· सन २०३० पर्यंत एड्समुक्त महाराष्ट्र राज्य करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध स्तर आणि घटकांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. · समुपदेशनाबरोबर चाचणी, उपचार, जागृती आणि जीवनशैलीशी निगडित सुविधा देण्यावर भर देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असेल. · राज्यभरात "विहान प्रकल्प" राबवण्यात येणार आहे. देहविक्रय करणाऱ्यांसाठी हा उपक्रम असेल. त्यात एचआयव्हीबाधितांना बीपीएल कार्ड देणे, संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांशी त्यांना जोडणे, तसेच त्यांच्यासाठी समुपदेशन आणि संमेलन घेणे आदी उपक्रम असतील. |
· ४५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लेविएथन या रशियन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्णमयुर पुरस्कार पटकावला तर इस्राइलचे दिग्दर्शक नादव लॅपिड यांना "द किंडरगार्डन टिचर" चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. · याशिवाय श्रीहरी साठये दिग्दर्शित "एक हजाराची नोट" या चित्रपटाला विशेष ज्युरी आणि शताब्दी पुरस्काराने गौरविण्यात आले. · भारतीय अभिनेता दुलाल सरकार यांना चोटोदेर चोबी या चित्रपटासाठी तर लेविएथन चित्रपटासाठी अभिनेते एलेक्सी सेरेब्रिआकोव्ह यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. · तर क्युबाच्या एलिना रोड्रीग्स यांना "बिहेविअर" तर ईस्राईलच्या सरीत लॅरी यांना "द किंडरगार्डन टिचर" चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. · हाँगकाँगचे चित्रपट निर्माते वाँग कार वाय यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
· ईबोलाग्रस्त देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता "नो-इबोला‘ प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असेल. ईबोलाच्या विषाणूंचा देशातील प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ही उपाययोजना आखली आहे; · पण ज्या रुग्णांवर ईबोलाचे उपचार झाले, पण त्यांच्याकडे तसे प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नव्वद दिवस प्रवास करू नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. |
· डिजिटल माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कंपनी केएसएस लिमिटेडने (पूर्वाश्रमीची के सेरा सेरा) भारतात प्रथमच सिनेमा प्रक्षेपणाचे ४के तंत्रज्ञान हे सोनी कॉर्पोरेशनच्या सहयोगाने प्रस्तुत केले आहे. · केएसएस आणि सोनी यांच्या या सामंजस्यातून येत्या काळात देशातील विविध मल्टिप्लेक्स सिनेगृहांमध्ये ४के तंत्रज्ञानावर बेतलेले प्रोजेक्टर्स (प्रक्षेपक) बसविले जाणार आहेत. · सध्या बहुतांश सिनेगृहांतील २के तंत्रज्ञानावरील प्रक्षेपकांच्या तुलनेत चार पटींनी अधिक चित्र सुस्पष्टता ४के प्रक्षेपकांद्वारे सिनेमा प्रेक्षकांना अनुभवता येईल |
· पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरियाच्या किम ह्य़ो मिनचा पराभव करत मकाउ ग्राँपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद पटकावले आहे. · यासोबतच पी.व्ही.सिंधूने सलग दुस-यांदा मकाऊ ग्राँपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. |
· देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ होण्याची क्षमता रेल्वेमध्ये असल्याने रेल्वेसेवेतील अभ्यासक्रमासाठी देशात चार विद्यापीठांची उभारणी करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. |
· बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, कागदी नोटांऐवजी प्लॅस्टिकच्या नोटा प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्यात येणार आहेत. · सुरूवातीला दहा रूपये मुल्याच्या एक अब्ज प्लॅस्टिक नोटा देशातील पाच शहरामध्ये चलनात येणार आहेत. · मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांचा वापरही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. · कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत. जर प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे. |
· कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नामकरण "तमिळ मनिला कॉंग्रेस (मूपनार)" असे करण्यात आले आहे. · कॉंग्रेसमधून नाराज झालेले वासन यांनी नुकतेच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. · जी. के. मूप्पनार यांनी पूर्वी तमिळ मनिला कॉंग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. नंतर तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्यात आला होता. त्यामुळेच नव्याने पुढे येणाऱ्या तमिळ मनिला कॉंग्रेसला मूपनार यांचे नाव देण्यात आले आहे. |
· इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष होस्नी मुबारक यांची ३० वर्षांची राजवट उलथून टाकण्यासाठी २०११मध्ये मोठय़ा प्रमाणावर आंदोलन झाले होते. त्या वेळी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी त्यांच्या हत्येच्या आरोपातून इजिप्तच्या न्यायालयाने मुबारक यांची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे. · जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी सध्या मुबारक तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. दोन वर्षांपूर्वी मुबारक आणि माजी अंतर्गत व्यवहारमंत्री हबीब अल-ऍडली यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना आंदोलकांच्या हत्येचे षड्यंत्र रचल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. पण काही तांत्रिक त्रुटींमुळे पुन्हा त्यांच्यावरील खटला चालविण्याचे आदेश देण्यात आले होते. · ११ फेब्रुवारी २०११ रोजी मुबारक यांनी राजीनामा देण्यापूर्वी पोलिस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आठशे लोक ठार झाल्याचे सांगितले जाते. · मुबारक यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपही न्यायालयाने वगळले आहेत. |
· बाउंसर चेंडू डोक्यावर आदळल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन झाल्याच्या घटनेला काही दिवसही उलटत नाहीत तोच इस्त्रायलच्या अशदोद शहरातील एका सामन्यात पंचाचे काम करणा-या ५५ वर्षीय हिलेल ऑस्कर यांचा चेंडू लागून मृत्यू झाला आहे. |
· महिंद्राच्या टेक महिंद्रा या माहिती तंत्रज्ञान कंपनीने 'सरल रोजगार' हे मोबाईलद्वारे रोजगार उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. · यामुळे मोबाईलद्वारे देशात कुठेही सवलतीच्या दरात रोजगार शोधणे सुलभ होणार आहे. |
चालू घडामोडी - १ डिसेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा