· २३ डिसेंबर : राष्ट्रीय किसान दिवस |
· महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) २००७ मध्ये घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीतील घोटाळाप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन उपसचिव श्रीमती नि. श. पटवर्धन यांच्यासह ३९ जणांविरुद्ध अखेर शनिवारी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. · अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकांच्या ९६ पदांसाठी लोकसेवा आयोगाने २००७ मध्ये जाहिरात दिली होती. ५ ऑक्टोबर २००८ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुलाखती झाल्या आणि २ डिसेंबर रोजी ८३ पात्र उमेदवारांची यादी एमपीएससीने शासनाकडे पाठविली. · पात्र असतानाही डावलल्याने औरंगाबादेतील अमोल लेकुरवाळे यांनी माहिती अधिकारात या भरतीची सर्व कागदपत्रे मागविली होती. कागदपत्रे मिळताच भरतीत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. |
· लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळ्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची परेड या वर्षी मरिन ड्राइव्हवर होणार नाही. · मुंबई पोलिसांनी आधी सुरक्षेचे कारण देत या परेडला नकार दिला होता, मात्र ते कारण दिले तर टीकेची झोड उठेल म्हणून मुंबई महापालिकेने या भागात रस्त्याची कामे काढल्याने ही परेड शिवाजी पार्कवर होईल, असे कारण आता पुढे केले आहे. |
· तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यास रेल्वेने मोबाइलवर तिकिटे देण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र असे मोबाइल अँप तयार करण्यात आले आहे. · त्यानुसार २६ डिसेंबर रोजी मोबाइल अॅपचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात केला जाणार आहे. · या सेवेचा २६ डिसेंबर रोजी शुभारंभ केल्यावर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रत्येकी पाच स्थानकांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला ही सेवा ठाणे, घाटकोपर, दादर, अंधेरी या स्थानकांवर असेल. · या अॅपद्वारे तिकीट काढून स्थानकांवर असलेल्या एटीव्हीएमद्वारे ते छापील स्वरूपात मिळवता येणार आहे. अॅपवर प्रथम मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल आणि त्याद्वारे तिकीट काढल्यावर एक मॅसेज प्रवाशाला मिळेल. या मॅसेजमध्ये पिन नंबर असेल. स्थानकावर तिकीट काढण्यास गेल्यावर प्रवाशाला एटीव्हीएमचा वापर करून मोबाइलवर आलेल्या पिन नंबरद्वारे तिकीट मिळवता येईल. · मोबाइलवरून तिकीट काढताना त्याचे पैसे अदा करण्यासाठी रेल्वेने ‘आर वॉलेट’ ही संकल्पना आणली असून, तिकीट खिडकी तसेच ऑनलाइन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. |
· सचिन तेंडुलकर २०१५ मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर. · सलग दुसऱ्यांदा सचिनला विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. · येत्या १४ फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या सुरू होणाऱया विश्वचषक स्पर्धेचा आदर्श चेहरा म्हणून सचिन स्पर्धेचे प्रमोशन करताना दिसेल. · २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या ब्रँड अम्बॅसिडरची धुरा अतिशय खुबीने वठवल्यानंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देखील सचिनचीच पुन्हा निवड करण्याला आयसीसीने प्राधान्य दिले. |
· सागरी किनारपट्टीवर एखादी संशयास्पद घटना अथवा वस्तू दिसल्यास त्याची पोलिसांना तत्काळ माहिती मिळावी, यासाठी पोलिसांनी १०९३ ही कोस्टल हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. |
· भारताने मॉरिशसला प्रथमच युद्धनौका निर्यात केली आहे. · भारताने प्रथमच संरक्षणात निर्यातीचे क्षेत्र ओलांडले आहे. · भारत काही युद्धनौकांची निर्यात करणार असून त्यातील ही पहिली युद्धनौका आहे. · ती गार्डन रीच शीपबिल्डर्स अँड इंजिनीयर्स लिमिटेड या कोलकात्याच्या सार्वजनिक कंपनीने तयार केली आहे. · तिची किंमत ५४.८० दशलक्ष अमेरिकी डॉलर असून तिची लांबी ७४.१० मीटर आहे. |
· इंटरनेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलचे भारतातील पहिले स्वत:चे केंद्र हैदराबाद येथे सुरू होत आहे. · अमेरिका, इंग्लंड व नंतर आता भारतात त्यांचे तिसरे केंद्र सुरू होईल. |
· ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राची खेळाडू तेजस्विनी सावंत हिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन विभागात सुवर्णपदक जिंकले. याचप्रमाणे तिने सांघिक विभागातही महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिले. |
· विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची निवड करण्यात आली. · विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. |
· लोकसभेत शुक्रवारी सादर करण्यात आलेले ‘मध्य-वार्षिक आर्थिक अवलोकन अहवाल २०१४-१५’ हा अरविंद सुब्रह्मण्यन यांच्या देखरेखी खाली तयार करण्यात आला आहे. · देशाचे नवीन आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी रिझव्र्ह बँकेच्या गत दोन गव्हर्नरांच्या कार्यकाळावर सडकून टीका करताना २००७ ते २०१३ या दरम्यान देशाच्या पतविषयक धोरणाने विश्वासार्हता धुळीस मिळविणारीच कामगिरी केली आहे, असे विधान ह्या अहवालात नमूद केले आहे. · सप्टेंबर २००३ ते सप्टेंबर २००८ पर्यंत वाय. व्ही. रेड्डी हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर होते तर त्यानंतर सप्टेंबर २०१३ पर्यंत डी. सुब्बाराव हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर राहिले आहेत. · विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी ४ सप्टेंबर २०१३ पासून रिझव्र्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून सूत्रे हाती घेतली. |
· माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी लिहिलेल्या ‘अॅन अनडॉक्युमेंटेड वंडर - द मेकिंग ऑफ द ग्रेट इंडियन इलेक्शन’ या पुस्तकाचे कोलकाता येथे प्रकाशन झाले. |
· नासाच्या केप्लर मोहिमेच्या नवीन टप्प्यात प्रथमच एक बाहयग्रह सापडला असून तो पृथ्वीपासून १८० प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचे वर्णन ‘महापृथ्वी’ असे करण्यात आले आहे. · केंब्रिजमधील हार्वर्ड स्मिथ सॉनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे मुख्य संशोधक अँड्र्यू वँडरबर्ग यांनी केप्लर-२ मोहिमेतील माहितीच्या आधारे हा ग्रह शोधून काढला आहे. केप्लर-२ मोहीम फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आहे. · या ग्रहाचे नामकरण एचआयपी ११६४५४ बी असे असून त्याचा व्यास पृथ्वीच्या अडीचपट आहे. त्याच्या मातृताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्याला नऊ दिवस लागतात. · हा मातृतारा मात्र सूर्यापेक्षा थंड असून लहानही आहे, जीवसृष्टीसाठी तो जास्त उष्ण ग्रह आहे. एचआयपी ११६४५४ बी हा ग्रह व त्याचा मातृतारा पृथ्वीपासून १८० प्रकाशवर्षे दूर व मीन तारकासमूहात आहे. · हार्पस - नॉर्थ स्पेक्ट्रोग्राफ या कॅनडी बेटांवरील यंत्राच्या मदतीने घेण्यात आलेल्या मापनांच्या आधारे या शोधाची निश्चिती करण्यात आली आहे. |
· ब्रिटनचे ख्यातनाम पत्रकार व भारतातील माजी उच्चायुक्त जॉन फ्रीमन (वय ९९) यांचे निधन झाले. · बीबीसीवर ते फेस टू फेस हा कार्यक्रम सादर करीत असत. · भारतात १९६५ ते १९६८ दरम्यान हॅरॉल्ड विल्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ते राजदूत होते. · न्यू स्टेटसमन मासिकाचे ते संपादक होते तसेच मजूर पक्षाचे खासदार होते. · अमेरिकेतही ते राजदूत होते व लंडन विकएंड टेलिव्हिजनचे अध्यक्ष होते. · मार्टिन ल्यूथर किंग व बट्राँड रसेल यांच्या मुलाखती त्यांनी त्यांच्या खास शैलीत घेतल्या होत्या. |
Your blogs is very good for all compitetaive examination student your countinity is important in this roll thanku sir
उत्तर द्याहटवाExcellent....
उत्तर द्याहटवा