· जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक (एकूण जागा - ८७) · सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्सला दूर करत जम्मू-काश्मीरच्या जनतेने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) पसंती दिली. पीडीपीने २८ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मजल मारली. · २५ जागांवर विजय मिळवून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काश्मीर खोरे आणि लडाखमधील ५० जागांपैकी एकही जागा न जिंकता आल्यामुळे नरेंद्र मोदींचे काश्मिरमध्ये मिशन-४४ यशस्वी होऊ शकले नाही. · नॅशनल कॉन्फरन्सला १५ तर काँग्रेसला ११ जागांवर समाधान मानावे लागले. · जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सोनावर मतदारसंघात पराभवाचा झटका बसला, पण बीरवा या दुसर्या जागी ते केवळ एक हजार मतांच्या फरकाने विजय मिळवू शकले. · स्पष्ट बहुमत मिळविण्यात कोणत्याही पक्षाला यश न मिळाल्यामुळे सर्वाधिक जागा मिळालेल्या पीडीपीला इतर पक्षांची मदत घेणे अपरिहार्य आहे. · याशिवाय २५ जागांसह भाजपदेखील सर्व पर्यायांचा अवलंब करीत सत्ता स्थापनेच्या मनःस्थितीत आहे. |
· झारखंड विधानसभा निवडणूक (एकूण जागा - ८१) · ‘सबका साथ सबका विकास’ या तत्वानं ‘अच्छे दिन’ आणण्याचं आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट झारखंडमध्येही उसळली. · झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट कौल दिला. · एकूण ८१ जागांपैकी ४२ जागा भाजप पक्षाने जिंकल्या. तर झारखंड मुक्ती मोर्चाला १९ जागांवर यश प्राप्त झाले. · कॉंग्रेसला फक ६ जागा जिंकता आल्या. |
· आसामच्या सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत ४ महिलांसह ४८ जण मारले गेले. |
· राज्याच्या समतोल आर्थिक विकासावर अभ्यास करून सरकारला शिफारस करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. · या समितीचा अहवाल बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला. · समतोल विकासाचा आरखडा योग्य रीतीने अमलात आणण्यात येत नसेल तर विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याऐवजी स्वायत्त राज्याचा दर्जा देता येईल, असे मत डॉ. विजय केळकर समितीने व्यक्त केले आहे. · केळकर समितीचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारलेला ही नाही आणि नाकारलेला नाही. तो विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची मान्यता दिली आहे, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. · विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी त्या त्या प्रदेशातील ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन करता येईल. प्रदेशातील सर्व कॅबिनेट मंत्री त्याचे सदस्य असतील, अशी शिफारसही या समितीने केली आहे. · विदर्भ प्रादेशिक विकास मंडळाचे मुख्यालय नागपुरात, मराठवाडा प्रादेशिक मंडळाचे मुख्यालय औरंगाबादला तर उर्वरित महाराष्ट्राचे मुख्यालय नाशिकमध्ये असावे, असे समितीने म्हटले आहे. · विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र प्रादेशिक सचिवालय असावे. या सचिवालयाचा प्रमुख हा अतिरिक्त मुख्य सचिव असेल आणि प्रादेशिक विकास आयुक्त हे त्याचे पद असेल, असे समितीने म्हटले आहे. · राज्याच्या तीन प्रमुख विभागांच्या नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तीन प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे. · अन्य शिफारसी · मोठय़ा प्रकल्पांसाठी मूल्यांकन मंडळ स्थापन करावे. · राज्य सांख्यिकी मंडळ स्थापन करावे. · धोरणे निश्चित करण्यासाठी एक सार्वजनिक धोरण संस्था असावी. · महाराष्ट्र विकास संशोधन परिषद स्थापन करावी. · जनजाती सल्लागार समितीचे, ‘जनजाती सल्लागार आणि विकास परिषद’ असे नामाभिधान करून त्याची जबाबदारी व्यापक करावी. · विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रादेशिक पाणलोट क्षेत्र विकास मोहीम राबवावी. · विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कापूस मोहीम राबवावी. · विदर्भ, मराठवाड्यासाठी चारा आणि पशुधन विकास मोहीम हवी. · प्रादेशिक महिला शेतीकाम प्रशिक्षण संस्था स्थापन करावी. |
· २००५ पूर्वीची छपाई तारीख असलेल्या नोटा बदलण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असून, आता ३० जून २०१५ पर्यंत या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. · यापूर्वी नोटा बदलण्यासाठी १ जानेवारी २०१५ या तारखेची मुदत निश्चित करण्यात आली होती. |
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावासाठी घेण्यात विशेष अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मंगळवारी रद्द करण्यात आले. · विशेष अधिवेशनासाठी सभागृहात आलेल्या राज्यपालांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षाचे राहुल बोंद्रे (चिखली), अब्दूल सत्तार (सिल्लोड), अमर काळे (आर्वी), जयकुमार गोरे (माण) आणि विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) अशा पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित केले होते. |
· १६ व्या लोकसभेच्या तिसर्या अधिवेशनात १८ विधेयके मंजूर झाली. अलीकडच्या वर्षांतील हा एक विक्रम आहे. लोकसभाध्यक्षांनी यासाठी संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन केले. · लोकसभेच्या एकूण २२ कामकाजी दिवसांत सुमारे १२९ तास कामकाज झाले. विविध व्यत्ययांमुळे सभागृहाचा तीन तासांचा वेळ वाया गेला. तथापि सभागृहाने १७ तासांपेक्षा अधिक अतिरिक्त तास कामकाज करून महत्त्वपूर्ण वित्तीय व अन्य कार्ये पूर्ण केलीत. |
· भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार विराट कोहली याने क्रीडापटूंमध्ये ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असलेल्या यादीत अव्वल स्थान पटकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. · विराटचे ४८ लाख ७० हजार १९० फॉलोअर्स असून, सचिनच्या फॉलोअर्सची संख्या ४८ लाख ६९ हजार ८४९ इतकी आहे. · भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३३ लाख २७ हजार ०३३ फॉलोअर्ससह तिसर्या स्थानावर आहे. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा