· ३ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय अपंग (लोकांचा) दिवस |
· रणजित सिन्हा यांची वादग्रस्त कारकिर्द संपल्यानंतर आता केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या अर्थात सीबीआयच्या संचालकपदी बिहार कॅडरचे १९७९ बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनिलकुमार सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. · मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणुक केली आहे. |
· गेली ३०-३५ वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले अभिनेते श्याम पोंक्षे (६४) यांचे आजारपणामुळे पुणे येथे निधन झाले. · १९७८ मधील 'पंडित आता तरी पुरे' या नाटकातून त्यांचा व्यावसायिक नाटकात प्रवेश झाला. · 'घरात हसरे तारे' हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. लक्ष्मीकांत बेर्डे याच्या नाटकातून ते पुढे आले. टिळक आणि आगरकर या नाटकामधील आगरकर यांची भूमिका गाजली होती. |
· जवखेडे येथील दलित कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाथर्डीमधील न्यायालयाने संशयित आरोपी प्रशांत जाधव याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत जाधव याला त्याच्या घरातून बुधवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. |
· रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. · रेपो रेट ८ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ७ टक्के आणि कॅश रिझर्व्ह रेशो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. · येत्या वर्षात देशाचा विकास दर ६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी आशा देखील राजन यांनी व्यक्त केली. |
· स्थापनेला वर्ष पूर्ण झालेल्या देशातील पहिल्या महिला बँकेची तिसरी शाखा मुंबईत सुरू झाली असून, बँकेच्या एकूण शाखांचे जाळे आता ३५ पर्यंत गेले आहे. · घाटकोपर (पश्चिम) येथील या शाखेचे उद्घाटन बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका उषा अनंतसुब्रमण्यन यांनी केले. · महाराष्ट्रात पुणे व नागपूर येथे बँकेच्या दोन शाखा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या वेळी अध्यक्षांनी दिली. |
· जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी ७२ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ७१ टक्के मतदान झाले होते. |
· ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट अभिनेत्री नयनतारा (६४) यांचे ३० नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. · 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकासह 'बाळा गाऊ कशी अंगाई', 'अशी ही बनवा बनवी', 'धांगडधिंगा' आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. |
· आशियाई कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावरील बंदीची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवल यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला केली आहे. |
· पंतप्रधान जनधन योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उघडण्यात येणाऱ्या बँक खात्यांची मर्यादा वाढवून साडेसात कोटींवरून दहा कोटींवर नेण्याचे जाहीर केले आहे. · उर्वरित अडीच कोटी खाती उघडण्यासाठी २६ जानेवारी २०१५ पर्यंतची मुदत निर्धारित करण्यात आली आहे. |
· देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ६० दशकांनी मेघालय राज्य देशाशी रेल्वे मार्गाने जोडले गेले. · मेघालयमधील मेंदीपत्थर ते आसाममधील दुधनाई या मार्गावर धावणा-या रेल्वे मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. राज्यातील १९.४७ किलो मीटर लांबीच्या या पहिल्या रेल्वे मार्गाला १९९२-९३ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. · विशेष म्हणजे भारत सरकारच्या आधी ब्रिटिशांनी १८९५-९६ मध्ये मेघालय रेल्वेशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नव्हते.` |
· २६ जानेवारी २०१५ रोजी बॉम्बे हायकोर्टाचे नाव मुंबई उच्च न्यायालय करण्याचा निर्णय घेण्यात आला. |
चालू घडामोडी - ३ डिसेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा