· १८ डिसेंबर : अल्पसंख्यांक हक्क दिन |
· भारतीय प्रक्षेपकातून अंतराळात मानव पाठविण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी १८ डिसेंबर २०१४ रोजी यशस्वी पाऊल टाकले. · आतापर्यंतच्या सर्वाधिक वजनाच्या यानाने गुरुवारी श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे उड्डाण केले आणि इस्रोने भारतीय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवा इतिहास लिहिला. · तब्बल ६३० टन वजनाच्या जीएसएलव्ही मार्क-३ या यानाने गुरुवारी सकाळी यशस्वीपणे उड्डाण केले. · प्रयोग म्हणून करण्यात आलेल्या उड्डाणाने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. · सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपक तळावरून गुरुवारी सकाळी नऊ वाजता या यानाने अंतराळाच्या दिशेने झेप घेतली. या प्रायोगिक उड्डाणामध्ये इस्रोने या स्वरुपाच्या उड्डाणासाठी लागणाऱया सर्व चाचण्या घेतल्या. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. · गुरुवारी झालेले उड्डाण मानवरहित होते. · प्रक्षेपकाची वैशिष्ट्ये : · उंची : ४२.४ मीटर · वजन : ६३० टन · उपग्रह वाहून नेण्याची क्षमता : ४ टन · पहिला टप्पा : २०० टन घन इंधनाचे समावेश असणारे दोन जुळे बुस्टर. · दुसरा टप्पा : इस्त्रोने विकसित केलेला द्रवरूप इंधनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा. · तिसरा टप्पा : स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश. · इनसॅट श्रेणीतील चार-साडेचार वजनाच्या उपग्रहांना भूस्थिर कक्षेत; तसेच मानवी अवकाशकुपीला पृथ्वी नजीकच्या कक्षेत सोडण्यासाठी उपयुक्त. · अवकाशकुपीची वैशिष्ट्ये : · वजन : ३.६ टन, सांगाडा अॅल्युमिनीअमने बनलेला; आकार लहान खोली एवढा · दोन ते तीन अंतराळवीर बसण्याची क्षमता · लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि उष्णतारोधक कवचाने सुरक्षित · समुद्रावर अलगदरीत्या उतरवण्यासाठी तीन पॅराशुटचा वापर. |
· स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत कमीतकमी गुंतवणुकीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी अरुणाचल प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाने “नमो इंडिया” या प्रकल्पाचे उद्घाटन केले. |
· सोनी पिक्चर्स कंपनीवर नुकत्याच झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामध्ये जेम्स बॉंड मालिकेमधील "स्पेक्टर' या आगामी चित्रपटाचे प्राथमिक कथानक चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. |
· अमेरिकेतील भारतीय महिलांसाठी प्रथमच न्यूजर्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याची नमिता दोडवाडकर “मिसेस इंडिया यूएसए” या मुकुटाची मानकरी ठरल्या आहेत. |
· चर्च ऑफ इंग्लंडने परंपरा मोडत एका महिलेची बिशपपदी नेमणूक केली. रेवरंड लिबी लेन (वय ४८) असे या पहिल्या महिला बिशपचे नाव असून, त्यांची स्टॉकपोर्ट येथे बिशपपदी नियुक्ती करण्यात आली आहे. |
· पेशावरमधील शाळेत तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जागे झालेल्या पाकिस्तान सरकारने मृत्युदंडाच्या शिक्षेवर असलेली बंदी उठविली आहे. |
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कर्नाली पंचायतीअंतर्गत येणारी येणारी कर्नाली, पिपालीया, वादिया आणि बागलीपुरा ही चार गावे दत्तक घेतली आहे. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा