चालू घडामोडी : ११ डिसेंबर

क्रिकेट विश्वचषक २०२३चे यजमानपद भारताला

  • २०२३चा वनडे विश्वचषक आणि २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. तर २०१९चा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. 
  • भारताने याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषविले आहे; पण त्यावेळी भारत आशिया खंडातील देशांसह संयुक्त यजमान होता. २०२३मध्ये मात्र विश्वचषक संपूर्णपणे भारतातच होईल.
  • १९८३ आणि २०११मध्ये भारताने विश्वचषक जेतेपद पटकावले. २०१५साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते.
  • याशिवाय भारत अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. २०१९-२०२०मध्ये हा सामना भारतात होईल.
  • १९८७च्या चौथ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या यजमानपद होते.
  • अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. भारताने या स्पर्धेत उपांत्यफेरीत धडक मारली होती. 
  • सहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९६मध्ये भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडली.
  • श्रीलंकेने लाहोर येथील गडाफी मैदानावर ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषक प्रथमच क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.
  • २०११मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशात पार पडलेल्या दहाव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या विश्वचषकावर नाव कोरले.
  • मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. यामुळे यजमान संघाने विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला.
  • तर दोन आशियायी संघांनी अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलीच घटना होती.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.
  • सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते सर्व राहुल गांधी यांच्या नावाचे होते.
  • राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.
  • यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.
  • ७१ वर्षीय सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे सलग १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे.

द. आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी लालू इसू छिबा यांचे निधन

  • दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठी कामगिरी केलेले लालू इसू छिबा यांचे ८ डिसेंबर रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म १९३०मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला, तेथेच ते लहानाचे मोठे झाले. ते मूळ भारतीय वंशाचे म्हणजे गुजराती होते.
  • १९५६च्या देशद्रोहाच्या खटल्याने त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. नंतर ते ट्रान्सवाल इंडियन काँग्रेसमध्ये दाखल झाले. तेथून त्यांचा प्रवास दक्षिण आफ्रिकन कम्युनिस्ट पक्षाकडे झाला.
  • दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ातील एमके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंडखोर सेनेचे ते प्लॅटून कमांडर होते. १९६३मध्ये ते विल्टन मॅकवायी यांच्यानंतर या सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले.
  • १९५६च्या देशद्रोहाच्या खटल्यातील विल्टन मॅकवायी हे एक आरोपी होते. त्यांच्यापासूनच छिबा यांनी प्रेरणा घेतली.
  • दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात लिटल रिव्होनिया खटला विशेष गाजला होता. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी मिळाली.
  • या खटल्यात त्यांना १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यासाठी त्यांना रॉबेन आयलंड येथील तुरुंगात टाकण्यात आले. त्या वेळी नेल्सन मंडेलाही त्यांच्यासमवेत होते.
  • छिबा व मॅक महाराज यांनी तुरुंगवासात असताना मंडेला यांचे ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र जगासमोर आणण्यात मोठी भूमिका पार पाडली.
  • १९८२मध्ये सुटका झाल्यावर छिबा हे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये कार्यरत राहिले व त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे काम भूमिगत राहून चालू ठेवले. 
  • अहमद कॅथरडा हे त्यांचे मित्र व राजकीय गुरू होते. त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कॅथरडा फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते.
  • १९९४ व १९९९ अशा दोन्ही निवडणुकांत ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकडून संसदेत निवडून आले.
  • वंश, लिंगभेदाविरोधात त्यांनी जो लढा दिला त्यातूनच लोकशाही दक्षिण आफ्रिकेच्या घडणीस मदत झाली.
  • त्यामुळे त्यांना ऑर्डर ऑफ लुथुली हा दक्षिण आफ्रिका सरकारचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा