओवर टाईमची तिमाही वेळ मर्यादा ७५ ऐवजी ११५ तास करण्यात आली आहे.
  • आधीच्या नियमानुसार महिलांना रात्री ७ ते सकाळी ६ पर्यंत कारखान्यात काम करण्यावर बंदी होती परंतु या बदलानंतर आता महिला रात्री ७ ते सकाळी ६ या वेळेत देखील कारखान्यात काम करू शकतील.

ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना
    A. P. Shaha
  • अर्थ मंत्रालयाने २०व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली २० मे २०१५ रोजी उच्चस्तरीय समितीची (HLC) स्थापना केली. हि समिती परकीय संस्थागत गुंतवणूकीवर किमान पर्यायी कराशी (MAT) संबंधित वाद सोडविण्यासाठी उपाय सुचवेल.
  • दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम वाणिज्य कॉलेजचे माजी सहकारी प्रोफेसर व चार्टर्ड अकाउंटंट गिरीश आहुजा आणि डॉ अशोक लाहिरी यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ अशोक लाहिरी आशियाई विकास बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि कार्यकारी संचालक आहेत. 
  • दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजित शहा प्रकाश (ए.पी. शाह) यांची २०१३मध्ये भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती डी.के. जैन यांनी २०व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून ऑक्टोबर २०१३मध्ये राजीनामा दिल्यानंतर न्यायमूर्ती एपी शहा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

आयएनएस कवरत्ती भारतीय नौदलात सामील
  • १९ मे २०१५ रोजी चौथी पाणबुडी नाशक युद्धनौका आयएनएस कवरत्ती भारतीय नौदलात सामील करण्यात आली.
  • कवरत्ती ही गुप्तचर युद्धनौका विशेषतः भारतीय नौदलाकरीता तयार करण्यात आली आहे.
  • आयएनएस कवरत्तीची वैशिष्ट्ये
    • वजन ३,३०० टन वजन आणि लांबी १०९.१ मीटर आहे.
    • ही युद्धनौका चार डिझेल इंजिनाच्या मदतीने २५ नॉट्स गती साध्य करू शकते.
    • ९० टक्के निर्मिती भारतात झाली असून यात लावलेले सेन्सर आणि शस्त्रे स्वदेशी बनावटीची आहेत. 
    • पाण्याखाली अतिशय कमी आवाजात कार्य करू शकते.
    • आण्विक, रासायनिक तसेच जैविक आक्रमणास विरोध करण्यास समर्थ आहे. 
    • निर्मिती गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजीनियर्स कंपनीने केली आहे.

दिल्ली सरकारची ‘पे अँड प्ले’ योजना
  • १९ मे २०१५ दिल्ली राज्य सरकारने देशातील निवडक स्टेडियम आणि क्रीडा संकुलांमध्ये ‘पे अँड प्ले’ योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा उद्देश सर्व वयोगटाच्या लोकांमध्ये खेळाबाबत प्रोत्साहन निर्माण करणे आहे.
  • १ जुलै २०१५ रोजी या योजनेला सुरुवात केली जाईल. याअंतर्गत सर्व सुविधा शाळेतील विद्यार्थ्यांना आणि अपंग व्यक्तींना मोफत असतील.
  • याव्यतिरीक्त लोकांना या योजनेअंतर्गत दरमहा १०० रुपये नाममात्र शुल्क देवून स्टेडियममध्ये उपलब्ध खेळ खेळता येतील.
  • या योजनेसाठी राज्य सरकार नवीन स्टेडियम आणि क्रीडा संकुल सुरु करणार आहे. सध्या ही सुविधा दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम आणि त्यागराज स्टेडियमवर उपलब्ध आहे.

सुरेंद्रजीत सिंग अहलुवालिया ‘भूसंपादन दुरूस्ती विधेयक २०१५’च्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी
  • भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार सुरेंद्रजीत सिंग अहलुवालिया यांची १८ मे २०१५ रोजी ‘भूसंपादन दुरूस्ती विधेयक २०१५’ साठी तयार करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे 
  • या संयुक्त समितीमध्ये ३० सदस्य असून त्यापैकी २० सदस्य लोकसभेचे तर १० सदस्य राज्यसभेचे असतील.
  • पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही समिती संसदेत आपला अहवाल सादर करेल.
  • विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधामुळे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 
  • हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे परंतु राज्यसभेत सत्ताधारी पक्षाला बहुमत नसल्यामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही.
  • डिसेंबर २०१४ पासून, एनडीए सरकारने आतापर्यंत दोनदा या  विधेयकासंबंधित अध्यादेश काढला आहे.

इजिप्तच्या न्यायमंत्रिपदी अहमद-अल-झेंद
  • मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेचे कडवे टीकाकार असलेल्या न्यायाधीश अहमद-अल-झेंद यांची इजिप्तच्या न्याय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इजिप्तच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. झेंद यांच्या निवडीवर इजिप्तमधील विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. 
  • सत्तेतून पदच्युत करण्यात आलेल्या मुस्लिम ब्रदरहूडवर कडवी टीका करणाऱ्या इजिप्तमधील न्यायाधीशांच्या गटाचे झेंद हे प्रमुख आहेत. २०११ मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीचे झेंद हे टीकाकार आहेत. 
  • झेंद यांच्या निवडीवरही अनेकांनी टीका केली आहे. कचरा वेचकाचा मुलगा न्यायाधीश होण्यासाठी लायक नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे माजी न्याय मंत्री महफूझ साबेर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार
  • राज्यातील सुमारे १९ लाख अधिकारी आणि कर्मचारी यांना १ जुलै २०१४ पासून महागाई भत्ता मिळणार आहे. याबाबतचा निर्णय राज्याच्या अर्थ विभागाने घेतला आहे. 
  • महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे. 
  • मात्र, जे शासकीय कर्मचारी व महागाई भत्यासाठी पात्र असणारे इतर सर्व पूर्ण वेळ कर्मचारी यांच्या महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याचा विचार शासनाचा होता. त्यानुसार हा महागाई भत्ता देण्यात आला आहे.

सिंहांच्या शिकारीवरील बंदी झांबियात मागे
  • आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असलेल्या झांबियाने सिंहांसह धोक्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीवर २०१३ पासून बंदी घातली होती. त्यात बिबट्यांचाही समावेश होता.
  • शिकार करण्याएवढी या प्राण्यांची संख्या उरली नसल्यामुळे ही बंदी घालण्यात आली होती. आता त्यांची संख्या पुरेशी वाढल्यामुळे बंदी उठविण्याचा निर्णय करण्यात आला आहे. 
  • मात्र, झांबियाला भेट देणारे अनेक पर्यटक केवळ वन्यजीवन पाहण्यासाठी येत असल्याची जाणीव सरकारला असून, शिकारीवरील बंदी उठविण्याचा निर्णय झाला असला, तरी बेछूट शिकार करता येणार नाही. 
  • बिबट्यांच्या शिकारीवरील बंदी २०१५-१६च्या हंगामापासून उठविण्यात येणार असून, येत्या जुलैपासून हा हंगाम सुरू होईल. सिंहांच्या शिकारीवरील बंदी पुढील वर्षीपासून उठविली जाणार आहे.
  • हा निर्णय करण्यापूर्वी या प्राण्यांच्या संख्येबाबत हवाई पाहणी करण्यात आली आणि त्यानुसार झांबियात चार हजारांपेक्षा जास्त सिंह आणि आठ हजार बिबटे असल्याचे आढळून आले.

विष्णुपूर होणार पहिले वारसा शहर
  • मध्ययुगातील टेराकोट्टा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले आणि देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा लाभलेले पश्चिम बंगालमधील विष्णुपूर या शहराला वारसा शहराचा दर्जा दिला जाणार आहे. 
  • काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच या विष्णुपूरला वारसा शहराचा दर्जा दिला जावा, अशी शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला आता मान्यता देण्यात आली आहे. 
  • राज्याचे पर्यटन आणि नगरविकास मंत्रालयाच्या सहकार्याने या शहराला नवा लुक दिला जाईल. येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच संग्रहालय, पार्क आणि हॉटेल्स यांच्या उभारणीसही महत्त्व देण्यात येईल. या शहरामधील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी चौदाव्या वित्त आयोगाकडून अतिरिक्त निधी मागविण्यात आला आहे. 
  • ऐतिहासिक महत्त्व 
    • बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर हे शहर कोलकत्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून, मल्ल राजवटीमध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकात येथे प्रसिद्ध टेराकोट्टा मंदिराची उभारणी करण्यात आली. 
    • हे शहर बालीचारी साड्या, टेराकोट्टा खेळणी आणि बांकुराकालीन घोड्याच्या मूर्ती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. 
    • येथील मल्ल राज्यकर्ते संगीत कलेचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात. कधीकाळी येथील विष्णुपूर घराण्याचा संगीत क्षेत्रामध्ये मोठा दबदबा होता.

नागपूर, पुणे येथे आयआयआयटी
  • नागपूर आणि पुणे येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थांमध्ये २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणाची सोय राज्यात उपलब्ध होईल. 
  • मुख्य उद्देश : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित संशोधनास वाव देणे, राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे, वाढत्या जागतिकीकरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यासाठी या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. 
  • केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत या संस्था स्थापन करण्याची वित्तीय जबाबदारी केंद्र सरकार, राज्य शासन, तसेच सहभागी खासगी भागीदार यामध्ये विभागली जाणार आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी सुमारे १२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

शेक्सपियरचे एकमेव चित्र सापडले
    Shakespeare portrait
  • सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या वनस्पतिशास्त्राच्या एका पुस्तकात जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियरचे चित्र आढळून आले आहे. हे शेक्सपियरच्या आयुष्यातील एकमेव चित्र असण्याची शक्यता आहे. 
  • हे चित्र सोळाव्या शतकातील आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ आणि इतिहासाचे जाणकार मार्क ग्रिफ्थिस यांनी या चित्राचा शोध लावला आहे. ग्रिफ्थिस हे वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन गेरार्ड यांच्या जीवनाविषयी संशोधन करीत असताना त्यांना या चित्राचा शोध लागला. 
  • गेरार्ड यांनी द हर्बल ऑर जनरल हिस्ट्री ऑफ प्लँट्स या नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक सन १५९८ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यामध्ये १४८४ पाने आहेत.