· १९ डिसेंबर : गोवा मुक्ती दिन |
· ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरातले माझे विश्व’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. · तसेच माधवी सरदेसाय यांना कोंकणी भाषेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. मंथन या लेख संग्रहासाठी माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. · नारळीकर यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. · नारळीकरांनी आकाशाशी जडले नाते, विज्ञानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे, वामन परत न आला, अंतराळातील भस्मासुर, प्रेषित, व्हायरस, अभयारण्य, यक्षांची देणगी, टाइम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव आदी विज्ञानावर आधारित पुस्तके लिहली आहेत. |
· “केवायसी” (नो युवर कस्टमर) नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयसीआयसीआय आणि बँक ऑफ बडोदा यांना दंड केला आहे. |
· मिस वर्ल्ड २०१४ स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला “सर्वाधिक यशस्वी विश्वसुंदरी” म्हणून सन्मानित करण्यात आले. |
· नववर्षापासून घरगुती गॅस ग्राहकांना मिळणारे अनुदान थेट बँकेत जमा होणार आहे. यासाठी ग्राहकांना गॅस वितरकाकडून ‘एलपीजी’ बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. |
· शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रकाश नानजप्पाला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब मिळाला. |
· व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमेरिकास्थित विमा समुहाच्या लिबर्टी म्युच्युअलची लिबर्टी सिटीस्टेड होल्डींग्जमधील संयुक्त उद्यम असलेल्या लिबर्टी व्हिडीयोकॉन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारतीय आरोग्य विमा क्षेत्रात शिरकाव केला आहे. |
· टाटा समूहाची गुंतवणूक असलेल्या “विस्तारा” विमानसेवेला हवाई नियामक डीजीसीएने उड्डाण परवाना देण्याची घोषणा केली. · अर्ज केल्यापासून ९ महिन्यांनंतर कंपनीला हा परवाना मिळाला असून सिंगापूर एअर लाईन्सबरोबर संयुक्त उद्यम असलेली ही विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. · जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयापासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. |
· आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक नाकारण्याच्या अखिलाडूवृत्तीबाबत भारताची महिला बॉक्सर सरिता देवी हिच्यावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) घेतला. · इन्चॉन आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर सरिताने निषेध म्हणून ब्रॉंझपदक नाकारले होते. तिच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले होते. त्याचाच एक भाग म्हणून “एआयबीए” ने तिच्यावर ही कारवाई केली. · तिच्यावरील कारवाईचा कालावधी १ ऑक्टोबर २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ असा असेल. बंदीबरोबरच तिला एक हजार स्विस फ्रॅंक्सचा दंडदेखील करण्यात आला आहे. |
· अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बंदुकीतून झाडल्यानंतरही दिशा बदलू शकणाऱ्या गोळीची यशस्वी चाचणी घेतली आहे. “एक्झॅक्टो” असे या गोळीचे नामकरण करण्यात आले आहे. · वाऱ्याचा वेग आणि हालते लक्ष्य यानुसार गोळीला दिशा देणारे तंत्रज्ञान यासाठी विकसित करण्यात आले आहे. · टेलिडाइन टेक्नॉलॉजी या अमेरिकी कंपनीने संरक्षण विभागासाठी या गोळीची निर्मिती केली आहे. |
· यंदाचे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन १७ व १८ जानेवारीला पुण्यात होणार आहे. संमेलनाचे हे २८वे वर्ष आहे. · सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे संमेलनाचे उद्घाटक आहेत. · ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे . |
· कोळसा, नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज “ऊर्जा कायदा सुधारणा विधेयक २०१४” लोकसभेत मांडले. ऊर्जा कायद्यातील या दुरुस्तीमुळे ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करणे शक्य होणार आहे. तसेच ऊर्जा क्षेत्रात स्पर्धेला वाव मिळणार आहे. · ऊर्जा वितरण आणि पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा होऊ शकणार आहे, अर्थात त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. विद्युत कायद्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी २००३ मध्ये विद्युत कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर या कायद्यात २००४ आणि २००७ मध्ये दोनवेळा सुधारणा करण्यात आल्या. · आता विद्युत क्षेत्रात स्पर्धेच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि चांगल्या दर्जाची सेवा ग्राहकांना देण्यासाठी नवीन सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आले. |
· पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या रेडिओवरील मन की बात हा कार्यक्रम खासगी रेडिओ वाहिन्यांवरही प्रसारीत करण्यात यावे यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा