चालू घडामोडी - ३० नोव्हेंबर २०१४

·        ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ व्हावा यासाठी सरकारने वरिष्ठ पेंशन विमा योजना पुन्हा सुरू केली आहे.

·        भारतीय जीवन विमा महामंडळाद्वारे (एलआयसी) या योजनेची अंमलबजावणी होईल आणि १५ ऑगस्ट २०१४ ते १४ ऑगस्ट २०१५ या कालावधीसाठी ही योजना खुली राहील.

·        केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता आठवीसाठी संस्कृत भाषा अतिरिक्‍त विषय म्हणूनच शिकवला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

·        न्यायालयाच्या या आदेशामुळे जर्मन भाषेचे तिसरे स्थान कायम राहणार आहे.

·        न्यायमूर्ती अनिल आर. दवे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले.

·        दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये पहिली महिला गाइड : सुलोचना राय

·        देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये ती पहिली महिला फॉरेस्ट गाइड आहे.

·        १८ वी सार्क शिखर परिषद २०१४ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडली.

·        १९ वी सार्क शिखर परिषद २०१६ मध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे.

·        काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी तामिळ मनिला काँग्रेसची पूर्नस्थापना केली.

·        पंतप्रधानांना संबधित अति महत्त्वाच्या पत्रांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयसीने "व्हीएलएमएस" (व्हीव्हीआयपी लेटर्स मॉनिटरिंग सिस्टम) नावाचे वेब आधारित app विकसित केले आहे.

·        यामुळे मंत्रालये आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यात कागदविरहित संवाद सुरू राहील.

·        प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) कागदपत्रांत लपवाछपवी केल्याचा ठपका ठेवत बाजार नियामक व नियंत्रक सेबीने सहा बँकांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

·        स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, डीएसपी मेरिल लिंच आणि इडलेवाइज समूह या बँकांच्या मर्चंट शाखांचा यात समावेश आहे.

·        रेटिंग एजन्सी केअरच्या आयपीओमध्ये ही गडबड झाल्याचे सेबीने म्हटले आहे.

·        कैलास मानससरोवर यात्रेसाठी सिक्कीममधील नथुला खिंडीतून नवा मार्ग तयार झाला आहे.

·        कैलास मानससरोवर हे चीनच्या अखत्यारितील स्वायत्त प्रदेश असलेल्या तिबेटमध्ये असल्याने या नव्या मार्गाबाबत सप्टेंबरमध्ये भारत आणि चीनदरम्यान द्विपक्षीय करार झाला आहे.

·        करारानुसार कैलास मानससरोवर यात्रा करणाऱ्या भारतातील भक्तांसाठी उत्तराखंडमधील लिपूलेखमार्गासह सिक्कीममधील नथुला खिंडीचा मार्गही भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे.

·        जिंदल स्टील अँड पॉवर (जेएसपीएल) ने १० अब्ज डॉलरचा (सुमारे ६१ हजार कोटी रुपये) कोल टू लिक्विड (सीटीएल) प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

·        रामचंडी कोळसा खाणीचा परवाना रद्द झाल्यामुळे कंपनीने ओडिशामधील आंगुलमध्ये होऊ घातलेला हा प्रकल्प रद्द केला आहे.

·        रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात मदत मिळावी यासाठी १८००-१११-३२२ ही अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाईन कार्यान्वित झाली आहे.

·        गुजरात कॅडरचे विवेक श्रीवास्तव यांची पंतप्रधान, राष्ट्रपती अशा व्हीव्हीआयपींना संरक्षण देणा-या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या (एसपीजी) प्रमुखपदी नियुक्ती निश्चित झाली आहे.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून चार दिवसांच्या पूर्वोत्तर राज्यांच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

·        १७ वर्षांनंतर पूर्वोत्तर भागात जाणारे ते पहिले पंतप्रधान आहेत

·        पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा पूर्वोत्तर भागाचा हा पहिला दौरा आहे.

·        याआधी एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना चार दिवस पुर्वोत्तर राज्यांच्या दौर्‍यावर गेले होते.

·        त्यांचा कार्यक्रम

·        २९ नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये राज्यातील पोलिस प्रमुखांच्या संमेलनाचे उदघाटन करणार. हे संमेलन मोदींच्या सांगण्यावरच प्रथमच दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्यात आले आहे.

·        गुवाहाटीमधूनच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून मेघालयमधील मेंदीपथर ते आसामच्या गोलपाडा जिल्ह्यातील दुधनोई रेल्वे लाइनचे उदघाट.

·        नागालँडचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव हॉर्नबिल फेस्टिव्हलचे उदघाटन.

·        मणिपूरच्या संगोई उत्सवाचे उदघाटन.

·        दक्षिण त्रिपूराच्या पलटनामधील ७२६ मेगावॅट पॉवर प्रोजेक्टच्या दुसर्‍या युनिटचा लोकार्प सोहळा.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा