चालू घडामोडी - १२ व १३ डिसेंबर २०१४

·        वर्ष २०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत कोष स्थापन करण्यात आला आहे.

·        कर्नाटक विधानसभेत मोबाईल वापरावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे.

·        कर्नाटकातील एक आमदार स्मार्टफोनवर प्रियांका गांधी-वद्रा यांचे फोटो झूम ईन करून पाहताना आढळून आले होते.

·        कर्नाटक विधानसभेत २०१२ मध्ये भाजपचे दोन मंत्री मोबाईल फोनवर अश्‍लील व्हिडिओ पाहताना सापडले होते.

·        “सोंगाड्या”, “एकटा जीव सदाशिव” यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी(८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

·        या दोन चित्रपटांबरोबरच बन्या बापू, अशी रंगली रात्र, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत अशा चित्रपटांची कुलकर्णी यांनी निर्मिती केली.

·        फिलिपाइन्सच्या पूर्वेला हॅग्यूपीट चक्रीवादळाचा तडाखा बसला.

·        अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) “ओरायन” हे अवकाश यान आकाशात सोडत नवा अध्याय रचला आहे. या यानाच्या साह्याने मानवाला मंगळावर पाठविण्याची तयारी “नासा” ने जवळपास पूर्ण केल्याचे समजते.

·        अंतराळवीर घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या या यानाचा उद्देश "मंगळावर स्वारी” हाच आहे.

·        मात्र, ६ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या चाचणीसाठी अवकाशात सोडलेल्या या यानाचा प्रवास फक्त चारच तासांचा होता.

·        मुलींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत पुरवण्यासाठी सरकारने २०१४-१५ वर्षापासून "प्रगति शिष्यवृत्ती" सुरु केली आहे.

·        "प्रगती शिष्यवृत्तीची" ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे :-

१.    प्रतिवर्ष शिष्यवृत्ती संख्या - ४०००

२.    वार्षिक ६ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील एक मुलगी

३.    पात्रता परिक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड

४.    राज्य/केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून २०१४-१५ या शैक्षणिक  वर्षात   एआयसीटीई मान्यताप्राप्त  कोणत्याही संस्थेत पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला उमेदवाराने प्रवेश घेतलेला असावा.

५.    शिष्यवृत्ती रक्कम : शैक्षणिक शुल्क ३० हजार रुपये किंवा प्रत्यक्ष शुल्क यापैकी जे कमी असेल ते आणि दरवर्षी १० महिन्यांसाठी २ हजार रुपये, प्रति महिना.

·        केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्री - स्मृती इराणी

·        सिक्कींममधील "कांचनजुंगा नॅशनल पार्कचा जगातील शंभर हरित पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. चिरंतन पर्यटनस्थळांचे प्रमोशन करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने ही यादी तयार केली आहे.

·        विविध नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ३० पर्यावरण तज्ज्ञांनी ही यादी तयार केली.

·        सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या मुख्यमंत्रिपदास वीस वर्षे पूर्ण.

·        सिक्कीम डेमॉक्रॅटिक पक्षाने १२ डिसेंबर १९९४ मध्ये प्रथमच विधानसभेची निवडणूक जिंकली. तेव्हापासून झालेल्या सर्व निवडणुकीत या पक्षाने बाजी मारली आहे.

·        २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने पाचव्यांदा विजय मिळविला होता.

·        सलग वीस वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे चामलिंग हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत.

·        राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन: १४ डिसेंबर

·        राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त ऊर्जा बचतनावाचे नवीन पोर्टल सुरु करण्यात  येणार आहे. ऊर्जा वापराबाबतचा ठोस संदेश घरे, कार्यालये आणि उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो.

·        शालेय विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे.

·        ऊर्जा, कोळसा, नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री - पियुष  गोयल

·        सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून मदत उपलब्ध व्हावी यासाठी देशात १४ ठिकाणी केसीसी अर्थात किसान कॉल सेंटर स्थापन केले गेले आहेत.

·        केसीसी अंतर्गत देशभरात १८००-१८०१-५५१ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावरुन शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर दिली जात आहे.

·        दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोबाईल अथवा इतर दूरध्वनीवरून या क्रमांकावर संपर्क साधला जात आहे.

·        केंद्रीय कृषी राज्यमंत्री - मोहनभाई कुंदारिया

·        मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी स्मारक उभारायला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

·        समुद्रात १६ हेक्टरच्या दगडी पृष्ठभागावर न्यूयॉर्क येथील "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" आणि कन्याकुमारी येथील "स्वामी विवेकानंद स्मारक" यांच्या धर्तीवर आधारित हे स्मारक १९० फूट उंच असेल.

·        किनारी नियमन क्षेत्र अधिसूचना २०११ अंतर्गत विशेष योजना म्हणून विचार करण्याची शिफारस महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने जानेवारीमध्ये पर्यावरण मंत्रालयाला केली होती.

·        स्मारकासाठी समुद्रात भराव टाकावा लागणार असल्याने तसेच बांधकाम करावे लागणार असल्यामुळे तो सुरू करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक होती.

·        गेटवे ऑफ इंडिया तसेच नरिमन पॉईंट येथील प्रस्तावित जेटीमधून प्रवाशांना स्मारकाकडे जाता येईल.

·        अंगणवाडी केंद्रांची निर्मिती हा एकात्मिक बालविकास सेवांचा एक भाग आहे. प्रत्येक केंद्रात किमान एक शौचालय बांधण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

·        केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री - मनेका गांधी

·        जगातील सर्वांत धोकादायक देशांमध्ये इराक पहिल्या क्रमांकावर असून, पाकिस्तान आठव्या क्रमांकावर असल्याचे वॉशिंग्टनच्या एका गुप्तचर एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशियायी देशांतील केवळ अफगाणिस्तानचाच या यादीत समावेश आहे.

·        पहिल्या दहांमध्ये अनुक्रमे इराक, नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, येमेन, सीरिया, लीबिया, पाकिस्तान, इजिप्त, केनिया या देशांचा समावेश असल्याचेही म्हटले आहे.

·        बोईंग कंपनीच्या विमानाने  जैवइंधन "ग्रीन डिझेल"चा वापर करत अवकाशात यशस्वी झेप घेतली. जगातील ही पहिलीच चाचणी आहे.

·        विविध प्रकारच्या भाज्या, स्वयंपाकानंतर शिल्लक राहिलेले तेल आणि प्राण्यांची चरबी यापासून हे डिझेल तयार करण्यात आले होते.

·        बोईंगने तिच्या "इकोडेमॉनस्ट्रेटर-७८७” या चाचणीसाठीच्या विमानामध्ये २ डिसेंबर रोजीच ग्रीन डिझेल भरले होते. विमानाच्या इंधन टाकीमध्ये ८५ टक्‍के जेट फ्युलसोबत १५ टक्‍के ग्रीन डिझेल भरण्यात आले होते.

·        ग्रीन डिझेल आणि "हेफा” या दोन्हींमधील रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत. हेफा (हायड्रो प्रोसेस्ड ईस्टर्स अँड फॅटी ऍसिड्‌स) ला २०११ मध्ये हवाई वाहतुकीसाठीचे जैवइंधन म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

·        ग्रीन डिझेल आणि बायोडिझेलमध्ये बराच फरक आहे.

·        हे पारंपरिक इंधनाला सशक्‍त पर्याय ठरू शकते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा