चालू घडामोडी : १२ डिसेंबर
भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह निधन
- प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे १० डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
- मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कलवरी गावचे असलेले सिंह यांनी बीएचयूमधूनच त्यांनी बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवी घेतली.
- बीएचयूचे २५वे उपकुलगुरू असलेल्या सिंह यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
- सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत पिछाडीवर
- इंटरनेटचा वेग पडताळून त्याबद्दलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या ‘ओक्ला’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटच्या वेगाच्या बाबतीत भारताला जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही स्थान मिळालेले नाही.
- मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे जगात पहिल्या स्थानावर आहे. तर भारत याबाबतीत जगात १०९व्या क्रमांकावर आहे.
- नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक (६२.६६ एमबीपीएस) आहे. यानंतर नेदरलँड्स (५३.०१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि आईसलँड (५२.७८ एमबीपीएस) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- २०१७च्या सुरुवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी वेग ७.६५ एमबीपीएस (मेगा बाईट पर सेकंद) इतका होता. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत इंटरनेटच्या वेगात वाढ झाली.
- नोव्हेंबरमध्ये भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड ८.८० एमबीपीएस इतका होता, अशी ओक्लाची आकडेवारी सांगते.
- ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारत ७६व्या क्रमांकावर आहेत. वर्षभरात भारतातील ब्रॉडबँडचा वेग जवळपास ५० टक्क्यांनी वाढला आहे.
- जानेवारी महिन्यात देशातील ब्रॉडबँडचा वेग १२.१२ एमबीपीएस इतका होता. नोव्हेंबरपर्यंत हा वेग १८.८२ एमबीपीएसवर जाऊन पोहोचला.
- ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगाचा विचार केल्यास सिंगापूर (१५३.८५ एमबीपीएस) पहिल्या क्रमांकावर आहे. तर आईसलँड (१४७.५१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि हाँगकाँग (१३३.९४ एमबीपीएस) तिसऱ्या स्थानी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा