चालू घडामोडी ऑक्टोबर २०१८ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चालू घडामोडी ऑक्टोबर २०१८ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चालू घडामोडी : २० ऑक्टोबर

धर्म गार्डियन: भारत आणि जपानचा संयुक्त सैन्य अभ्यास

  • भारत आणि जपानी सैन्याच्या ‘धर्म गार्डियन २०१८’ या संयुक्त सैन्य अभ्यासाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मिझोराममध्ये करण्यात येणार आहे.
  • २ आठवड्यांपर्यंत चालणारा हा संयुक्त सैन्य अभ्यास १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू होईल.
  • या संयुक्त सैन्य अभ्यासात जंगली प्रदेशात युद्धाभ्यास केला जाईल. संरक्षणासंबधी आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान समन्वय वाढविणे, हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
  • या सरावादरम्यान दोन्ही सैन्य युद्धस्थितीचा अभ्यास, युद्ध काळात योजना आखणी आणि त्याची अंमलबजावणी याचा सराव करणार आहेत.
  • या संयुक्त सैन्य अभ्यासात भारताचे प्रतिनिधित्व ६/१ गोरखा रायफल्स करेल. तर जपानचे प्रतिनिधित्व त्यांच्या भूदलाच्या ३२ इन्फंट्री रेजिमेंटद्वारे केले जाईल.
  • या संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंध सुधारतील. तसेच दहशतवादाविरुद्ध लढण्यास मदत होईल.
  • भारत आणि जपान यांच्यातील प्रगतीशील संबंधांमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल सिध्द होईल.

सिंगापूरमध्ये एडीडीएमचे आयोजन

  • सिंगापूरमध्ये १९-२० ऑक्टोबर २०१८ रोजी १२व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे (एडीडीएम) आणि ५व्या एडीडीएम-प्लसचे आयोजन करण्यात आले.
  • ही बैठक आग्नेय आशियातील संरक्षणासाठी प्रमुख मंत्रीस्तरीय मंच आहे. या मंचावर आसियान देशांद्वारे संरक्षण आणि सहकार्यावर चर्चा केली जाते.
  • या बैठकीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलँड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.
  • या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
  • या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी सागरी सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाई, शांतता मोहिमा या मुद्यांवर सहमती दर्शवली.
एडीडीएम प्लस
  • ADDM: ASEAN Defence Ministers Meeting
  • एडीडीएम प्लस आसियान सदस्य देश आणि ८ भागीदार देशांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी तसेच शांती व विकास निर्मितीसाठी एक मंच आहे.
  • या बैठकीचा उद्देश चर्चा आणि पारदर्शकतेसह सदस्य देशांमध्ये परस्पर विश्वास मजबूत करणे हा आहे.
  • एडीडीएम प्लसच्या पहिल्या परिषदेचे आयोजन २०१०मध्ये व्हिएतनामची राजधानी हनोई येथे करण्यात आले होते.
आसियान
  • ASEAN (आसियान) : Association of Southeast Asian Nations
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  • स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  • १९९५ साली व्हिएतनाम, १९९७ साली लाओस व म्यानमार आणि १९९९ साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

मीनल पटेल यांचा अमेरिकेत प्रेसिडेंशियल मैडलने सन्मान

  • भारतीय वंशाच्या मीनल पटेल यांना मानवी तस्करीविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यासाठी अमेरिकेत प्रेसिडेंशियल मैडलने गौरविण्यात आले.
  • मीनल पटेल या मानवी तस्करीवरील ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांच्या सल्लागार आहेत.
  • जुलै २०१५मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले. या पदावर कार्य करताना त्यांनी मानव तस्करी थांबविण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले.
  • सध्या त्या महापौरांच्या मानवी तस्करी विरोधी योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. अमेरिकेतील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे.
  • यापूर्वी त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवीय शिखर संमेलनाच्या प्रवक्त्याही होत्या. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

स्टीफन हॉकिंग यांचे शेवटचे पुस्तक प्रकाशित

  • दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे ‘Brief Answers to the Big Questions’ हे शेवटचे पुस्तक १६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले.
  • टाईम ट्रॅव्हल, ब्लॅक होल इत्यादीसारख्या अनेक विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
  • या पुस्तकात हॉकिंग यांनी परमाणु शस्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता, जेनेटिक इंजीनियरिंग आणि ग्लोबल वार्मिंग यासारख्या विषयांवर आपले मत नोंदविले आहे.
स्टीफन हॉकिंग
  • ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांना आजच्या युगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते.
  • ते एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वरचना शास्त्रज्ञ व लेखक होते. ब्लॅक होल, हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
  • त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातले अत्यंत मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते.
  • २००९मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते.
  • त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.
  • वयाच्या २१व्या वर्षी ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. ते फार फार तर २ वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली होती.
  • परंतु असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत आधुनिक काळातील न्यूटन अशी ख्याती जगभर मिळवली.
  • दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

एससीओ शिक्षण मंत्र्यांची बैठक कझाकस्तान पार पडली

  • शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिक्षण मंत्र्यांची ७वी बैठक कझाकस्तानची राजधानीत अस्ताना येथे आयोजित करण्यात आली होती.
  • कझाकस्तान सरकार, कझाकस्तान विज्ञान व शिक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व एससीओ विद्यापीठाच्या रेक्टर कार्यालयाद्वारे ही बैठक आयोजित केली गेली.
  • भारत, कझाकस्तान, चीन, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे शिक्षण मंत्र्यांनी या बैठकीत भाग घेतला.
  • या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व मानव संसाधन आणि विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केले.
  • या बैठकीत संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक यात्रा, भाषा अभ्यास, व्यावसायिक शिक्षण आणि युवा विनिमय कार्यक्रम या क्षेत्रामध्ये बहुपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन
  • शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना २००१मध्ये चीनच्या पुढाकाराने करण्यात आली.
  • चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान आणि रशिया हे या संघटनेचे संस्थापक देश आहेत.
  • या देशांपैकी उझबेकिस्तान वगळता इतर देश १९९६मध्ये स्थापन झालेल्या ‘शांघाय फाइव्ह’ या गटाचे सदस्य होते.
  • २०१७मध्ये भारत व पाकिस्तानला या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आल्यामुळे सध्या या संघटनेचे ८ सदस्य देश आहेत.
  • हे ८ देश जगातील ४२ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या देशांचे उत्पन्न हे जागतिक उत्पन्नाच्या २० टक्के आहे.
  • अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे ‘एससीओ’शी निरीक्षक देश म्हणून संलग्न आहेत.
  • दहशतवाद, फुटीरतावाद या समस्यांविरोधात लढण्यासाठी आणि उपखंडीय समृद्धीसाठी यंत्रणा निर्माण करण्याकरिता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) स्थापन झाली.
  • मूलतत्त्ववाद व दहशतवाद या समस्यांबरोबरच व्यापार, गुंतवणूक व दळणवळण तसेच संपर्क या मुद्द्यांवर या संस्थेच्या माध्यमातून बदल घडून येणे अपेक्षित आहे.

भूटानमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाला बहुमत

  • भूटानमध्ये १८ ऑक्टोंबरला पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाला बहुमत मिळाले आहे. या पक्षाने नॅशनल असेम्बलीमध्ये ४७ पैकी ३० जागा जिंकल्या.
  • ही भूटानमधील तिसरी सार्वत्रिक निवडणूक होती. सुमारे १०० वर्षांपासून राजेशाही अस्तित्वात असलेल्या भूटानमध्ये २००८मध्ये लोकशाहीला सुरुवात झाली. येथे २००८मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या.
  • निवडणूकीमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाचे प्रमुख डॉ. लोतेय शेरिंग हे भूटानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
भूटानच्या सभागृहाचे स्वरूप
  • भूटानमध्ये दोन सभागृह असतात. त्यापैकी राष्ट्रीय काउंसिल हे जेष्ठ तर नॅशनल असेम्बली हे कनिष्ट सभागृह आहे.
  • राष्ट्रीय काउंसिलमध्ये एकूण २५ जागा आहेत. यापैकी ५ सदस्यांना भूटान नरेश नामनिर्देशित करतात. तर २० सदस्य देशातील २० प्रशासनिक आणि न्यायीक जिल्ह्यांतून निवडून येतात.
  • राष्ट्रीय काउंसिलमध्ये निवडून येणाऱ्या या सदस्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसणे आवश्यक असते.
  • नॅशनल असेम्बलीमध्ये एकूण ४७ जागा असून, त्यांची निवड जनतेद्वारे केली जाते. या सभागृहात बहुमतासाठी एखाद्या पक्षाला २४ जागा जिंकणे आवश्यक असते.

इस्रायलमधील अमेरिकेच्या दूतावासांचे विलीनीकरण

  • अमेरिकेने इस्रायलमधील आपला दूतावास आणि वाणिज्य दूतावास (Consulate General) यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जागतिक स्तरावरील कार्यात दक्षता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
  • जेरुसलेम आणि त्याच्या शहरी सीमांवरून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद आहेत.
  • पॅलेस्टाईनने आंतरराष्ट्रीय समर्थनासह पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी बनवू इच्छितो.
  • या पूर्वेकडील भागावर इस्रायलने १९६७च्या युद्धामध्ये नियंत्रण स्थापित केले होते. इस्रायलदेखील जेरूसलेमला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानते.
  • जेरुसलेम हे इस्रायलमधील ज्यूंसाठी एक पवित्र शहर आहे. त्यांची मंदिरे-स्मारके तिथे आहेत. तर पॅलेस्टिनी अरबांसाठीही जेरुसलेमचे इस्लामिक महत्त्व आहे.
  • याआधी डिसेंबर २०१७मध्ये अमेरिकेने इस्रायलची राजधानी म्हणून जेरूसलेमला मान्यता दिली होती.
  • त्यानंतर, मे २०१८मध्ये अमेरिकेने तेल अवीवऐवजी जेरूसलेममध्ये दूतावासाची स्थापना केली होती.
  • या विलीनीकरणानंतर अमेरिका जेरूसलेममध्ये पॅलेस्टिनी मुद्द्यांसाठी युनिट स्थापन करेल, जे गाझा आणि जेरूसलेममध्ये आपले कार्यक्रम सुरु ठेवेल.

बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी बेपीकोलंबो अंतराळ यान लाँच

  • जपान आणि युरोपच्या अंतराळ संघटनांनी एकत्रितपणे बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी बेपीकोलंबो अंतराळ यान फ्रेंच गुयाना येथून प्रक्षेपित केले.
  • हे अंतराळ यान ७ वर्षांनंतर बुध ग्रहापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या पृष्ठभागाच्या आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय ते बुध ग्रहाभोवती परिक्रमाही करेल.
  • ही मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि जपानी अवकाश संशोधन संस्थेने (JAXA) एकत्रितपणे आखली होती.
  • बेपीकोलंबो अंतराळ यान एरियन ५ रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेसाठी सुमारे २ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले.
  • यापूर्वी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी मेसेंजर नावाचे अंतराळ यान पाठवले होते. ४ वर्षे कार्य केल्यानंतर २०१५मध्ये ही मोहीम संपली.

चालू घडामोडी : १८ ऑक्टोबर

वैश्विक प्रतीस्पर्धात्मक अहवालात भारताला ५८वे स्थान

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वैश्विक प्रतीस्पर्धात्मक अहवालात भारताला ६२ गुणांसह ५८वे स्थान प्राप्त झाले आहे.
  • २०१७ च्या तुलनेत भारताच्या स्थानात ५ क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. जी-२० देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त लाभ भारताला मिळाला आहे.
  • उच्च आणि मध्यम वर्गाची अर्थव्यवस्थेत बदल करण्यासाठी चीन आणि भारताची कामगिरी समाधानकारक असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
  • भारताची वाटचाल योग्य असली तरी नोकरशाहीमध्ये कमी असल्यामुळे भारत थोडा पाठीमागे आहे.
  • या अहवालात १४० देशांच्या अर्थव्यवस्थांचे ९८ निकषांवर आणि उत्पादनक्षमतेच्या १२ स्तंभांवर मूल्यमापन करण्यात आले.
  • या यादीत ८५.६ गुणांसह अमेरिका प्रथम स्थानी आहे. त्याखालोखाल अनुक्रमे सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि जपान हे देश आहेत. चीन या यादीत २८व्या स्थानी आहे.
जागतिक आर्थिक मंच
  • इंग्रजी: World Economic Forum (WEF)
  • स्थापना: जानेवारी १९७१
  • मुख्यालय: कॉलॉग्नी, स्वित्झर्लंड
  • डब्ल्यूईएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्याची स्थापना क्लॉस एम श्वाब यांनी सार्वजनिक-खाजगी सहकार्याने जागतिक स्थिती सुधारण्यासाठी केली आहे.
  • ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहाय्याने ती कार्य करते.
  • व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे.
  • जागतिक संस्था, राजकीय पुढारी, बुद्धिवादी लोकांना तसेच पत्रकारांना चर्चा करण्यासाठी या संस्थेने एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

ॲम्फीच्या अध्यक्षपदी निमेश शहा

  • असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ॲम्फीच्या अध्यक्षपदी निमेश शहा यांची नियुक्ती झाली आहे.
  • तर एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी कैलाश कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.
  • सध्या निमेश शहा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे (ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी आहेत.
  • ते सध्याचे ॲम्फीचे अध्यक्ष आणि या फंड संघटनेचे अध्यक्ष आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमण्यन यांची जागा घेतील. बालासुब्रमण्यन २०१६पासून या पदावर कार्यरत होते.
  • निमेश शहा यांना बँक तसेच वित्तीय सेवा क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीपूर्वी ते आयसीआयसीआय बँकेत कार्यरत होते.
  • म्युच्युअल फंड उद्योगातील सप्टेंबर २०१८अखेरची रक्कम २२.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. आधीच्या महिन्यात ती सर्वाधिक २५.२० लाख कोटी रुपये होती.
  • म्युच्युअल फंडमध्ये पुन्हा निधी ओघ वाढण्यासाठी करावे लागणाऱ्या प्रयत्नांकरिता शहा यांची कसोटी लागणार आहे.
  • ॲम्फीच्या संचालक मंडळात १५ संचालकांचा समावेश आहे. यामध्ये विविध फंड घराण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधित्व करतात.
ॲम्फी (AMFI)
  • पूर्ण रूप: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया
  • स्थापना: २२ ऑगस्ट १९५५
  • ही संस्था भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील मानक निर्धारक म्हणून कार्य करते. सध्या ४४ म्युच्युअल फंड कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत.
  • नैतिक आणि व्यावसायिक मानकांचा स्तर वाढवून देशामध्ये म्युच्युअल फंड बाजार विकसित करणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्वतंत्र संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.
  • भट्टाचार्य यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे.
  • अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे ४० वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
  • गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्य यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
  • अरुंधती यांच्या कार्यकाळातच एसबीआय आणि रिलायन्सच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट सुविधा वाढविण्यात आली.
अरुंधती भट्टाचार्य
  • जन्म: १८ मार्च १९५६ (कोलकत्ता)
  • अरुंधती भट्टाचार्य या भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • २०१६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या २५व्या स्थानी होत्या.
  • भारतातील फॉर्च्युन इंडिया ५०० कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • १९७७साली त्या प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून एसबीआयमध्ये रुजू झाल्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी परकीय चलन, ट्रेझरी, रिटेल ऑपरेशन्स, मानव संसाधन आणि गुंतवणूक बँकिंगमध्ये काम केले आहे.
  • यामध्ये बँकेच्या मर्चंट बँकिंग शाखा- स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्सच्या मुख्य कार्यकारी पदाचाही समावेश आहे.
  • ऑक्टोबर २०१६मध्ये त्या निवृत्त होणार होत्या, परंतु एसबीआयच्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विवादास्पद विलीनीकरणामुळे त्यांना ऑक्टोबर २०१७पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

निधन: उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी

  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी उर्फ एन. डी. तिवारी यांचे १८ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • एकेकाळचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या तिवारी यांचे निधन त्यांच्या जन्मदिनीच झाले.
  • तिवारी यांचा जन्म नैनितालमध्ये १८ ऑक्टोबर १९२५ रोजी झाला. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. यानंतर त्यांनी एलएलबीदेखील केले.
  • महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटनेत सामील झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राजकारणात उतरले.
  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे दुर्मिळ योगायोगही त्यांच्या नशिबी आला.
  • गांधी घराण्याचे निकटवर्तीय असल्याने १९७६, १९८४ आणि १९८८मध्ये तीनवेळा त्यांना उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदावर संधी मिळाली.
  • तिवारी १९८८ मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, १९८९ मधील निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाला.
  • तिवारी यांनी ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मात्र, तिन्ही वेळा त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही.
  • ते राज्यसभा व लोकसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये खासदारही होते. २००२साली ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले.
  • तिवारी यांनी २००७ ते २००९ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. त्यावेळी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने त्यांनी राजीनामा दिला.

आकाश मलिकला तिरंदाजीमध्ये रौप्यपदक

  • अर्जेन्टिनामध्ये ब्युनास आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या आकाश मलिकने तिरंदाजीमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.
  • आकाशला अंतिम फेरीत अमेरिकेच्या ट्रेंटन कोव्लेसकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला.
  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे.

१२वी आशिया-यूरोप बैठक ब्रुसेल्समध्ये सुरु

  • १२व्या आशिया-यूरोप बैठकीला १८ ऑक्टोबरपासून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे सुरूवात झाली. ही बैठक २ दिवस चालेल.
  • ‘Global Partners for Global Challenges’ (जागतिक आव्हानांसाठी जागतिक भागीदार) ही यंदाच्या बैठकीची मुख्य संकल्पना आहे आहे.
  • या बैठकीमध्ये सहभागी देश कनेक्टिव्हिटी, व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, हवामानातील बदल, दहशतवाद, समुद्री सुरक्षा आणि सायबर स्पेसशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.
  • या बैठकीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे प्रतीनिधीत्व उपराष्ट्रपती वेंगय्या नायडू करतील. यादरम्यान नायडू अनेक देशांच्या प्रमुखांसह द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होतील.
  • आशिया-यूरोप बैठक आशिया आणि यूरोपसाठी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी सहकार आणि वाटाघाटीकरिता सर्वोच्च मंच आहे.
आशिया-यूरोप बैठक
  • ASEM: Asia–Europe Meeting
  • या बैठकीत आशिया आणि यूरोपमधील ५१ देश चर्चेमध्ये भाग घेतात. याची स्थापना १ मार्च १९९६मध्ये केली गेली.
  • एएसईएमचे ५१ देश आणि युरोपियन युनियन व आसियान या क्षेत्रीय संघटनांसह एकूण ५३ सदस्य आहेत.
  • पहिल्या आशिया-यूरोप बैठकीचे आयोजन थायलंडच्या राजधानी बँकॉक येथे करण्यात आले होते.
  • एएसईएम जगातील ६२.३ टक्के लोकसंख्येचे, ५७.२ टक्के जीडीपीचे व जगातील ६० टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार

  • गुरुत्वाकर्षण विज्ञानात ४ दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला.
  • अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
  • प्रा. अष्टेकर सध्या पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक आहेत.
  • अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना १० हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे.
  • महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९मध्ये झाली होती.
प्रा. अभय अष्टेकर
  • अष्टेकर यांचा जन्म ५ जुलै १९४९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले.
  • त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण टेक्सास विद्यापीठातून झाले. तर १९७४मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली.
  • त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. तसेच त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतात महत्वाच्या पदावर काम केले आहे.
  • त्यांच्या मते, भौतिक आणि खगोल क्षेत्रात होणाऱ्या शोधांमध्ये अनेक दशकांपर्यंत गुरुत्वाकर्षणाचे प्रभुत्व राहील.
  • भौतिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांचे काम चांगले असून ते या क्षेत्रात चीनपेक्षाही पुढे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

निधन: ज्येष्ठ सतार व सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी

  • भारतीय शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ सतार व सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांचे १३ ऑक्टोबर रोजी मुंबईत वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांना गेल्या काही वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.
  • शास्त्रीय संगीतातले अलौकिक व्यक्तीमत्त्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित होत्या. सतार वादनातले त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण होते.
  • मध्यप्रदेशातील मैहर या ठिकाणी त्यांचा जन्म २३ एप्रिल १९२७ रोजी झाला. उत्साद बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या त्या कन्या होत्या.
  • सरोद वादक आशिष खान, अमित भट्टाचार्य, बहाद्दुर खान, बसंत काब्रा आणि बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया हे अन्नपूर्णा देवींचे शिष्य होते.
  • शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांचा १९७७मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
  • याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), विश्वभारती विद्यापीठाची देसीकोट्टम पदवी (१९९९), रत्न पुरस्कारासह (२००४) अनेक पुरस्कार मिळाले होते.

चीनकडून जगातील सर्वात मोठ्या मानवरहित ड्रोनचे परीक्षण

  • चीनने १६ ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठ्या मानवरहित परिवहन ड्रोन ‘फिहोंग-९८’च्या (एफएच-९८) उड्डाणाचे यशस्वी परीक्षण केले.
  • हा ड्रोन चायना ॲकेडमी ऑफ एअरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीने (सीएएईटी) विकसित केला आहे.
  • हा ड्रोन १.५ टन वजन उचलण्यास सक्षम आहे. हा सैन्य ड्रोन नसून, व्यावसायिक ड्रोन आहे. या ड्रोनचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यात येणार आहे.
  • या ड्रोनचे कमाल वजन ५.२५ टन आहे. हा ड्रोन ४,५०० मी. उंचीवर आणि १,२०० किमी रेंजपर्यंत उड्डाण करू शकतो. याचा वेग १८० किमी प्रति तास आहे.
  • या ड्रोनला टेक-ऑफ व लँडिंगसाठी फक्त १५० मीटर धावपट्टीची आवश्यकता आहे. या ड्रोनचा वापर अतिदुर्गम भागात सामान वाहून नेण्यासाठी करता येणार आहे.

बेंगळुरूमध्ये क्रिप्टोकरन्सी एटीएम

  • भारतात बेंगळुरूमधील कॅम्प फोर्ट मॉलमध्ये १ क्रिप्टोकरन्सी एटीएम स्थापित करण्यात आले आहे.
  • हे एटीएम यूनोकॉइन नावाच्या कंपनीद्वारे स्थापित करण्यात आले आहे. याद्वारे यूनोकॉइनच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी खरेदी केली जाऊ शकते.
  • या एटीएमद्वारे वापरकर्ते १,००० ते १०,००० पर्यंत रक्कम जमा करू शकतात किंवा काढू शकतात.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
  • क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे डिजिटल चलन आहे. ही चलन भौतिक स्वरूपात उपलब्ध नसून, हे फक्त एक आभासी चलन आहे.
  • विविध देयकांसाठी (पेमेंट) ते एक विनिमय माध्यम म्हणून वापरले जाते. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
  • बिटकॉइनला जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखले जाते. ३ जानेवारी २००९ रोजी बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • इथीरियम, रिप्पल, लाइटकॉइन इत्यादी काही प्रमुख क्रिप्टोकरन्सी आहेत.

चालू घडामोडी : १७ ऑक्टोबर

केंद्र सरकारकडून ‘स्वस्थ भारत यात्रा’ सुरू

  • १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवसांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘स्वस्थ भारत यात्रा’ सुरू केली.
  • या राष्ट्रव्यापी मोहिमेचा उद्देश, देशभरातील लोकांना सुरक्षित भोजन घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जागृत करणे आहे.
  • हे अभियान राज्यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आले आहे. या मोहीमेचे नेतृत्व भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) करीत आहे.
  • या मोहिमेअंतर्गत देशभरात ग्राहकांना सुरक्षित आणि पौष्टिक आहार, निरोगी राहणीमान आणि खाद्य पदार्थांमधील भेसळ यांविषयी जागरुक करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • या रॅलीत सुमारे ७,५०० सायकलस्वार सहभागी होतील, जे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण १०० दिवसांत सुमारे १८ हजार किलोमीटर प्रवास करतील.
  • हे सायकलस्वार ‘इट राईट इंडिया’ (Eat Right India) असा संदेश देतील. २७ जानेवारी २०१९ रोजी राजधानी दिल्लीमध्ये या मोहिमेचा समारोप होईल.

युवा ऑलिम्पिक: प्रविण चित्रावेलला कांस्यपदक

  • अर्जेन्टिनामध्ये ब्युनास आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रविण चित्रावेलने तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
  • प्रविणने पहिल्या टप्प्यात १५.८४ मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात १५.६८ मीटर उडी मारत हे पदक निश्चित केले.
  • क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युन (३४.१८ मीटर) आणि नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा (३१.८५ मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.

ॲना बर्न्स यांना मॅन बुकर पुरस्कार

  • इंग्रजी ग्रंथविश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार उत्तर आर्यलँडच्या लेखिका ॲना बर्न्स यांना मिळाला आहे. मॅन बुकर पुरस्कारांची ही ५०वी आवृत्ती आहे.
  • ॲना बर्न्स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या त्या उत्तर आर्यलँडच्या पहिल्याच लेखिका आहेत.
  • अॅना बर्न्स यांचा जन्म १९६२मध्ये बेलफास्ट येथे झाला. ‘नो बोन्स’ ही त्यांची पहिली कादंबरी होती, त्यासाठी त्यांना २००१मध्ये विनिफ्रेड होल्टबी मेमोरियल प्राइज देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार
  • मॅन बुकर पुरस्कार प्रथम बुकर-मॅक्कोनेल पुरस्कार म्हणून ओळखला जात होता. १९६९मध्ये मॅन बुकर पुरस्कार सुरू झाला.
  • राष्ट्रकुल देशाच्या किंवा आयरिश नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. लेखकाबरोबरच त्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादकालाही देण्यात येतो.
  • पूर्वी हा पुरस्कार दर २ वर्षानी देण्यात येत होता. २०१६या वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या विजेत्याला ५०,००० पौंडाची रक्कम पुरस्कारस्वरूप देण्यात येते.
  • आतापर्यंत अरविंद अडिगा, किरण देसाई, अरुंधती रॉय आणि सलमान रश्दी या ४ भारतीय लेखकांना मॅन बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

१७ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन

  • जगभरात १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय दारीद्र्य निर्मुलन दिन साजरा केला जातो.
  • यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दारीद्र्य निर्मुलन दिनाची संकल्पना 'Coming together with those furthest behind to build inclusive world of universal respect for human rights and dignity' ही आहे.
  • संकल्पनेचा अर्थ: सर्वाधिक मागासलेल्या लोकांसह एकत्र येऊन असे जग निर्माण करणे, जेथे मानवाधिकार आणि प्रतिष्ठेला सार्वभौमिक आदर असेल.
  • जगभरातील समुदायांमध्ये गरीबी हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढवणे हा या दिनामागील उद्देश्य आहे.
  • यादिवशी दारीद्र्य निर्मुलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकास कार्ये व योजना याबाबत माहिती जाहिर केली जाते.
पार्श्वभूमी
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २२ डिसेंबर १९९२ रोजी १७ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मुलन दिवस आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • २०१८चा आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन संयुक्त राष्ट्र महासभेच्या या दिवसाच्या घोषणेचा २५वा वर्धापन दिन असेल.
  • अत्यंत गरीबी, हिंसा आणि उपासमारीचे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ १९४८ रोजी १७ ऑक्टोबर रोजी पॅरीसमध्ये १ लाखाहून अधिक लोक एकत्र आले होते.
  • त्यावेळी पॅरीसमध्ये मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या तारखेची निवड केली.

हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ओल्ली कासव अधिकृत शुभंकर

  • पुरुष हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी ओल्ली नावाच्या कासवाची अधिकृत शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी जागरुकता पसरविणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ही प्रजाती ओडिशा राज्यात गाहिरमाथा तटावर आढळते आणि ती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
  • पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या १४व्या आवृत्तीचे आयोजन २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे होणार आहे.
  • या स्पर्धेत १६ देश सहभागी होतील. कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित केली जाईल.
  • विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ: भारत, इंग्लंड, चीन, मलेशिया, कॅनडा, पाकिस्तान, बेल्जियम, जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका.

आयसीआयसीआयच्या सीईओ व एमडीपदी संदीप बक्षी

  • भारतीय रिझर्व बँकेने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदावर संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
  • ते चंदा कोचर यांची जागा घेतील. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांनी आपल्या सीईओ व एमडीपदाचा राजीनामा दिला होता.
  • व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी होणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण या वादग्रस्त कर्ज प्रक्रियेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर रजेवर असतील.
  • संदीप बक्षी सध्या आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
  • बक्षी यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे सीईओ व एमडी म्हणून बँकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँक
  • स्थापना: १९५५
  • मुख्यालय: मुंबई
  • आयसीआयसीआय (इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्वेस्टमेंट कारपोरेशन ऑफ इंडिया) हा भारताची बहुराष्ट्रीय बँक आहे.
  • २०१४मध्ये बाजार भांडवलाच्या आधारे, आयसीआयसीआय बँक देशातील तिसरी सर्वात मोठी बँक होती.
  • आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ४४५० शाखा तर १३,९९५ एटीएम आहेत. ही बँक भारतासह १९ देशांमध्ये कार्यरत आहे.
  • अमेरिका, सिंगापूर, बहरीन, हाँगकाँग, श्रीलंका, कतार, ओमान, चीन आणि दक्षिण अफ्रिका येथे आयसीआयसीआय बँकेच्या शाखा आहेत.

ममता कालिया यांना व्यास सम्मान

  • आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या ‘दुक्खम-सुक्खम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.
  • ममता कालिया यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी मथुरा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जातात.
  • दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजींनी एम.ए. केले. नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले.
  • सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांनी इंग्रजीतून लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच भर दिला.
  • कथा, कविता, कादंबरी, नाटय़, अनुवाद, पत्रकारिता अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली.
  • बदलत्या परिस्थितीत बदललेली महिलांची मानसिकता व त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या धाटणीच्या कथा त्यांनी लिहिल्या.
  • बेघर, मेला, मुखौटा, बोलने वाली औरत, रोशनी की मार, प्रेम कहानी, दौडक, दुक्खम-सुक्खम या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.
  • यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश हिंदी साहित्य संस्थेचा यशपाल कथा सम्मान तसेच साहित्य भूषण सम्मान, राम मनोहर लोहिया पुरस्कार मिळाला आहे.
व्यास सन्मान
  • हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला व्यास सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
  • के.के. बिर्ला फाऊंडेशनने १९९१मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. सन्मानचिन्ह आणि ३.५० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बिहारच्या ‘शाही लिची’ला जीआय टॅग

  • बिहारच्या ‘शाही लिची’ला विशिष्ट भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे. शाही लिचीचे उत्पादन मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण्य, वैशाली, समस्तीपूर आणि बेगूसराई जिल्ह्यात घेतले जाते.
  • ही जीआय नोंदणी लिची ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ बिहारच्या नावावर करण्यात आली आहे. बिहारमध्ये देशातील ४० टक्के लिची उत्पादित केली जाते.
भौगोलिक संकेतक (जीआय)
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक संकेतक. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक संकेतक (जीआय)ची मान्यता दिली जाते.
  • विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो.
  • यामुळे उत्पादनाला दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक संकेतक या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक संकेतक नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक संकेतक नोंदणी कायदा हा एक आहे.
  • आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे संकेतक मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
  • २००४मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. भारतात जीआय टॅग मिळालेली एकूण ३२५ उत्पादने आहेत.
  • एकूण २५ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे.
  • शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना जीआय उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो.
  • पारंपारिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे कौशल्य आणि कला येत असते, त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्यक आहे.
  • मानांकनाचे फायदे
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.

चालू घडामोडी : १६ ऑक्टोबर

बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी प्रियंक कानूनगो

  • प्रियंक कानूनगो यांची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्कळ ३ वर्षांचा असेल.
  • १६ सप्टेंबर २०१८ रोजी स्तुति कक्कड यांचा कार्यकाल संपल्यापासून हे पद रिक्त होते. स्तुति यांची जागा आता प्रियंक घेतील.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग
  • राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. हा आयोग भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  • बालसुरक्षा, त्या संबधित तक्रारी आणि सूचना यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
  • या आयोगाची स्थापना २००५मध्ये करण्यात आली, परंतु या आयोगाने मार्च २००७पासून कार्य करण्यास सुरवात केली.
  • २००७मध्ये बालहक्क संरक्षण कायदा २००५अंतर्गत संसदेच्या अधिनियमाद्वारे या आयोगाची स्थापना करण्यात आली.
  • भारताचे संविधान आणि संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या बाल अधिकार सुनिश्चित करणे या आयोगाचे कार्य आहे.
  • तसेच समाजाच्या विभिन्न विभागांतील मुलांच्या अधिकारांचा व साक्षरतेचा प्रचार करणे आणि त्यांच्यासाठी असलेल्या या अधिकारांच्या सुरक्षा उपायांची त्यांना जाणीव करून देण्याचे कार्यही हा आयोग पार पडतो.

निधन: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन

  • जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे १६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते.
  • पॉल अॅलन आणि त्यांचा बालपणीचा मित्र बिल गेट्स यांनी मिळून मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा पाया रचला होता.
  • १९७५मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली व काही काळातच ही एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी बनली. यामुळे अॅलन आणि गेट्स हे दोघेही अब्जाधीश बनले.
  • त्यानंतर दोघांनीही समाजकार्याला वाहून घेतले. त्यांनी अनेक स्वयंसेवी संस्था स्थापन करुन जगभरात विविध विकासकामांना निधी पुरवला.
  1. पॉल अॅलन
  • त्यांचा जन्म २१ जानेवारी १९५३ रोजी अमेरिकेतील सिॲटलमध्ये झाला. संगणक क्षेत्रातील क्रांतीचे ते पाईक होते. त्यांच्या नावावर एकूण ४३ पेटंट आहेत.
  • १९७५मध्ये त्यांनी आणि गेट्स यांनी स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्टमधून १९८२ साली ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी वल्कन कंपनी सुरु केली.
  • अॅलन यांच्या आठवणी ‘आयडिया मॅन’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाल्या. त्यात त्यांच्या साहसी प्रवासाचा आढावा घेतला आहे.
  • अॅलन यांनी बेघर लोक, अडव्हान्स सायंटिफिक रिसर्चसारख्या क्षेत्राला मागील दोन दशकांत २ अब्ज डॉलरची मदत केली आहे.
  • वैज्ञानिक संशोधन संस्थांना त्यांची मदत फार मोलाची ठरली. तसेच त्यांनी सांस्कृतिक संस्थांनाही भरपूर मदत केली.
  • अॅलन इन्स्टिटय़ूट फॉर ब्रेन सायन्स व अॅलन इन्स्टिटय़ूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संस्था त्यांनी स्थापन केल्या.
  • क्रीडा प्रकारात रस असलेले अॅलन हे बास्केटबॉल टीम पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि फुटबॉल टीम सिएटल सिहॉक्सचे मालक होते.
  • ते कल्पक तंत्रज्ञ होते आणि त्यांची दानशूरताही विज्ञान व क्रीडा क्षेत्राला संजीवनी देणारी होती.

अलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रयागराज

  • उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रयागराज असे करण्यासाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
  • तसेच अलाहाबादचे नाव बदलण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज मेळा प्राधिकरण स्थापन केले आहे.
  • प्रयागराजमध्ये पुढील वर्षी कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभ मेळ्यात जगभरातून लाखो भक्त येण्याची शक्यता आहे.
  • यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने मुगलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय जंक्शन केले आहे.
अलाहाबाद (प्रयागराज)
  • अलाहाबाद किंवा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे, ते अलाहाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
  • हे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसलेले आहे. या शहराचे क्षेत्रफळ ८२ चौकिमी असून, त्याची लोकसंख्या ११,१७,०९४ आहे.
  • मुगल सम्राट अकबरच्या काळात १५७५मध्ये प्रयागराजचे नाव बदलून अलाहाबाद करण्यात आले. अलाहाबाद म्हणजे अल्लाचे शहर या अर्थाने अकबराने हे शहर वसवले.
  • इंग्रजांनी १८५८मध्ये आग्रा-अवध यांची संयुक्त राजधानी म्हणून अलाहाबादची निवड केली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अलाहाबाद महत्वाचे केंद्र होते.
  • अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करावे आणि त्याची प्राचीन ओळख परत मिळावी अशी मागणी संत आणि स्थानिकांनी वारंवार केली होती.
  • इंग्रजांच्या काळात मदन मोहन मलावीय यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतरही वेळोवेळी ही मागणी करण्यात येत होती.

१६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिवस

  • दरवर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  • संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ १९८०पासुन हा दिवस पाळण्यात येतो.
  • अन्नवंचित लोक आणि त्यांची अन्न सुरक्षितता तसेच पोषणमूल्य असलेला आहार मिळण्याचा अधिकार याबाबत जाणीव व प्रबोधन करणारा हा दिवस आहे.
  • यंदाच्या अन्न दिनाची संकल्पना ‘आपली कृती हेच आपलं भविष्य’ (अवर अॅक्शन इझ अवर फ्युचर) ही आहे.
  • हा दिवस जगभरातील १५०पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. याद्वारे अन्नसुरक्षा, उपासमार आणि दारिद्र्य इत्यादीबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
अन्न व कृषी संघटना
  • इंग्रजी: Food and Agriculture Organization (FAO)
  • स्थापना: १६ ऑक्टोबर १९४५
  • मुख्यालय: रोम, इटली
  • सदस्य: १९४ देश
  • ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभर भूक निवारणासाठी प्रयत्न करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.

आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे दिल्लीमध्ये उद्घाटन

  • नवी दिल्लीतील प्रगती मैदानात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति ईरानी यांनी आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन केले.
  • १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान या ३ दिवसीय मेळाव्याचे आयोजन इंडियन सिल्क एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने केले होते.
  • या मेळाव्यात देशातील रेशीम उत्पादनांच्या १०८ प्रदर्शकांनी भाग घेतला. या वेगवेगळ्या देशांतील २१८ खरेदीदारांनी देखील भाग घेतला.
पार्श्वभूमी
  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे. तर चीन जगातील सर्वात मोठ्या रेशीम उत्पादक देश आहे.
  • रेशीम कृषी आधारित उद्योग आहे. रेशीम उद्योगामुळे देशभरात सुमारे ८० लाख कारागीर आणि विणकरांना ग्रामीण भागांमध्ये रोजगार प्राप्त होतो.
  • भारतात मलबेरी, एरी, तसर आणि मुगा या ४ प्रमुख रेशीम प्रकारांचे उत्पादन घेतले जाते. एकूण रेशीम उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन मलबेरी रेशीमचे घेतले जाते.
  • मलबेरी रेशीमचे उत्पादन मुखत्वे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये घेतले जाते.
  • भारतात एकूण रेशीम उत्पादनापैकी ९७ टक्के उत्पादन कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या फक्त ५ राज्यांमध्ये होते.

आयआरसीटीसीकडून ‘आस्क दिशा’ चॅटबॉट सुरु

  • इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) ‘आस्क दिशा’ नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजेंसयुक्त चॅटबॉट सुरु केला आहे.
  • हा चॅटबॉट वापरकर्त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तसेच मानवी-कर्मचाऱ्यांच्या मदतीविना तो वापरकर्त्याशी संवाद साधू शकतो. 
  • हा चॅटबॉट आयआरसीटीसी वेबसाइटवर कार्यरत झाला असून, लवकरच तो आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅन्ड्रॉइड अॅपवरही उपलब्ध होणार आहे.
आस्क दिशा
  • हा आयआरसीटीसीचा उपक्रम आहे. हा चॅटबॉट रेल्वे प्रवाशांना विविध सेवांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असेल.
  • यामध्ये भविष्यात आवाज ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि अनेक प्रादेशिक भाषाही समाविष्ट केल्या जाणार आहेत.
  • आस्क दिशा अतिशय अल्प काळात वापरकर्त्यांच्या समस्यांची उत्तर देऊ शकते. त्यामुळे चौकशीसाठी होणारा वेळेचा अपव्यय टळणार आहे. 

प्रेमा गोपालन सामाजिक उद्योजकता पुरस्कार

  • ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’च्या संस्थापिका प्रेमा गोपालन यांना ‘इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर’ (सामाजिक उद्योजकता) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात आजीविका निर्मिती याकरिता केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर या पुरस्काराची स्थापना २०१०मध्ये जुबिलेंट भारतीय फाउंडेशन आणि श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप यांनी संयुक्तपणे केली आहे.
  • श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी सलग्न संस्था आहे.
  • या पुरस्काराद्वारे अशा उद्योजकांना पुरस्कृत करण्यात येते, ज्यांच्या कार्याचा समाजावर चांगला प्रभाव पडतो.
प्रेमा गोपालन
  • प्रेमा गोपालन सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. १९८४मध्ये त्यांनी SPARC (सोसायटी फॉर द प्रोमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर)ची स्थापना केली.
  • त्यानंतर १९९३मध्ये त्यांनी ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’ची स्थापना केली. सध्या देशातील ६ राज्यांमध्ये स्वयं-शिक्षण प्रयोग कार्यरत आहे.
  • स्वयं-शिक्षण प्रयोगात ५०० स्वयं मदत गटांचा समावेश आहे. या प्रयोगाच्या मदतीने आतापर्यंत १.४५ लाख महिलांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास मदत मिळाली आहे.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुरज पनवारला रौप्यपदक

  • अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सुरज पनवारने त पुरुषांच्या ५००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
  • पनवारने पहिल्या टप्प्यात २० मिनिटे २३.३० सेकंद आणि दुसऱ्या टप्प्यात २० मिनिटे ३५.८७ सेकंद अशी एकूण ४० मिनिटे ५९.१७ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले.
  • इक्वेडोरच्या पॅटीन ऑस्करने ४० मिनिटे ५१.८६ सेकंदासह सुवर्णपदक नावावर केले, तर प्युओर्तो रिकोच्या जॅन मोरेयूने कांस्यपदक जिंकले.
  • यंदाच्या स्पर्धेतील अॅथलेटिक्समधले भारताचे हे पहिलेच आणि एकंदर तिसरे पदक आहे. यापूर्वी अर्जुन (थाळी फेक) आणि दुर्गेश कुमार (४०० मीटर अडथळ्याची शर्यत) यांनी २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

चालू घडामोडी : १५ ऑक्टोबर

दृष्टीक्षेप: आशियाई पॅरा स्पर्धा २०१८

  • जकार्ता इंडोनेशियामध्ये आयोजित आशियाई पॅरा स्पर्धा २०१८ समारोप झाला. ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • आशियाई पॅरा स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती होती. यापूर्वीच्या आशियाई पॅरा स्पर्धा २०१०मध्ये ग्वांगझाऊ (चीन) आणि २०१४मध्ये इंचिऑन (दक्षिण कोरिया) येथे पार पडल्या. तर २०२२च्या स्पर्धा ग्वांगझाऊ (चीन) येथे आयोजित केल्या जातील
  • यंदाच्या स्पर्धेत १८ खेळांमध्ये ५४६ इव्हेंट्स आयोजित केले गेले. ४३ देशांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला.
  • या स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘The Inspiring Spirit and Energy of Asia’ हे होते.
  • या स्पर्धेसाठी भारताने ३०२ सदस्यांचा संघ पाठविला होता. त्यात ॲथलीट, प्रशिक्षक, अधिकारी व इतर कर्मचारी यांचा समावेश होता.
  • रिओ पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा थांगवेलु मारियप्पन या स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक होता.
  • या स्पर्धेतील पदकतालिकेमध्ये भारताने ७२ पदकांसह ९वे स्थान मिळविले. तर चीनने ३१९ पदकांसह प्रथम स्थान मिळविले.
  • यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धांमधील प्रदर्शन भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३३ कांस्यपदकांसह भारताने या स्पर्धेत एकूण ७२ पदके जिंकली.
  • यापूर्वी मागील २०१४च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने ३३ पदकांची (३ सुवर्ण, १४ रौप्य व १६ कांस्य) कमाई केली होती.
  • पदकतालिकेतील सर्वोत्तम १० देश
    क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
    १. चीन १७२ ८८ ५९ ३१९
    २. दक्षिण कोरिया ५३ ४५ ४६ १४४
    ३. इराण ५१ ४२ ४३ १३६
    ४. जपान ४५ ७० ८३ १९८
    ५. इंडोनेशिया ३७ ४७ ५१ १३५
    ६. उझबेकिस्तान ३५ २४ १८ ७७
    ७. थायलंड २३ ३३ ५० १०६
    ८. मलेशिया १७ २६ २५ ६८
    ९. भारत १५ २४ ३३ ७२
    १०. हॉंगकॉंग ११ १६ २१ ४८
    भारताच्या पदकांचे विवरण
    क्र. खेळ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
    १. पॅरा ॲथलेटिक्स ७ १३ १६ ३६
    २. बॅडमिंटन ३ - ६ ९
    ३. बुद्धिबळ २ ५ २ ९
    ४. जलतरण १ २ ५ ८
    ५. नेमबाजी १ १ १ ३
    ६. तिरंदाजी १ - - १
    ७. भारोत्तलन - २ २ ४
    ८. टेबल टेनिस - १ - १
    ९. सायकलिंग - - १ १
    एकूण १५ २४ ३१ ७२

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री शहरी लीडर्स फेलोशिप कार्य्रक्रम

  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली सरकारच्या वतीने मुख्यमंत्री शहरी लीडर्स फेलोशिप कार्य्रक्रमाचा शुभारंभ केला.
  • शहरी भागातील आव्हाने व समस्या सोडवण्यासाठी देशभरातील तरुणांना आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत देशभरातील युवकांना दिल्ली सरकारसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत दिल्लीच्या शहरी भागातील सर्वात महत्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्य केले जाईल.
  • या कार्यक्रमाद्वारे दिल्ली सरकारबरोबर २ वर्षांसाठी काम करण्यास तयार असलेल्या आणि सार्वजनिक सेवांमध्ये रस असलेल्या तरुणांना आकर्षित केले जाईल.
  • या फेलोंना १,२५,००० रुपये मासिक वेतन आणि असोसिएट फेलोला ७५,००० रुपये मासिक वेतन देण्यात येईल.

आयएचजीएफ-दिल्ली मेळावा

  • जगातील सर्वात मोठ्या हस्तकला प्रदर्शन आयएचजीएफ-दिल्ली मेळाव्याच्या ४६व्या आवृत्तीचे आयोजन १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले.
  • याचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टम्टा यांनी केले. या मेळाव्यात ३२००हून जास्त प्रदर्शक सहभागी झाले आहेत.
  • हस्तकला निर्यात संवर्धन परिषदेद्वारे (EPCH) आयएचजीएफ मेळावा प्रत्येक २ वर्षांनी आयोजित केला जातो.
  • परदेशी ग्राहकांना हस्तकला उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे.
  • हस्तकला निर्यात संवर्धन परिषद ही हस्तकला उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेली सर्वात मोठी संस्था आहे. ही एक ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे.
  • EPCH: Export Promotion Council for Handicrafts
  • IHGF: Indian Handicrafts & Gifts Fair

हजरतुल्लाहचे एका षटकात ६ षटकार

  • अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये काबुल जवानन संघाचे प्रतिनिधित्व करताना एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला.
  • हजरतुल्लाहने हे ६ षटकार अब्दुल्ला मझारीच्या गोलंदाजीवर मारले. मझारीच्या या एका षटकात ३७ धावा झाल्या.
  • त्याचबरोबर त्याने १२ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण करताना, १७ चेंडूंत ६२ धावांची तुफानी फलंदाजी केली.
  • या कामगिरीसह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
  • युवराजने २००७च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ५ षटकार मारले होते.
  • याव्यतिरिक्त गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज), रवी शास्त्री व रवींद्र जडेजा (भारत), हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका), अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) आणि पाकिस्तानचा मिसबाह उल हक यांनी एका षटकात ६ षटकार मारले आहेत.
  • यापैकी युवराज सिंग (ट्वेंटी-२०) व हर्शल गिब्स (एकदिवसीय) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे.
  • यापूर्वी हजरतुल्लाहने ऑगस्ट २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. कोणत्याही अफगाणी खेळाडूसाठी हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक आहे.

१५ ऑक्टोबर: जागतिक विद्यार्थी दिन

  • भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो.
  • अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय राष्ट्रपती होते. २०१०पासून संयुक्त राष्ट्राने अब्दुल कलाम यांचा सन्मान करत त्यांचा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
  • डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम येथे झाला. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले.
  • ते भारताचे ११वे राष्ट्रपती होते. २००२ ते २००७ दरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पहिला.
  • त्यापूर्वी त्यांनी सुमारे ४ दशके संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे वैज्ञानिक म्हणून कार्य केले.
  • भारताचा नागरी अंतराळ कार्यक्रम आणि भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. १९९८च्या पोखरण-२च्या अणुचाचणीत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
  • क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
  • त्यांना १९८१मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९०मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओमधील कामांबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने १९९७मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
  • २००९मध्ये त्यांना हूवर पदक प्रदान करण्यात आले आणि २०१३मध्ये त्यांना एनएसएस वॉन ब्राउन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • डॉ. कलाम एक प्रसिद्ध लेखकही होते. त्यांची पुस्तके विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
  • डॉ कलाम यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके: इंडिया २०२०, विंग्स ऑफ फायर, इग्नाइटेड माइंडस, द लुमिनस स्पार्क्स, मिशन इंडिया, इंस्पायरिंग थॉट्स, इन्डोमिटेबल स्पिरिट, टर्निंग पॉइंट्स, टारगेट ३ बिलियन, फोर्ज योर फ्यूचर, ट्रांसेंडेंस : माय स्पिरिचुअल एक्सपीरियंस विद प्रमुख स्वामीजी, एडवांटेज इंडिया : फ्रॉम चैलेंज टू अपोर्चुनिटी.

भारताच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्यपदक

  • अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले.
  • अंतिम सामन्यात त्यांना यजमान अर्जेन्टिनाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.
  • तसेच भारताच्या पुरुष हॉकी संघाचाही अंतिम सामन्यात मलेशियाकडून २-४ ने पराभव झाल्यामुळे त्यांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जिंकलेली ही पहिलीच पदके आहेत.
  • याशिवाय भारताची कुस्तीपटू सिमरनने या स्पर्धेत महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले.
  • अंतिम फेरीत अमेरिकेच्या एमिली शिल्सनने सिमरनवर ११-६ने मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

दिल्लीमध्ये आपत्कालीन प्रदूषण योजना सुरू

  • दिल्लीतील प्रदूषणाच्या खराब पातळीमुळे तेथे आपत्कालीन प्रदूषण योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचे नाव ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) आहे. दिल्लीमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार जसजशी दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमी होत जाईल, तसतसे क्रमाक्रमाने प्रदूषण रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाय योजण्यात येतील.
  • सध्या दिल्लीतील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कचरा जाळण्यावर प्रतिबंध, रस्ते सफाई, अधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध, संवेदनशील ठिकाणी सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस तैनात करणे या उपायांचा समावेश आहे.
  • दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर सध्या ‘खराब’ या पातळीवर असल्यामुळे ते रोखण्यासाठी मध्यम स्तरावरील पावले उचलण्यात येत आहेत.
  • पुढील काळात वायू प्रदूषणात वाढ झाल्यास, पार्किंग फी वाढविणे, बांधकाम कार्यांवर बंदी आणि सम-विषम फॉर्म्युला यांसारखे उपाय योजण्यात येतील.
  • प्रदूषण पातळी अतिगंभीर झाल्यास, दिल्लीमध्ये अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल. तसेच शाळा बंद करणे यांसारख्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सचे गठन करण्यात येईल.
  • दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य कारण पिकांच्या अवशेषांचे ज्वलन आहे. या अवशेषांचा धूर धुक्यामध्ये मिसळल्यानंतर धुरके तयार होते. हिवाळ्यात दिल्लीत हे विषारी धुरके खूप प्रभावी असते.

खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार

  • संगीतकार, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना २०१८चा हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
  • हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८१व्या जन्मदिनी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • खय्याम यांनी १९४३साली वयाच्या १७व्या वर्षी लुधियाना येथे आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.
  • त्यांनी संगीत दिग्दर्शक शर्माजी-वर्माजी यांच्यासह ‘हीर रांझा’ (१९४८) या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
  • १९६१मध्ये ‘शोला और शबनम’ या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
  • पुढे त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. ‘उमराव जान’ (१९८१) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला.
हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार
  • हृदयनाथ आर्ट या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ २०११मध्ये हा पुरस्कार सुरू केला.
  • विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, हरिप्रसाद चौरसिया, ए. आर. रहमान यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • हृदयनाथ हे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचे पुत्र तसेच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे बंधू आहेत.

१५ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन

  • दरवर्षी जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
  • ग्रामीण स्त्रियांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो.
  • यावर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची संकल्पना ‘लैंगिक समानता आणि ग्रामीण स्त्रिया व मुलींच्या सशक्तीकरणासाठी सामाजिक सुरक्षा व शाश्वत पायाभूत सुविधा’ ही आहे.
  • ग्रामीण शेती, विकास, दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षेमध्ये सुधारणा व ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यामध्ये महिलांची भूमिका आणि योगदान या दिवशी अधोरेखित करण्यात येते.
  • आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाने डिसेंबर २००७मध्ये केली होती. १५ ऑक्टोबर २००८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन पाळण्यात आला.
  • संयुक्त राष्ट्रांच्या मते, शाश्वत विकास उद्दिष्टे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स: एसडीजी) साध्य करण्यासाठी ग्रामीण स्त्रियांचे सशक्तीकरण आवश्यक आहे.
  • जगातील लोकसंख्येमध्ये ग्रामीण स्त्रियांचे प्रमाण एक चर्तुथांश आहे. यापैकी बहुतेक स्त्रिया उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक स्रोत आणि शेतीसाठी अवलंबून आहेत.
  • आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाद्वारे अन्न सुरक्षा आणि दारिद्र्य निर्मूलनातील ग्रामीण महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले जाते.