· राज्यातील शासकीय सेवा व शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने हंगामी स्थगिती दिली आहे. · या स्थगिती आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे. |
· वोडाफोन या कंपनीचे तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या थकबाकीविषयी आयकर खात्याने सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. |
· देशातील सर्वाधिक उंच ऊर्जा वितरण टॉवर्स आता पश्चिम बंगालमध्ये उभारले जाणार असून, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंच टॉवर असतील. · "हल्दीया एनर्जी लिमिटेड" नावाची कंपनी या दोन टॉवर्सची उभारणी करणार आहे. तब्बल २३६ मीटर लांबी असणारे हे दोन टॉवर हल्दीया आणि रायचक येथील विद्युत प्रकल्पात उभारले जाणार असून, हे दोन्ही प्रकल्प हुगळी नदीला लागूनच आहेत. · जगातील सर्वांत उंच ऊर्जा वितरण करणारा टॉवर हा चीनमधील माऊंट दामाओशानमध्ये उभारण्यात आला असून, त्याची उंची ही ३७० मीटर एवढी आहे. · पुढील महिन्यापासून या दोन्ही टॉवर्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष ऊर्जा वितरण केले जाईल. |
· वायव्य चीनमधील लीआँगिंग प्रांतामध्ये असलेल्या कोळसा खाणीमध्ये लागलेल्या आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. |
· पं. भीमसेन जोशी पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे यांना ३ डिसेंबर रोजी देण्यात आहे. |
· ईशान्येकडील मेघालय हे महत्त्वपूर्ण राज्य आता "रेल्वे मॅप"वर येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील विशेष रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. · आसाममधील दुधोनी आणि मेंदीपठार या दोन भागांना ही रेल्वे सेवा जोडेल. · येत्या २९ नोव्हेंबरपासून ही रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. · या रेल्वे सेवेच्या उभारणीस १९९२-९३ मध्येच मान्यता देण्यात आली होती. |
· महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना जाहीर झाला आहे. |
· राज्यातील खेड्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आवश्यक आहे. · पंतप्रधान सडक योजनेतील रस्ता ज्या ठिकाणी संपतो तेथून पुढे राज्याच्या विकास निधीतून रस्ते "मुख्यमंत्री सडक योजना" सुरु करून पूर्ण करण्याचा ग्रामविकास खाते विचार करत आहे. |
· बिग बॉस'फेम बिनधास्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आणि तिचा पती मीर शकील उर-रहमान यांच्यासह चौघांना पाकिस्तानातील दशहतवादविरोधी न्यायालयाने ईश निंदा केल्याबद्दल २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. · वीणा मलिक हिच्या पतीच्या मालकीच्या 'जियो टीव्ही'वर दाखविण्यात आलेल्या नाट्यमय विवाह सोहळ्यात धार्मिक गीत वाजविण्यात आले होते |
· प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचे निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. · नृत्योपासनेसाठी त्यांना संगीत नाटक अकादमी, पद्मश्री आणि कालिदास पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. · त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारही दिला जाणार होता, परंतु त्यांनी 'भारतरत्न'ची मागणी करून तो नाकारला होता. |
· दिल्ली-चेन्नई या एक हजार ७५४ किलोमीटर अंतराच्या जगातील दुसऱ्या मोठ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या उभारणीसाठी अभ्यासाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. · दिल्ली-चेन्नई हा प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रत्यक्षात आल्यास तो जगातील दुसरा मोठा मार्ग ठरणार आहे. चीनमध्ये दोन हजार २९८ किलोमीटर लांबीचा बीजिंग-गुआंगझोऊ हा रेल्वेमार्ग गेल्या वर्षी जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वेमार्ग ठरला होता. · हीरक चतुर्भुज प्रकल्प · दिल्ली-चेन्नई मार्ग हा प्रस्तावित 'डायमंड क्वाड्रिलॅटरल प्रोजेक्ट'चा भाग आहे. त्याअंतर्गत दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता, कोलकाता-दिल्ली आणि मुंबई-कोलकाता या विविध शहरांमध्ये हायस्पीड ट्रेनचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. · चेन्नई ते म्हैसूर व्हाया बेंगळुरू या सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्यावरही भारत-चीनचे एकमत झाले आहे. |
· महिंद्र आणि महिंद्र उद्योगसमूहाला ऑस्ट्रेलियात तयार केलेली विमाने भारतात विकण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. |
· नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री विरेंद्रसिंह यांनी हरियाणातून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. |
· सार्क देशांना भारताकडून ५ वर्षांचा बिझनेस व्हिसा देण्यात येईल. |
· "गुजरात मिल्क मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन"च्या वतीने "अमूल"चे जनक डॉ.वर्गिस कुरियन यांच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा करण्यात आला. देशातील धवल क्रांतीचे जनक मानल्या जाणाऱ्या कुरियन यांनी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचा समर्थ आर्थिक आधार उपलब्ध करून दिला होता. |
· मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या २०१३-१४ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली? · प्रौढ वाङ्मयातील काव्य प्रकारासाठीचा कवी केशवसुत पुरस्कार श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. |
चालू घडामोडी - २८ व २९ नोव्हेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा