भारत आणि स्वीडनमध्ये सहा करार
- राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या स्वीडन यात्रेदरम्यान भारत आणि स्वीडनमध्ये सहा करारांवर हस्ताक्षर झाले ज्यामध्ये, अवकाश संशोधन आणि अंतर्गत व्यापार वाढण्याच्या करारांचा समावेश आहे. स्वीडनचा दौरा करणारे मुखर्जी हे पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत.
- राष्ट्रपतींची ही यात्रा ३१ मे रोजी सुरु झाली आणि २ जूनला ते बेलारूस च्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.
- या सहा करारांमध्ये नगर विकासासाठी करण्यात आलेल्या समन्वयावर झालेल्या कराराचा सुध्दा समावेश आहे. ज्यामुळे दोन्ही देश या मुद्यावर बोलणी करणार आहेत. आणि या क्षेत्रात विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत.
- दोन्ही देशांनी अत्यंत छोट्या आणि मध्यम उद्योगात अंतर्गत सहयोगासाठी सुध्दा एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. डिप्लोमॅटीक पासपोर्टवर वीजामध्ये देण्यात येणाऱ्या संबंधित करारावर सुध्दा हस्ताक्षर करण्यात आले.
- भारतीय चिकीत्सा संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि स्विडीश रिसर्च काउंसिल फॉर हेल्थ वर्कींग लाइफ अँड वेलफेयर (एफओआरटीई) यामध्ये सुध्दा एक महत्वपूर्ण करार झाला आहे.
मणिपूरमध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला
- मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर आज (५ जून) सकाळी नऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २० जवान हुतात्मा झाले व अन्य बाराजण जखमी झाले आहेत.
- जखमी जवानांना उपचारासाठी नागालॅंडमध्ये हलविण्यात आले. इंफाळयेथील मोल्तूक खोऱ्यामध्ये ‘सहा-डोग्रा रेजिमेंट’चे जवान नेहमीप्रमाणे तेंगनौपाल-न्यू समताल रस्त्यावर गस्त घालत होते.
- यावेळी दहशतवाद्यांनी ‘आयईडी’चा स्फोट घडवून आणला, त्यानंतर स्वयंचलित शस्त्रे आणि ग्रेनेडच्या माध्यमातून हल्ला चढविण्यात आला.
मलेशियात भूकंप
- मलेशियातील साबाह राज्यात ५ जून रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केलवर नोंदली गेली. भूकंपाचे केंद्र कोटा किनाबालूपासून ५४ किलोमीटर अंतरावर होते.
- या भूकंपामुळे आग्नेय आशियातील सर्वाधिक उंच असलेल्यांपैकी किनाबालू पर्वतावर सुमारे १३० गिर्यारोहक अडकले आहेत.
- भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत.
बिनॉय जॉब जागतिक शिक्षक पुरस्कार अकादमीचे सदस्य
- पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्य केलेले बिनॉय जॉब यांची १ जून २०१५ रोजी जागतिक शिक्षक पुरस्कार अकादमीचे (ग्लोबल टीचर प्राइज अॅकॅडेमी) सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
- या अकादमीवर निवड झालेले बिनॉय हे एकमेव भारतीय आहेत. सध्या ते इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्री असोसिएशन मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आहेत.
- हि अकादमी जगाभरातून एका शिक्षकाची निवड करते दिले आहे ज्यांना दहा लक्ष डॉलर्सचा (सुमारे ६.३८ कोटी रुपये) हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- वार्के फाउंडेशनद्वारे २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या अकादमीचे अध्यक्ष बिल क्लिंटन (अमेरिकेचे माजी अध्यक्ष) आहेत.
- यापूर्वी बिनॉय जॉब हे ‘डेव्हलपमेंट चॅनेल’ या वाहिनीचे प्रमुख संपादक होते.
के. सिवान विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (व्हीएसएससी) संचालकपदी
- १ जून २०१५ रोजी अंतराळ शास्त्रज्ञ के. सिवान यांची विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (व्हीएसएससी) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मे २०१५ मध्ये निवृत्त होत असलेल्या एम चंद्रदाथान यांची ते जागा घेतील.
- यापूर्वी के. सिवान लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्राचे (तिरुअनंतपुरम) संचालक होते.
- सिवान १९८२मध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) प्रकल्पासाठी इस्त्रोमध्ये कार्यरत झाले.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर
- विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)चे सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे केंद्र आहे. हे तिरुअनंतपुरम (केरळ)मध्ये स्थित आहे.
- येथे रॉकेट, कृत्रिम उपग्रह आणि त्यासंबंधित तंत्रज्ञान निर्माण तसेच विकसित करण्यात येते.
- या केंद्राची स्थापना १९६२मध्ये थुंबा विषुववृत्तीय रॉकेट प्रक्षेपण केंद्र (Thumba Equatorial Rocket Launching Station, TERLS) या नावाने करण्यात आली. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ नंतर त्याचे नामकरण विक्रम साराभाई स्पेस सेंटर करण्यात आले.
माहिती चोरीवर बंधने आणणारा कायदा अमेरिकेत मंजूर
- अमेरिका स्वातंत्र्य कायद्यावर (अमेरिका फ्रीडम लॉ) अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली हा अतिशय महत्त्वाचा कायदा असून त्यात लोकांच्या फोनची माहिती चोरणे बंद केले जाणार आहे.
- यात लोकांच्या फोनबाबत गोळा केलेला मेटाडाटा दूरसंचार कंपन्यांना परत दिला जाणार आहे. तो सरकारकडे ठेवला जाणार नाही. माहिती चोरीच्या प्रकरणात अमेरिकी प्रशासनावर बरीच टीका झाली होती.
- ओबामा यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली त्या आधी सिनेटमध्ये त्यावर ६७-३२ असे मतदान झाले होते. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने टेहळणी कार्यक्रम राबवला होता त्यात दहशतवाद्यांना शोधण्याच्या नावाखाली सामान्य लोकांच्या फोन कॉल्सची माहिती चोरण्यात आली होती.
भारतीय पंच एस. रवी आयसीसी एलिट पॅनेलमध्ये
- भारतीय पंच सुंदरम रवी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे. पंचांच्या वर्षभराच्या कामगिरीचे पुनरावलोकन केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
- रवी यांच्यासह न्यूझीलंडचे ख्रिस गॉफनी यांनाही एलिट पॅनेलमध्ये बढती मिळाली आहे.
- रवी यांनी सहा कसोटी, २४ एकदिवसीय आणि १२ ट्वेन्टी-२० सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. २०११ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात रवी यांनी पंच म्हणून पदार्पण केले होते.
- २०१०-११ आणि २०११-१२ मध्ये बीसीसीआयतर्फे देण्यात येणाऱ्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पंच पुरस्काराने रवी यांना गौरवण्यात आले होते.
सर्च इंजिनमध्ये मोदींना गुन्हेगार दाखविल्यानंतर 'गुगल'कडून माफी
- जगभरातील लोकांसाठी विश्वासाचे सर्च इंजिन असलेल्या गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा गुन्हेगारांच्या पंक्तीत नेऊन बसविल्याने वाद निर्माण झाला होता. गुगलवर 'टॉप १० क्रिमिनल्स' म्हणून शोध घेतला असता कुख्यात दहशतवादी लादेन, दाउद सोबत मोदींचे छायाचित्र झळकत होते.
- या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुगलने तातडीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर व्यक्त करीत असल्याचे गुगलने म्हटले आहे.
- सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांचे गुगल समर्थन करीत नसून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले.
दिल्लीपाठोपाठ उत्तराखंड, गुजरात, काश्मीर व तामिळनाडूमध्ये मॅगीवर बंदी
- दिल्लीपाठोपाठ उत्तराखंड, गुजरात, काश्मीर व तामिळनाडूमध्ये मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, तर नेपाळने भारतातून आयात केलेल्या मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- याचबरोबर बिग बाजारपाठोपाठ वॉलमार्ट व मेट्रो यांनीही मॅगीची विक्री बंद केली आहे. यामुळे नेस्ले भारतामध्ये कमालीची अडचणीत आली असून, उर्वरित राज्येही बंदी घालण्याचा विचार करत आहेत.
- मॅगीच्या मसाल्यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने उत्तराखंडमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ४ जूनला गुजरातमध्येही मॅगीवर एक महिन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच गुजरात सरकारने सनफीस्ट व एस.के.फूडसच्या इन्स्टंट नूडल्सचे नमुने तपासले असून त्यातील एस.के. फूडसच्या नमुन्यात शिसे जास्त असल्याने त्यावरही महिनाभर बंदी घातली आहे.
- दिल्ली सरकारनेही ३ जूनला मॅगीच्या विक्रीवर १५ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तेथे घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
- नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये शिसे व एमएसजी दोन्हीही घटक प्रमाणाबाहेर असल्याने त्यावर भारतातील राज्यामागून राज्ये बंदी घालत असतानाच मॅगी खाण्यास सुरक्षित असल्याचा दावा नेस्लेचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क यांनी केला आहे.
गुजरातमध्ये लघुशंका करण्यासाठी मिळणार एक रूपया!
- लोकांना स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करण्याची सवय लागावी यासाठी गुजरातमध्ये प्रशासनातर्फे एक अनोखा उपाय अमलात आणला जाणार आहे.
- एरवी अनेक लोक रस्त्याच्या कडेला अथवा आडोशाला लघुशंका करताना दिसतात. यावर उपाय म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेने जवळच्या स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करणाऱ्याला एक रूपयाचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे. तसेच उघड्यावर मलमूत्र विसर्जित केल्याने सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छता पसरत होती. अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.
- यापूर्वी नेपाळमधील काठमांडू येथे अशाप्रकारची प्रयोग करण्यात आला होता आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला होता. त्यामुळेच अहमदाबाद महानगरपालिकेने शहराच्या काही भागांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- या मोहीमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असेल. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण अहमदाबाद शहरात ती राबविण्याचा पालिकेचा मानस आहे.
जागतिक योग दिनाला जागतिक विक्रमाचा दावा
- जागतिक योग दिनाला नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात जगातील १०० देशांच्या प्रतिनिधींना एकाच छताखाली आणून योग साधना करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. उद्दीष्ट साध्य झाल्यास यातून जागतिक विक्रमाचा दावा देखील करण्यात येणार आहे.
- २१ जून रोजी राजपथावर सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणाऱ्या अर्ध्यातासाच्या योग शिबिरात ४० हजार जण एकाच वेळी योगासने करणार आहेत. यासोबतच जगातून जवळपास १०० देशांचे प्रतिनिधी देखील या योग शिबीराला उपस्थित राहतील असे लक्ष्य कार्यक्रमाच्या आयोजकांनी ठेवले आहे.
- जगातील १०० देशांचे राष्ट्रीयत्व असलेले लोक एकाच ठिकाणी जमून योगासने केल्याची नोंद 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये करण्याचा दावा यावेळी केला जाणार आहे.
- आयुष मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून जमणाऱ्या परदेशी प्रतिनिधींसह स्वसंसेवकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेहरु युवा केंद्र संघटनच्या (एनवायकेस) खांद्यावर आहे.
दिल्लीमध्ये धावणार विना चालक मेट्रो
- दिल्लीच्या मेट्रो ट्रॅकवर आता विना चालक मेट्रो धावणार आहे. लवकरच प्रवाशांना या ट्रेनव्दारे प्रवास करता येणार आहे.
- मजलिस पार्क शिव विहार लाइन, जनकपुरी वेस्ट बोटॅनिकल गार्डन लाइन या दोन मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. ट्रेनच्या आत आणि बाहेर असे दोन्ही बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
- दक्षिण कोरिया येथील चांगवान येथे तयार करण्यात आलेली ही अत्याधुनीक ट्रेन समुद्र मार्गे दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. २०१६ पर्यंत ही प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ट्रेनची प्रवाशी क्षमताही पहिल्यापेक्षा जास्त आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा