चालू घडामोडी : १३ डिसेंबर
प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ लालजी सिंह यांचे निधन
- भारताचे प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि भारतातील डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे १० डिसेंबर रोजी निधन झाले.
- १९८८मध्ये त्यांनी भारतात सर्वप्रथम डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञान विकसित करून ते न्यायवैद्यक शाखेत वापरण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर प्रियदर्शिनी मट्टू खून प्रकरण, दिल्लीतील नैना साहनी तंदूरकांड, उत्तर प्रदेशातील मधुमिता हत्याकांड यांसह अनेक प्रकरणांत मृतांची व आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यांचे हे तंत्रज्ञान वापरले गेले. या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांच्या तपासाला अतिशय निर्णायक अशी कलाटणी मिळाली.
- याच तंत्रज्ञानातून जनुकीय रोगांचे कोडेही उलगडता येते. डीएनएच्या आधारे रोगनिदानाची पद्धतीही त्यांनी भारतात विकसित केली होती.
- मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कलवरी गावचे असलेले सिंह यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून जैवतंत्रज्ञानात बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवी घेतली.
- पुढचे शिक्षण एडिनबर्ग विद्यापीठातून घेताना त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानातील संशोधन सुरू केले.
- परदेशात संशोधनाची संधी असतानाही १९७७ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशात डीएनए फिंगर पिंट्रिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात घालवला.
- रेशमाच्या किडय़ांचे जनुकीय विश्लेषण, मानवी जिनोम व प्राचीन डीएनएचा अभ्यास, वन्यजीव संरक्षण असे त्यांचे आवडीचे विषय होते.
- त्यांनी तीनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले. हैदराबादची सेंटर फॉर डीएनए फिंगर पिंट्रिंग अॅण्ड डायग्नॉस्टिक्स या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
- सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते बीएचयूचे २५वे उपकुलगुरूही होते.
- त्यांनी त्यांच्या छोटय़ाशा गावात २००१मध्ये राहुल कॉलेज व नंतर अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित जिनोम फाऊंडेशन या संस्था स्थापन केल्या.
- १९७४मध्ये त्यांना युवा संशोधक पुरस्कार मिळाला. त्यानंतर रॅनबक्सी पुरस्कार, भटनागर पुरस्कार व पद्मश्री असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
रोहित शर्माचे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक
- पंजाबमधील मोहाली येथील मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
- विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला कर्णधारही ठरला आहे.
- त्याने १५३ चेंडूंमध्ये केलेल्या २०८ धावांच्या धमाकेदार खेळीत १३ चौकार १२ षटकारांची आतिषबाजी केली.
- रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा ११५ चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या ३६ चेंडूत पूर्ण केल्या. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने या सामन्यात श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव केला.
- २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द रोहितने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावताना २०९ धावांची खेळी साकारली होती.
- २०१४मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. ही खेळी कोणत्याही खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
- यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१०मध्ये वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.
- याशिवाय भारताचा वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलनेही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा