चालू घडामोडी - १६ व १७ डिसेंबर २०१४

·        १६ डिसेंबर : विजय दिन

·        एचडीएफसी सिक्युरिटीजने इच्छापत्र लिहिण्याची इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे.

·        यामुळे सर्वसामान्यांना सुरक्षितरीत्या ऑनलाइन ई-विल अगदी सहज आणि सहज तयार करता येणार आहे.

·        किरकोळ क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने “ई-कॉमर्स पोर्टल” तयार केले आहे.

·        या पोर्टलचे संकेतस्थळ www.msmeshopping.com असे आहे.

·        या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी, बहु उत्पादन खरेदी, ग्राहकांना मदतनीस ठरणारे कॉलसेंटर, आकर्षक उत्पादने तसेच शुल्क भरून सदस्यता घेणे अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

·        आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या जितू राय याने अपेक्षेप्रमाणे ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले.

·        त्याने सांघिक विभागातही सुवर्णपदक जिंकून डबल धमाका केला.

·        आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन "राष्ट्रीय आरोग्य पोर्टल" सुरु केले आहे.

·        www.nhp.gov.in  या संकेतस्थळावरुन  नागरिकांना आरोग्यविषयक अधिकृत माहिती मिळू शकेल.

·        वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय व्यावसायिक संशोधक याविषयी सर्व माहिती  पोर्टलवर उपलब्ध आहे.

·        केंद्रीय  आरोग्यमंत्री : जे.पी. नड्डा

·        मायकल अ‍ॅडम्सला पराभूत करत विश्वनाथ आनंदने लंडन क्लासिक ही बुद्धीबळ स्पर्धा जिंकली आहे.

·        जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांची पंतप्रधानपदी पुन्हा निवड.

·        देशामधल्या आठ रेल्वे स्थानकांवर “आर ओ” पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात  येणार आहे.

·        या प्रकल्पासाठी भोपाळ, द्वारका, गदग, गुवाहाटी, हजरत  निजामुद्दिन, मदुराई, पाटणा आणि तिरुपती या स्थानकांची  निवड करण्यात आली आहे.

·        त्याचबरोबर "आर.ओ" मुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण जास्त असते, या गोष्टींचा विचार करुन प्रारंभी फक्त आठ रेल्वे स्थानकांवर "आर.ओ." बसवण्यात येणार

·        हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जर्मनीने पाकिस्तानवर २-० अशी मात करत विजेतेपदावर नाव कोरले.

·        चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा २-१ असा पराभव.

·        ऑस्ट्रेलियाला कांस्य पदक, भारत चौथ्या स्थानी.

·        सिडनीतील 'लिंट चॉकलेट कॅफे'मध्ये गेल्या १६ तासांहून अधिक वेळ चाललेले ओलीसनाटय़ अखेर संपुष्टात आले.

·        भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ओलीस ठेवणाऱ्या हरून मोनिसला अटक केली आणि १५ ओलिसांची सुटका केली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा