चालू घडामोडी : ०१ ऑक्टोबर

वैद्यकक्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

  • अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. ॲलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना २०१८चा शरीरविज्ञान व वैद्यकक्षेत्रासाठीचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार संयुक्तरित्या जाहीर झाला आहे.
  • कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारांच्या क्रांतिकारी संशोधनासाठी या दोघांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • यांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते.
  • कॅन्सरमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत ढकलला जातो.
  • यामुळे कॅन्सरशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रुग्णाला मिळावी यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते.
  • यावर उपाय म्हणून ॲलिसन आणि होंजो यांनी अशी थेरपी शोधून काढली ज्यामुळे रुग्णाची कॅन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरिरातील पेशी या कॅन्सरपासून सुरक्षित राहू शकतील.
  • या थेरपीमुळे अनेक कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचवता येणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या दोघांना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • ॲलिसन हे टेक्‍सास विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर होंजो हे क्‍योटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आशियाचे नोबेल समजला जाणारा टॅंग पुरस्कार २०१४मध्ये होंजो यांना मिळाला होता.
  • स्टॉकहोमध्ये १० डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात दोघांनाही नोबेलने सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह व ९० लाख स्वीडीश क्रोनर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • गेल्या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे ३ संशोधक जेफरी सी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला होता.
  • बायोलॉजिकल क्लॉकवर तिन्ही संशोधकांनी अभूतपूर्व काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
नोबेल पुरस्कार
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे ३५५ विविध पेटंट्स होते. त्यापैकी डायनामाइट सर्वात लोकप्रिय आहे.
  • नोबेल पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली आहे.
  • १९०१पासून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र या पाच क्षेत्रांसाठी हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली.
  • १९६९पासून स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
  • १० डिसेंबर १८९६ रोजी अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रतिवर्षी हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी प्रदान केले जातात.
  • शांततेच्या नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त इतर सर्व नोबेल पुरस्कार स्टॉकहोम (स्वीडन) येथे प्रदान केले जातात. तर शांततेचा नोबेल पुरस्कार ओस्लो (नॉर्वे) येथे प्रदान केला जातो.

बीसीसीआय आता माहिती अधिकाराच्या कक्षेत

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकारातंर्गत (आरटीआय) काम करेल, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) दिला आहे.
  • अनेक वर्षांपासून बीसीसीआयलाही माहिती अधिकाराअंतर्गत आणण्याची मागणी होत होती. या आदेशामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे.
  • यामुळे आता बीसीसीआय माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बाधिल असेल.
  • बीसीसीआय देशातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारी ‘स्वयंघोषित’ राष्ट्रीय संस्था आहे. त्यांचे देशातील क्रिकेटवर एकाधिपत्य आहे.
  • केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी कायद्याअंतर्गत आवश्यक केंद्रीय माहिती अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांप्रमाणे योग्य अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश बीसीसीआय अध्यक्ष, सचिव आणि प्रशासकांच्या समितीला दिले आहेत.
  • बीसीसीआयला या कायद्याअंतर्गत आणण्यासाठी सीआयसीने कायदा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, विधी आयोगाचा अहवाल तसेच युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांचा अहवाल पडताळून पाहिला.
  • त्यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआय तरतूद कलम २ (एच)च्या अटींची पुर्तता करते, असा निष्कर्ष सीआयसीने काढला.
  • त्याचप्रमाणे आरटीआय तरतुदीनुसार माहितीसाठी अर्ज प्राप्त करण्यासाठी बीसीसीआयला १५ दिवसांच्या आत ऑनलाइन आणि ऑफलाइन तंत्रज्ञान तयार करण्याबाबतचे निर्देशही बीसीसीआयला देण्या आले आहेत.
  • क्रीडा मंत्रालयाने आरटीआय अर्जधारक गीता राणी यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने हे प्रकरण समोर आले होते. गीता राणी यांनी बीसीआयच्या नियम आणि मार्गदशिकेची माहिती मागितली होती.

दीपिका कुमारीला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक

  • भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत जर्मनीच्या लिसा उनरूह हिचे आव्हान मोडीत काढत कांस्यपदक जिंकले.
  • दीपिकाचे हे जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील ५वे पदक ठरले आहे. याआधी ती चार वेळा रौप्यपदकविजेती राहिली आहे.
  • तिने याआधी ४ वेळा अंतिम फेरीत मजल मारली आहे. पण चारही वेळा तिला जागतिक सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.
  • याच स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानेही पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.
  • तसेच याच स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कंपांऊंड मिश्र प्रकारात एक रौप्यपदकही जिंकले.

ऑक्टोबरचा पहिला सोमवार: जागतिक आवास दिन

  • १ ऑक्टोबर २०१८ रोजी जागतिक आवास (हॅबिटॅट) दिन साजरा केला गेला. हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो.
  • ‘महापालिका घन कचरा व्यवस्थापन’ (Municipal Solid Waste Management) हा जागतिक आवास दिन २०१८चा मुख्य विषय होता.
  • हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट मानवतेच्या मूलभूत अधिकारांना ओळखणे आणि त्यांना पर्याप्त आश्रय प्रदान करणे आहे.
  • या दिवशी शहरीकरणामुळे गरिबी तसेच पर्यावरणावर झालेल्या विपरीत परिणामांना अधोरेखित केले जाते.
  • १९८६मध्ये केनियाच्या राजधानी नैरोबी येथे हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला.

अमेरिका आणि मोरोक्कोचे टेररिस्ट ट्रॅवल इनिशिएटिव्ह

  • अमेरिका आणि मोरोक्कोने दहशतवाद्यांच्या कारवायांना रोखण्यासाठी जीसीटीव्ही टेररिस्ट ट्रॅवल इनिशिएटिव्ह सुरू केले आहे.
  • हे इनिशिएटिव्ह ग्लोबल काउंटर टेररिझिझ फोरम (जीसीटीएफ) अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
  • या उपक्रमात तज्ञांच्या मदतीने दहशतवाद्यांच्या कारवायांवर बंदी घातली जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या सत्रासह हे इनिशिएटिव्ह लॉन्च केले गेले.
  • या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांच्या २३९६ ठरावाला बळकटी मिळेल. या ठरावाचा उद्देश दहशतवादी कारवायांना पूर्णपणे थांबविणे हा आहे.

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञपदी भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ

  • भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्ड यांनी गोपीनाथ यांची नियुक्ती केली आहे.
  • सध्याचे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ञ मॉरीस ऑब्स्टफेल्ड डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यानंतर या पदाची धुरा गीता गोपीनाथ यांच्याकडे असेल.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
  • याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची सप्टेंबर २००३ ते जानेवारी २००७ या काळात आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती झाली होती.
गीता गोपीनाथ यांच्याबद्दल
  • भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून एमए केले आहे.
  • त्यांच्याकडे अमेरिकचे नागरिकत्व असून २००१मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पीएचडी प्राप्त केली आहे.
  • गीता यांनी काही काळ केरळ मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. 
  • त्या सध्या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच त्या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादकही आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या सहसंचालिकादेखील आहेत.
  • गोपीनाथ या जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दांडगा अनुभव आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
  • स्थापना: २७ डिसेंबर १९४५
  • सदस्य: १८९ देश
  • उद्देश्य: आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे. आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे. शाश्वत आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे.
  • मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी, अमेरिका
  • अधिकृत भाषा: इंग्रजी
  • प्रमुख: ख्रिस्टिन लगार्ड
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF: International Monetary Fund) ही जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
  • आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि गरजू सभासद देशांना विविध प्रकारचा कर्जपुरवठा करणे ही आयएमएफची मुख्य कार्ये आहेत.
  • आयएमएफद्वारे सभासद देशांचा चलन विनिमय दर ठरविला जातो. यासाठी सभासद देशांना त्यांच्या चलनाचे मूल्य डॉलर व सुवर्णाच्या रूपात जाहीर करावे लागते. या पद्धतीमुळे विविध देशांच्या चलनांचा परस्पर विनिमय दर निश्चित करता येतो.

#LooReview अभियान

  • केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने गुगलच्या सहकार्याने गुगल मॅपवर #LooReview अभियान सुरू केले आहे.
  • हे संयुक्त अभियान स्वच्छ भारत मोहिम (शहरी) या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. हे अभियान ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ दरम्यान चालविले जाईल.
  • हे अभियान नागरिकांना गुगल मॅपद्वारे त्यांच्या शहरातील सार्वजनिक शौचालय सहजतेने शोधण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेचा भाग आहे.
  • सध्या गुगल मॅपवर देशभरातील ५००हून अधिक शहरांतील ३० हजारपेक्षा अधिक सार्वजनिक शौचालय सक्रिय आहेत.
  • भारतातील स्थानिक मार्गदर्शकांना गुगल मॅपवर सार्वजनिक शौचालयांचे मूल्यांकन करण्यास आणि त्यासंबंधी अभिप्राय देण्यास प्रोत्साहित करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
  • स्थानिक मार्गदर्शक असे लोक आहेत जे गुगल मॅपवर स्थानांबद्दल पुनरावलोकन लिहितात आणि स्थानाशी संबंधित चित्रे समाविष्ट करतात.
  • कोणीही सामान्य व्यक्ती स्थानिक मार्गदर्शक समुदायात सामील होऊ शकतात आणि गुगल मॅपवर आपला अभिप्राय नोंदवू शकतात.
स्वच्छ भारत अभियान (शहरी)
  • हागणदारीमुक्त दर्जा प्राप्त करण्यासाठी भारतीय शहरात सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून स्वच्छता प्राप्त करणे हे शहरी स्वच्छ भारत अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.
  • सध्या देशात ३४०० शहरांनी हागणदारीमुक्त दर्जा मिळविला असून, इतर शहरेदेखील ते साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
  • त्यामुळे आता हागणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची योग्य देखभाल व त्यांचा नियमित वापर होणे गरजेचे आहे.

इंजीती श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली सीएसआरसाठी समिती

  • केंद्रीय कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने या मंत्रालयाचे सचिव इंजीती श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
  • ही समिती सध्याच्या रचनेचे पुनरावलोकन करेल आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवरील धोरणासाठी रोडमॅप तयार करेल.
  • ही समिती कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेले नियम आणि परिपत्रक यांचे पुनरावलोकन करेल.
  • तसेच ही समिती सीएसआर उपक्रमांचे परिणाम, कार्यक्रम आणि प्रकल्पांचेही पुनरावलोकन करेल.
  • याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर आणि लेखापरीक्षणाशी संबंधित कार्यासाठीदेखील ही समिती सूचना देईल. पहिल्या सभेनंतर तीन महिन्यांनी ही समिती सरकारकडे आपला अहवाल सादर करेल.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)
  • कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत समजावयाचे झाले तर औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकी.
  • पर्यावरण आणि सामाजिक कल्याणकारी उपक्रमांमध्ये कंपन्यांच्या स्वैच्छिक योगदानासाठी याची सुरुवात करण्यात आली.
  • सीएसआर हे एखाद्या निसर्गचक्राप्रमाणे असते. जे काही समाज, पर्यावरणाकडून मिळाले तेच पुन्हा त्यांना अर्पण करणे हे त्याचे उदात्त तत्त्व असते.
  • कंपनी अधिनियम २०१३च्या कलम १३५मध्ये सीएसआरची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या नियमानुसार, सीएसआरबद्दल निर्णय घेण्याची क्षमता कंपनीच्या मंडळाकडे आहे.
  • या तरतुदीनुसार ५०० कोटी रुपये मूल्य असलेल्या किंवा १००० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या किंवा ५ कोटी रुपयांहून अधिक निव्वळ नफा असलेल्या कंपन्यांना गेल्या ३ वर्षांतील सरासरी निव्वळ नफ्यापैकी २ टक्के रक्कम सीएसआरशी संबंधित उपक्रमांवर खर्च करणे बंधनकारक आहे.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनू भाकेर भारताची ध्वजवाहक

  • ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) येथे ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय दलाची ध्वजवाहक युवा नेमबाज मनू भाकेर असणार आहे.
  • या स्पर्धेसाठी भारताचा ६८ सदस्यीय दल अर्जेंटिना येथे रवाना होणार आहे. ज्यात ४६ खेळाडूंचा समावेश आहे. भारत या स्पर्धेत १३ खेळांमध्ये सहभाग घेणार आहे.
  • भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष: नरिंदर बत्रा

१ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा