मोदींचा मध्य आशिया दौरा
- पंतप्रधान मोदी ६ जुलै ते १३ जुलै या काळात उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किरगिजिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांचा प्रत्येकी एक दिवसाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे मुद्दे त्यांच्या अजेंड्यावर असणार आहेत.
- या काळातच ८ जुलै ते १० जुलै या काळात ते रशियामध्ये होणाऱ्या ‘ब्रिक्स’ परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.
- भारताचा ताजिकिस्तानमध्ये हवाई तळ आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान या आयनी हवाई तळावर नियमित कामकाज सुरू करण्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.
- मोदींच्या दौऱ्यातून अपेक्षा
- हायड्रोकार्बन आणि युरेनियम मिळविणे
- औषध कंपन्यांशी करार करणे
- पाचही देशांशी व्यापार वाढविण्याची मोठी संधी
- ताजिकिस्तानमधील हवाई तळ पुन्हा सुरू करणे
- मध्य आशियात दखलपात्र उपस्थिती नोंदविणे
संगीत नाटक अकादमी विद्यावृत्ती
- संगीततज्ज्ञ एस.आर.जानकीरामन, चित्रपटनिर्माते एम.एस.सत्यू, भारतीय शास्त्रीय गायक विजय किचलू व संगीतकार तुळशीदास बोरकर यांना संगीत नाटक अकादमीची २०१४ या वर्षांची विद्यावृत्ती जाहीर झाली आहे. शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, नाट्यकर्मी रामदास कामत यांचाही त्यात समावेश आहे.
- अकादमी रत्न विद्यावृत्ती व पुरस्कार संगीत नाटक अकादमीने जाहीर केले आहेत. अकादमीची विद्यावृत्ती हा दुर्मीळ सन्मान मानला जातो. एकूण ४० जणांना तो मिळाला आहे. संगीत, नृत्य, नाटक यातून ३६ कलाकारांची निवड करण्यात आली.
- संगीत क्षेत्रात अश्विनी भिडे देशपांडे, उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नारळकर (हिंदुस्थानी गायन), पंडित नयन घोष (तबला), रोणू मुजुमदार (बासरी), नेवेली संथानगोपालन (कर्नाटकी गायन), टी.ए.कालियामूर्ती (थविल), सुकन्या रामगोपाल (घटम) व द्वारम दुर्गा प्रसाद राव (व्हायोलिन) यांची २०१४ मधील विद्यावृत्तीसाठी निवड झाली आहे.
- नृत्य क्षेत्रात अदयार जनार्दनन (भरतनाट्यम), उमा डोगरा (कथक), अमुसाना देवी (मणिपुरी) व्यंकटम राधेश्याम (कुचिपुडी) सुधाकर साहू (ओडिशी), अनिता शर्मा (सत्तरिया) जाग्रू महातो (छाऊ) नवतेज सिंग जोहर (समकालीन नृत्य), वाराणसी विष्णू नंबूथिरी (कथकली संगीत) यांचीही निवड झाली आहे.
- नाटक क्षेत्रात असगर वजाहत, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ, चिदंबरम राव जांबे, देबशंकर हलदर, रामदास कामत, आमोद भट, मंजुनाथ भागवत होसटोटा व अमरदास माणिकपुरी यांचा सन्मान केला आहे.
- पारंपरिक कलेत पुरण शाह कोटी, के केशवसामी, कलामंडलम राम मोहन, रेवा कांता मोहंता, अब्दुल रशीद हाफिज, के.शनथोयबा शर्मा, रामदयाल शर्मा, थंगा दरलाँग यांचा सन्मान करण्यात आला आहे.
- दिग्दर्शक, नाटककार व लेखक अक्षरा के.व्ही, संगीतकार इंदुधर निरोडी यांना अकादमीचा पुरस्कार एकूण कामगिरीसाठी जाहीर झाला आहे.
- विद्यावृत्ती तीन लाख रूपये रोख व अकादमी पुरस्कार १ लाख रूपयांचा आहे.
झिम्बाब्वेच्या १०० ट्रिलियन ‘अन्त्य’च्या बदल्यात ४० अमेरिकी सेंट
- झिम्बाब्वेच्या मध्यवर्ती बँकेने त्यांचे जुने चलन खूपच कोसळत गेल्याने काही वर्षांपूर्वी रद्दबातल केले होते, कारण अमेरिकी डॉलरच्या तुलनेत चलन कमालीचे घसरले होते.
- आता या जुन्या नोटांच्या बदल्यात अमेरिकी डॉलर घेता येतील असा निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. असे असले तरी झिम्बाब्वेच्या १०० ट्रिलियन (अन्त्य) डॉलरच्या बदल्यात ४० अमेरिकी सेंट मिळणार आहेत. त्यामुळे चलन किती खाली जाऊ शकते याचा हा विक्रम आहे.
- झिम्बाब्वेने त्यांचे चलन अमेरिकी डॉलर व आफ्रिकी रँडच्या वर्चस्वाने २००९ मध्ये रद्द केले होते, त्या वेळी २३ कोटी टक्के चलनवाढ झाली होती.
- आता जुने चलन व्यवहारात आणल्यावर रस्त्यावरील फेरीवाल्यांनीही झिम्बाब्वेच्या चलनातील १०० ट्रिलियन (अन्त्य) डॉलरची नोट स्वीकारण्यास नकार दिला होता.
तेलंगणचे औद्योगिक प्रकल्प मंजुरी धोरण
- उद्योजकांना तेलंगणकडे आकर्षित करण्यासाठी बहुप्रतीक्षित तेलंगण राज्य औद्योगिक प्रकल्प मंजुरी, स्वमंजुरी आणि पद्धत (टीएसआयपीएएसएस) धोरणाला प्रारंभ झाला. हे धोरण सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी २५०० बड्या उद्योजकांच्या उपस्थितीत केली.
- नव्या धोरणानुसार, उद्योगांना परवानगी देण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, ऑनलाइन भरलेले आणि ‘सेल्फ सर्टिफिकेशन’चे अर्ज लगेच मंजूर केले जातील. परवानगीचा अर्जही सुलभ ठेवण्यात आला आहे.
- नव्या धोरणाची वैशिष्ट्ये :
- शीर्षक : वेलकम टू तेलंगण
- १.६० लाख एकरांची लॅंड बॅंक
- उद्योगांना दोन आठवड्यांत परवानगी
- शून्य भ्रष्टाचार आणि शंभर टक्के पारदर्शकता
- पाणी, २४ तास वीजपुरवठा, रस्ते आणि पायाभूत सुविधा
- २८ विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड)
लैंगिक आरोपातून कान्ह यांची अखेर निर्दोष मुक्तता
- न्यूयॉर्कमधील एका हॉटेलातील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्यामुळे वादात सापडलेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अध्यक्ष डॉमिनिक स्ट्राऊस-कान्ह यांना लिली (फ्रांस) येथील न्यायालयाने दलालीच्या आरोपातून दोषमुक्त केले आहे.
- फ्रान्समधील उच्चभ्रू वर्गात होणाऱ्या समारंभात वेश्या पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्याइतपत पुरेसे पुरावे मिळू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर कान्ह यांना दोषमुक्त करण्यात आले.
- एके काळी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेले स्ट्राऊस-कान्ह २०११ मध्ये न्यूयॉर्कमधील एका महिला कर्मचाऱ्याशी केलेल्या असभ्य वर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागले.
- संबंधित महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप कान्ह यांच्यावर लावण्यात आला होता. मात्र, २०१२ मध्ये हा आरोप काढून टाकण्यात आला.
‘मर्सिडिज’चा पुण्यात चाकणमध्ये प्रकल्प सुरू
- ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत ‘मर्सिडिज’ने आपल्या नवीन असेंब्ली प्रकल्पाचे उद्घाटन पुण्यातील चाकण येथे केले आहे. कंपनीच्या प्रसिद्ध जीएलए-क्लास कॉम्पॅक्ट लक्झरी एसयुव्ही गाड्यांची जुळणी या प्रकल्पात सुरू करण्यात आली.
- भारतातच वाहनांची जुळणी सुरू केल्याने मर्सिडिजच्या जीएलए-क्लास कॉम्पॅक्ट लक्झरी एसयुव्ही वाहनांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
- पुण्यातील असेंब्ली प्रकल्पामुळे कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता २०,००० वाहनांवर पोचणार आहे. सीएलए-क्लास या वाहनाची जुळणी पहिल्यांदा सुरू होणार आहे. या नवीन प्रकल्पाचा उपयोग इतर वाहनांच्या जुळणीसाठी करण्यात येणार आहे.
- चाकण प्रकल्प एकाच वेळी कॉम्पॅक्ट कार्स, सेडान्स आणि एसयुव्ही कार्सची जुळणी करणारा पहिला असेंब्ली प्रकल्प ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा