चालू घडामोडी - २६ व २७ नोव्हेंबर २०१४

·        चीनसमवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी एनडीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.

·        सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने २००३मध्ये विशेष प्रतिनिधी नियुक्त करून एक यंत्रणा उभी केली.

·        आतापर्यंत दोन्ही बाजूंनी या पातळीवर चर्चेच्या १७फेऱ्या झाल्या असून त्यामधून काही प्रमाणात प्रगती झाली आहे.

·        चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झँगबो नदीवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यारलंग झँगबो ही नदी भारतात ब्रम्हपुत्रा नदीच्या नावाने ओळखली जाते.

·        चीनने बांधलेल्या या धरणामुळे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली आहे कारण या धरणामुळे भारत आणि बांगलादेशात पूरस्थिती निर्माण होऊ शकते तसेच भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे.

·        भारताने वेळोवेळी या प्रकल्पाबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केली आहे.

·        कॉंग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

·        हेरगिरीचे प्रगत शस्त्र असलेल्या छुप्या पद्धतीने कारवाया करणाऱ्या रेजिन व्हायरसने सायबर जगताला विळखा घातला आहे.

·        या व्हायरसला "बॅकडोअर ट्रोजनम्हणून ओळखले जाते. विविध यंत्रणांचा वेध घेण्यासाठी या व्हायरसची निर्मिती आणि वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.

·        अरुणाचल प्रदेशमधील नमसाईची १८वा जिल्हा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.

·        अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी  आपल्या पदाचा राजीनामा दिला.

·        तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा आढळलेल्या एका दुर्मिळ पक्ष्याच्या प्रजातीस भारतीय वंशाचे संशोधक आणि पक्षीतज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे.

·        "सुलावेसी फ्लायकॅचरहा आखूड पंख असणारा पक्षी सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये आढळून आला होता. या पक्ष्याचे "मुस्कीकापा सोधीअसे नामकरण करण्यात आले आहे.

·        हिवाळी अधिवेशनात "कामगार कायदेदुरुस्ती विधेयक-२०११राज्यसभेत मंजूर.

·        राज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात आहे ह्या पार्श्वभूमीवर ही बाब महत्त्वाची आहे.

·        या कायद्यानुसार भांडवलदारांना कामगारांच्या संख्येची नोंद ठेवणे सक्तीचे असल्याची संख्या १९ वरून थेट ४०वर नेण्यात आली आहे.

·        त्यामुळे नव्या कायद्याने छोट्या उद्योगांतील, तसेच असंघटित कामगार व महानगरांतील स्थलांतरित मजूर यात प्रचंड भरडले जातील, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यात खालील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या

1.    नेपाळ सरकारबरोबर परिवहनविषयक करार. यानुसार, काही विशिष्ट मार्गांवर दोन्ही देशांतील वाहनांना परवानगी.

2.    भारतातून नेपाळमध्ये पाचशे आणि एक हजाराच्या पंचवीस हजार रुपये किमतीपर्यंतच्या नोटा नेण्यास परवानगी. याआधी फक्त शंभर रुपयांच्या नोटांना परवानगी होती.

3.    नवी दिल्ली- काठमांडू बससेवेला हिरवा झेंडा.

4.    बोधगयेतील बोधीवृक्षाची फांदी लुंबिनी येथे लावण्यासाठी नेपाळ सरकारकडे सुपूर्द.

5.    अत्याधुनिक ध्रुव मार्क-३ हे हेलिकॉप्टर नेपाळ सरकारला भेट.

·        उसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज फिल ह्युजेसला  इस्पितळात दाखल करण्यात आले व तेथे त्याचा मृत्यू झाला.

·        केंद्र सरकारने  "स्वच्छ भारत कोष" स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली.

·        या कोषामध्ये जमा होणारी रक्कम ग्रामीण, शहरी भागांसह शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

·        देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी या कोषाच्या माध्यमातून निधी जमा केला जाणार आहे.

·        अंधासाठीच्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक  क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा